‘तैवान प्रॉडक्ट सेंटर’च्या माध्यमातून तैवानने आपल्या भारतातील व्यवसायकक्षा केल्या अधिक बळकट

 ‘तैवान प्रॉडक्ट सेंटर’च्या माध्यमातून तैवानने 

आपल्या भारतातील व्यवसायकक्षा केल्या अधिक बळकट

मुंबई २५ नोव्हेंबर २०२० : ‘तैवान एक्स्टर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल’(तायट्रा)ने ‘तैवान प्रॉडक्ट सेंटर’ (टीपीसी)चा भारतात शुभारंभ केला असून त्या माध्यमातून भारतातील आपले व्यवसाय संबंध अधिक भक्कम करत आणि भारतातील बाजारपेठ अधिक विस्तारण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. आपल्या सेवा अधिक विस्तृत करण्याच्या दृष्टीने टीपीसीने आपली उत्पादने अत्याधुनिक केली असून तंत्रज्ञानामध्ये ही सुधारणा केली आहे. ही उत्पादने दिल्ली, चेन्नई आणि मुंबई येथील त्यांच्या केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. ‘तैवान प्रॉडक्ट सेंटर’ने पुढील पाच वर्षांमध्ये वीस कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे लक्ष्य समोर ठेवले असून त्या माध्यमातून दोन देशांमधील व्यापाराचे आदान-प्रदान साध्य करतो.

या प्रॉडक्ट सेंटर्समध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध असून ती प्रतिष्ठित तैवानी कंपन्यांची आहेत. त्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक नाविन्यपूर्ण उत्पादने धोरणात्मकरित्या उपलब्ध करून दिली गेली आहेत. विविध औद्योगिक विभागांमधील ही उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध असतात.

टीपीसी मुंबईमध्ये कित्येक प्रख्यात तैवानीज कंपन्यांची ऑटोमोबाइल भागांपासून इलेक्ट्रिक वायर ते त्वचा निगा अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांमधील उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या कंपन्यांमध्ये मॅगटेक मॅग्नेटिक या पर्मनंट फेराईट मॅग्नेट आणि एनडीफेब मॅग्नेट यांची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीचा समावेश आहे. प्युमा ही कंपनी सर्व प्रकारचे शेअर एअर कम्प्रेसर्स, एअर टूल्स, प्रेशर व्हेसल्स आणि संबंधित ॲक्सेसरीज/ सुटे भाग यांचे जगभरात उत्पादन करते. त्या माध्यमातून ही उत्पादने तब्बल १३६ देशांमध्ये विकली जातात. त्यात आता भारताची भर पडत आहे. ता या इलेक्ट्रिक वायर अँड केबल कंपनी लिमिटेडला वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये असलेल्या मॅग्नेट वायर्स, फ्लॅट वायर आणि टीआयएलडब्ल्यू विकसित करण्याचा सर्वसमावेशक असा निर्मिती अनुभव आहे. ही उत्पादने विविध वैशिष्ट्यांनी युक्त असून ती विविध औद्योगिक उपक्रम, ग्राहक उत्पादने, ऑटोमोबिल्स, इलेक्ट्रोमेकॅनिकल साधने आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये वापरली जातात. एसवेल इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड ही स्पीडोमीटर्सचे डिझाइनिंग आणि निर्मितीमध्ये आघाडीची कंपनी असून ही उत्पादने इलेक्ट्रिक दुचाकी, तिचाकी आणि मोटरसायकलसाठी वापरली जातात. ॲडव्हान्स कनेक्टेक ही एकॉन ग्रुपची उपकंपनी असून

इलेक्ट्रिक मोटरसायकल चार्जर (प्लग आणि रीसेप्टेबल) आणि स्कूटर व मोटरसायकलच्या केबल उत्पादनांमध्ये उत्तम सेवा देऊ करते. फार्मोसा हे इलेक्ट्रिक बाईक बॅटरी पॅक उत्पादनांमधील आघाडीची कंपनी आहे. टॅत्युंग ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड ही ॲल्युमिनियम एक्स्टुजन दरवाजे आणि खिडक्या उत्पादनामधील आघाडीची कंपनी आहे. युनिकेअर बायोटेक्नॉलॉजी को-ऑपरेशन ही कंपनी त्वचाआरोग्य उत्पादनांची निर्मिती करते आणि त्यांत टोनर, लोशन, क्रीम,  फेशियल मास्क आणि इतरही अनेक मोईश्चरायजिंग, त्वचानिगा आणि ॲन्टी-एजिंग उत्पादनांचा समावेश आहे.

‘तैवान प्रॉडक्ट सेंटर’बद्दल बोलताना तायपेई वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे संचालक अॅलेक्स पेन म्हणाले, “विविध क्षेत्रांमधील उद्योग हे आता कोविड साथरोग टाळेबंदीमधून पुन्हा कार्यरत झाले आहेत. अशा वेळी नवीन वातावरणाला अनुसरून व्यवसाय धोरणे स्थापित करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर नवीन जीवनशैलीशी संबंधित उत्पादने देणेही गरजेचे झाले आहे. आधुनिक सेवा, डिजिटल गोष्टींचा अवलंब आणि तंत्रज्ञान नाविन्यपूर्णता या गोष्टी अर्थव्यवस्था पुन्हा स्थिरस्थावर करण्यास मदत करणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही पुन्हा झपाट्याने पूर्वपदावर येण्याची क्षमता असलेली प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेने आत्ताच पुनर्भरारी घेण्यास सुरुवात केली आहे आणि हा देश एक स्मार्ट देश म्हणून नावारूपाला येत आहे. टीपीसी हे तैवानीज कंपन्यांसाठीचे एक माध्यम असून त्या माध्यमातून त्यांची सर्वोत्तम स्मार्ट सेवा आणि तंत्रज्ञान प्राविण्य यांची भारतीय कॉर्पोरेट उद्योगाबरोबर भागीदारी होणार आहे. त्या माध्यमातून हा स्थित्यंतर प्रवास साध्य होणार आहे. तैवानचे  नवीन दाक्षिणात्य धोरण हे भारतकेंद्री असून त्याद्वारे दोन्ही देशांना आवश्यक ती चालना त्यातून मिळणार आहे. त्यातून परस्पर व्यापार संबंध अधिक दृढ होणार आहेत.”

 तैवान हा आशिया खंडातील एक आघाडीचा उद्योगकेंद्री देश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये  बेटावरील या देशाने जैवतंत्रज्ञान ते आर्टीफिशीयल इंटेलिजन्स या सर्वच क्षेत्रांमधील एक आघाडीचा देश म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ‘तायट्रा’ ही तैवानची ना-नफा तत्वावरील आघाडीची व्यापार प्रसार संस्था असून ‘तायपेई वर्ल्ड ट्रेड सेंटर’ (टीडब्ल्यूटीसी) आणि ‘तैवान ट्रेड सेंटर’ (टीटीसी) यांच्या सहकार्यातून तिने जागतिक व्यापार प्रचारासाठी समर्पित जागतिक नेटवर्क तयार केले आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth