ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने महिला सबलीकरण उपक्रम
ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने महिला सबलीकरण उपक्रम
· महिलांसाठी व्यावसायिक स्वरुपाचे कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण
· इंदूर येथे उपक्रमाची सुरुवात, अन्य शहरातही विस्तार होणार
· टाळेबंदी आणि त्यानंतरही मिळणार साह्य
Indore, 27 नोव्हेंबर, 2020: महिला सबलीकरण उपक्रमात आपले योगदान देण्याच्या अनुषंगाने ब्रिजस्टोन इंडियाने पुढाकार घेतला आहे. महिलांनी व्यावसायिक मोटर चालक व्हावे, त्यांना वाहन यंत्रणेची माहिती असावी तसेच एक व्यवसाय म्हणून महिलांनी या क्षेत्राचा विचार करावा म्हणून कंपनीने प्रशिक्षणाचे आयोजन केले. आजवर सुमारे 81 महिलांनी इंदूर शहरात या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. अन्य शहरांत देखील हा उपक्रम राबविण्याची कंपनीची योजना आहे.
एकंदर साडे तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणात ड्रायव्हिंग विषयक कौशल्ये, प्रतिबंधात्मक देखभाल आणि आपतकालीन दुरुस्तीचा समावेश करण्यात आला. त्याशिवाय इंग्रजीत संभाषण, नकाशा वाचन, प्रथमोपचार, स्व-रक्षण यासारखे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणात समाविष्ट आहेत. महिला विषयक कायदे, मोटर वाहन अधिनियम, विमा कायद्याची माहिती देखील प्रशिक्षण काळात सहभागी उमेदवारांना देण्यात येते. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कॅब ड्रायव्हर, पर्सनल ड्रायव्हर, ई-रिक्षा ड्रायव्हर आणि कॉलवर उपलब्ध होणारे चालक म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो आहे.
“महिला सबलीकरण हे ब्रिजस्टोन इंडियामध्ये आमचा मुख्य भर असलेल्या काही घकांपैकी एक आहे. हा उपक्रम महिलांना वित्तीय स्वातंत्र्य तर देतो, शिवाय त्यांना पारंपरीक रोजगारापलीकडच्या पर्यायांत सहभागी होण्याचा आत्मविश्वास प्रदान करतो. या प्रशिक्षणात ब्रिजस्टोनच्या सुरक्षा आणि दळणवळण विषयक मूल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशात टाळेबंदी झाल्यावर, नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. आम्ही महिला वर्गाला मदतीचा हात दिला. अनेक महिलांनी जिद्द दाखवलीच, शिवाय मोठ्या हिमतीने नवीन कौशल्य आत्मसात केली,” असे ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले.
टाळेबंदीच्या कालावधीत अनेक महिलांनी नोकऱ्या गमावल्या, त्यावेळी अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत ब्रिजस्टोन इंडिया पुढे सरसावले. एकंदर शंभर कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घेतला.
“इंदूर शहरात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे आणि सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना महिला चालक असल्यास त्यांना सुरक्षित वाटते. मला या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास दिला. मी देखील व्यावसायिक होऊ शकते, कमावू शकते आणि मलाही कुटुंबाला हातभार लावणे शक्य आहे. माझ्या मते कार चालक म्हणून घराबाहेर पडल्याने मला मोठी मदत झाली. कार ड्रायव्हिंगने मला सबला केले.” यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून सध्या कॅब चालवत असलेल्या सोनाली प्रजापत सांगतात.
Comments
Post a Comment