सुपर स्मेलीचा हेअर केअर उत्पादन क्षेत्रात प्रवेश

 सुपर स्मेलीचा हेअर केअर उत्पादन क्षेत्रात प्रवेश



मुंबई, १९ नोव्हेंबर २०२०: सुपर स्मेली या जनरेशन झेडसाठी भारतातील १०० टक्के टॉक्झिन फ्री पर्सनल केअर ब्रँडने २०२० चा उत्सवात उत्पादनांची नवी श्रेणी लाँच केली आहे. किशोरवयीन आणि तरुणांसाठी या सुपर कूल ब्रँडने हेम्प होल्ड नॅचरल हेअर जेल आणि स्टाइल अँड ग्रो नॅचरल हेअर जेलच्या लॉन्चसह केस निगा श्रेणीत प्रवेश केला आहे. ही सुरक्षित स्टायलिंग जेल उत्पादने विषारी घटक नसलेले आणि नैसर्गिकरित्या चांगल्या घटकांनी समृद्ध आहेत. केसांसाठीच्या नव्या उत्पादनांव्यतिरिक्त सुपर स्मेलीने त्याच्या फ्रॅगरन्स कलेक्शनमध्ये औध आणि ब्रेट ही दोन नवी उत्पादने समाविष्ट केली आहेत. 

सुपर स्मेलीच्या सह संस्थापक सौ. दिपाली माथूर दयाल आणि श्री मिलन शर्मा म्हणाले, “सुपर स्मेलीमध्ये आम्ही आमच्या तरुण पिढीला हवी असलेली सुरक्षित पर्सनल केअर उत्पादने प्रदान करतो. तसेच त्याच वेळी ग्राहकांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करणारी उत्पादनेही आणतो. जेल स्टाइल केलेले केस हे जनरेशन झेडला आवडणाऱ्या कुल वाइबचा एक भाग असल्यामुळे आमचे हेअर जेल योग्य ठिकाणी काम करते. तसेच नव्याने लाँछ झालेले फ्रॅगनरन्स जनरेशन झेडचे केस संपूर्ण दिवस सुगंधित आणि ताजेतवाने ठेवतात. आम्ही आमच्या नव्या ऑफर्स तरुण युझर्सना सादर करताना उत्साही आहोत. त्यांना ही अभूतपूर्व उत्पादने आवडतील असा आम्हाला विश्वास आहे.”        

बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर जेलमुळे केस गळणे, अकाली पांढरे होणे तसेच दीर्घकाळ ते पातळ होणे, असे प्रकार घडतात. मात्र सुपर स्मेलीची आश्चर्यकारक केस जेल सर्व किशोरवयीन मुलांसाठी नैसर्गिकरित्या तयार केलेले व सुरक्षित आहे. हेअर जेल हे सुरक्षितरित्या तयार केलेले, १०० टक्के टॉक्झिन फ्री आणि सेफ कॉस्मेटिक्स ऑस्ट्रेलियाकडून प्रमाणित असे आहे. ऑस्ट्रेलियन अॅलर्जी सर्टिफाइड, त्वचाविज्ञान व जनरेशन झेडच्या वयोगटाससाठी वैद्यकीयदृष्ट्या चाचणी केलेले आहे. सुपर स्मेली उत्पादने सुपरस्मेलीडॉटइन या कंपनीच्या वेबसाइटसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, नायका या सर्व प्रमुख ई कॉमर्स पोर्टलवर १०० ते २००० रुपये किंमतीत उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24