शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

 शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासही त्याला वाटत असतो. अल्प काळात एखादा चांगला परतावा मिळवू शकतो, मात्र अस्थिर इक्विटी मार्केटच्या स्थितीत सतत व्यापार केल्याने कमी परतावा मिळण्याची शक्यता असते. एखादा गुंतवणुकदार स्वत:च्या कृतीद्वारे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या लोभात अडकण्याऐवजी काळजीपूर्वक आणि हिशोबशीर गुंतवणुकीसाठी पोर्टफोलिओ मॅनेजर आणि तज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले तर सरासरी गुंतवणूक अधिक चांगली होईल. गुंतवणुकीसाठी काही मुलभूत तत्त्वांचे पालन करून गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी प्लॅन करता येईल. बाजारपेठेतून संपत्ती निर्माण करण्याच्या ५ नियमांबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे एक्विटी स्ट्रॅटजिस्ट-डीव्हीपी श्री. ज्योती रॉय.

१. लाभांश: जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते, तेव्हा गुंतवणुकदार कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा लाभ घेतो. नफा होतो, तेव्हा तो आपल्या शेअर होल्डर्ससोबत कसा शेअर करायचा, हे कंपन्या ठरवत असतात. सामान्यपणे नफ्याचे हे आंशिक शेअरिंग असते. कारण त्यांना हा नफा भविष्यासाठी साठवून ठेवायचा असतो, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, सेवा-सुविधा किंवा ऑपरेशन्सच्या विस्तारासाठी अतिरिक्त संसाधने वापरायची असतात. आपण घेतलेल्या प्रत्येक शेअरसाठी किती वाटा मिळणार, हे कंपनी ठरवते, यालाच लाभांश असे म्हणतात. संस्थेची पूर्ण माहिती आणि नफ्याच्या खर्चाबाबत जाणून घेतल्यास तुम्हाला गुंतवणुकीचे निर्णय घेता येतील.

२. विविधता: हा उपाय जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराने केला पाहिजे. बहुधा अनिश्चित असलेल्या बाजारात तग धरून राहण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. ज्यांना जास्त जोखिमीची भूक असते, ते नेहमीच कंपनीच्या शेअर्सच्या ट्रेंडनुसार स्वत:साठी निवडक रतात. या कंपन्या चांगलीच कामगिरी करतील, अशी अपेक्षा असते. असे निर्णय घेताना, सल्लागारांची मदत निश्चितच उपयुक्त ठरते. परंतु यात असुरक्षितता असते. बहुसंख्य गुंतवणुकदारांसाठी हे फादेशीर ठरत नाही.

 

‘आपले सर्व माप एकीकडेच झुकू देऊ नका, ’ या म्हणीनुसार वर्तणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगले परिणाम मिळू शकतात. एखाद्या उद्योगावर भर देण्याऐवजी विविध स्रोतांमध्ये आपली संसाधने ठेवल्यास पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. बाजारपेठेत तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणा-या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.

 ३. आपण गुंतवणूक करत असलेल्या कंपन्यांचे विश्लेषण करावे: इन आणि आउटचा अभभ्यास करणे, वित्तीय यंत्रणा आणि संरचनाविषयी माहिती घेणे, सुमार मार्केट ट्रेंड समजून घेण्याने तुमचे अर्धे काम होते. गुंतवणुकदार ब-याचदा प्रादेशिक ट्रेंड, जागतिक आर्थिक दृष्टीकोन आणि कंपनीच्या घोषणा यांवरून शेअर्सचे मूल्य ठरते, असे मानण्याची चूक करतात. कंपनीच्या अंतर्गत कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असते, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. दीर्घकालीन गुंतवणुक करण्यापूर्वी रोखीचा प्रवाह, खर्च, मागील वर्षातील महसूल आणि आर्थिक निर्णय समजून घेणे या बाबींवरही पूर्ण संशोधन करून त्या समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी सखोल अभ्यास आवश्यक असल्याने गुंतवणूकदारांसाठी या मुद्द्यावर पोर्टफोलिओ व्यवस्थापकांकडून शिफारशी मिळवणे गरजेचे आहे.

४. अंदाजाने निर्णय घेणे टाळावे: बऱ्याच वेळा लोक, बाजारातील अंदाजाचा नैसर्गिक प्रवाह किंवा अफवांच्या आधारे नफा किंवा सतत परतावा मिळण्याच्या दृष्टीने चुकीचे निर्णय घेतात. पुष्टी न झालेल्या बातम्यांच्या वेळी शांत राहणे, हादेखील संपत्ती निर्माण करण्याचा प्रमुख मार्ग आहे. जेव्हा कंपनीच्या बाबतीत अनिश्चित परिस्थिती निर्माण होते, तेव्हा लोक समुहाने विचार करतात, चर्चा करतात आणि एक तर स्टॉक्स विकत घेतात किंवा विकतात. त्यामुळे अशा संकटवेळी आपल्या पोर्टफोलिओचे चुकीचे व्यस्थापन न करता, भावनिक निर्णय घेतल्यास स्टॉक्सच्या वित्तीय आरोग्यावर परिणाम होतो.

५. कधी आणि कशी विक्री करावी, हे योग्य रितीने समजून घ्यावे: वर नमूद केल्याप्रमाणे, काही लोकांना जोखीमिची भूक असू शकते. अल्प मुदतीसाठी व्यापार करण्याचीही इच्छा असेल. काही स्टॉक्स चांगले परतावे मिळवून देत असले तरी तज्ञांच्या मते, प्रत्येक तरुण गुंतवणुकदाराने भांडवलाच्या मूल्यांकनावर किंवा शेअर मूल्यात घट झाल्यानंतर कमी किंमतीवर बेट लावणे योग्य आहे. हे निर्णय ब-याच वेळा बाजारातील चढ-उतारांनुसार घेतले जातात. कंपनी किंवा उद्योगाच्या दीर्घकालीन वृद्धी धोरणाचा अभ्यासानुसार घेतलेले नसतात. याचे परतावेही खात्रीशीर नसतात. ते जुगार खेळण्यासारखे आहे. बाजार मूल्यांकनाऐवजी ते गुंतवणुकदाराच्या नशीबावर जास्त अवलंबून आहेत.

दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणुक करणाऱ्यांनी, अल्पकालीन बाजारातील अस्थैर्य किंवा स्टॉकच्या पर्यायांतील किंमतीतील स्थैर्यानुसार, आपला खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेऊ नये. लार्ज कॅप गुंतवणूकीवर लक्ष ठेवत आणि मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये कमी गुंतवणूक करत, प्रत्येकजण वैयक्तिकरित्या विक्रीचा निर्णय घेतो, तो संपूर्ण आर्थिक परिस्थितीनुसार घेतला जात नाही. अशा प्रकारे, घाईने निर्णय घेतले जातात आणि स्टॉक मॅच्युरिटीतून लाभ मिळत नाही.

तुमचा प्लॅन काहीही असो, संपत्तीची निर्मिती प्रक्रिया ही वेदनादायी दीर्घकालीन प्रक्रिया असते. तत्काळ पैसे कमावण्यांसाठी ती उपयुक्त नाही. स्टॉक्सच्या पर्यायातून अनेक वर्षांनंतर परतावा मिळू शकतो. काळानुसार उत्कृष्ट परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकदाराकडे संयम आणि शांतता असणे आ‌वश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24