एअरटेल आणि वेदांतू लाखो शालेय मुलांना त्यांच्या घरातील टीव्ही स्क्रीनवर दर्जेदार शिक्षणास परवडणारी सुविधा देते

एअरटेल आणि वेदांतू लाखो शालेय मुलांना त्यांच्या घरातील
टीव्ही स्क्रीनवर दर्जेदार शिक्षणास परवडणारी सुविधा देते
इयत्ता 6 वी ते 12 च्या विद्यार्थ्यांना उच्च-परिणामकारक, परस्परसंवादी प्रशिक्षण देण्यासाठी वेदांतू मास्टरक्लास डीटीएच चॅनेलचे प्रसारण एअरटेल डिजिटल टीव्हीवर 4 रुपये / प्रति दिवसाला केले जाईल
मुंबई, 24 नोव्हेंबर 2020: एअरटेल डिजिटल टीव्ही, भारती एअरटेलची डीटीएच आर्म (“एअरटेल”) आणि लाइव्ह ऑनलाईन लर्निंगचे प्रणेते वेदांतू यांनी आज भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी एक नाविन्यपूर्ण भागीदारी जाहीर केली. एअरटेलचे या भागीदारी अंतर्गत वेदांतू मास्टरक्लासेस ही दोन समर्पित डीटीएच चॅनेल केवळ 17 मिलियन एअरटेल डिजिटल टीव्ही ग्राहकांना 4रुच्या अल्प किंमतीत उपलब्ध होतील. दररोज हया वाहिन्या अनुक्रमे 6 वी ते 10 वी च्या वर्गाला आणि 11 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित व विज्ञान विषयांची माहिती देतील. व हे शिक्षण आयआयटी (IIT) आणि एम्स (AIIMS) मधील पदवीधरांसह अध्यापनातील सिद्ध ट्रॅक रेकॉर्डसह उत्कृष्ट श्रेणीतील शिक्षकांकडून दिले जाईल. शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी यांचे मिश्रण असेल आणि जेथे शक्य असेल तेथे प्रादेशिक भाषेची सामग्री जोडण्यासाठी योजना आखल्या जातील.
या भागीदारीवर भाष्य करताना भारती एअरटेलचे डीटीएच बिजनेसचे सीईओ आणि डायरेक्टर सुनील तलदार म्हणाले, “वेदांतूला उच्च टीव्हीच्या शिक्षणास घरातील टीव्हीद्वारे स्वस्त आणि प्रवेशयोग्य बनवून उच्च गुणवत्तेचे लोकशाहीकरण करण्यासाठी भागीदारी केल्या बद्धल आम्हाला आनंद झाला आहे.टीव्ही स्क्रीन मनोरंजनाच्या पलीकडे परस्परसंवादी शिक्षण आणि शिकण्याचे केंद्र बनण्यापर्यंत विकसित होत आहे जी विशेषत: या अभूतपूर्व काळात सुरक्षित आणि परवडणारी रीतीने वितरित केली जाऊ शकते. आम्हाला विश्वास आहे कि ही सेवा विद्यार्थी व पालकांना उत्तम प्रकारे पसंत पडेल आणि टीव्हीवरील शिक्षण हे कायमस्वरूपी वैशिष्ट्य ठरेल ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा फायदा होईल.”
या भागीदारीवर भाष्य करताना वेदांतूचे सीईओ आणि सह-संस्थापक वामसी कृष्णा पुढे म्हणाले, "महानगर आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट ऑनलाइन शिक्षणाची एकमुखी निवड म्हणून वेदांतुची स्थापना केल्याने आमचे पुढील कार्य म्हणजे आपले उच्च शिक्षित शिक्षक आणि बर्‍याच मोठ्या संख्येने सामग्री भारतीय विद्यार्थाना उपलब्ध करुन देणे.एक ब्रँड म्हणून आम्ही दर्जेदार शिक्षणास सुलभ करण्यासाठी आणखी मैल पार करत आहोत. एअरटेल डीटीएच बरोबरची आमची भागीदारी या दिशेनेच आहे आणि आम्हाला छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये भारताच्या शिक्षणाची गरज टिकवण्यासाठी आमच्या सामूहिक सामर्थ्याचा वापर केल्याबद्धल आनंद झाला आहे.’’

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202