‘गोदरेज मटेरियल हँडलिंग’ची ‘ग्रीनडिझाईन टेक्नोलॉजीज’शी भागीदारी

गोदरेज मटेरियल हँडलिंगची ग्रीनडिझाईन टेक्नोलॉजीजशी भागीदारी

गोदामांमध्ये सामानाची ने-आण करण्यासाठीची स्वयंचलित ट्रॉली – एमओपीट्रो सादर

·         गोदामांमधील लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी यंत्रणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या गोदरेज मटेरिअल हॅंडलिंगच्या धोरणाच्या अनुषंगाने भागीदारीचे पाऊल



मुंबईनोव्हेंबर 2020 : गोदरेज अॅं बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.ा व्यवसाय असलेल्या गोदरेज मटेरियल हँडलिंग या विभागाने आज ग्रीनडिझाईन टेक्नोलॉजीजची मोटराईज्ड ऑर्डर पिकिंग ट्रॉली, ‘’एमओपीट्रो’’ बाजारात आणण्याची घोषणा केली. गोदरेजच्या एसकेयूट्रो या विद्यमान उत्पादनाचे ह एक नैसर्गिक विस्तारीत रूप आहेएसकेयूट्रो ही मॅन्युअल ऑर्डर पिकिंग सिस्ट आहे. शॉप फ्लोअरवर सामानाची ने-आण करण्यासाठी व कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी ही सिस्टीम गेल्या वर्षी सादर करण्यात आली होती. भारतातील गोदामांमधील लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी यंत्रणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या गोदरेजच्या धोरणानुसार ही उत्पादने सादर करण्यात येत आहेत.

कोविडच्या साथीमुळे उद्योग-व्यवसायांच्या कामकाजाच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. शहरांमध्ये काम करीत असलेले अनेक कामगार आपापल्या गावी परतले आहेत. या त्यांच्या परतीच्या स्थलांतरामुळे लहाल-मोठ्या शहरांमध्ये इ-कॉमर्सच्या माध्यांतून होणारे व्यवहार वाढले आहेत. काही संशोधक संस्थांनी या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालांनुसार, अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या कंपन्यांची विक्री लक्षात घेतली असता, अॅमेझॉनचे 91 टक्के व फ्लिपकार्टचे 65 टक्के नवे ग्राहक हे लहान शहरांतील असल्याचे दिसून आले आहे.

या इ-कॉमर्स कंपन्यांकडील मागणी वाढल्यानेमालाची ने-आण वेळेत करण्यास अतोनात महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत हा एक तुलनेने तरुण देश आहेयेथील लोकसंख्येचा मोठा भाग 35 वर्षांहून कमी वयाचा आहे. या तरुणांना नवीन अनुभव घ्यायला आवडते आणि वर जाण्याची त्यांची महत्वाकांक्ष असते. गोदामांच्या परिसंस्थेमध्ये ऑर्डरनुसार सामान घेणे आणि लांबवरचे अंतर चालत पार पाडणे ही एक नीरसतसेच त्रासदायक क्रिया आहे. गोदामांमध्ये हे काम करणारे बहुसंख्य कर्मचारी 35 वर्षांहून कमी वयोगटातील आहेत. त्यांना आपले काम जलद रितीने व उत्साहाने करायचे असते.

एमओपीट्रो’ ही एक मोटराइज्ड ऑर्डर पिकिंग ट्रॉली असून ते एक स्मार्ट पिकिंग सोल्युशन आहे. गोदरेजच्या एसकेयूट्रोचे ते एक विस्तारीत रूप आहे. भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच उत्पादन आहे. 2019मध्ये एसकेयूट्रो सादर झाली. तेव्हापासून तिला इ-कॉमर्सरिटेलऔषधनिर्मिती आदी क्षेत्रांतील कंपन्यांकडून वाढती मागणी आहे. विशेषतः गेल्या 2 महिन्यांत ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या काही महिन्यांतील टाळेबंदी, त्यानंतरची अचानक वाढलेली मागणी आणि सणासुदीनिमित्ताची वाढीव मागणीयांमुळे वेगाने व अचूकपणे मालाची ने-आण करण्याची उपकरणे उपलब्ध करण्याकरीता व कार्यक्षमता वाढविण्याकरीता भागीदारी करण्यास गोरेजसारख्या कंपन्यांना भाग पडते आहे. यातून गोदामांमधील कर्मचाऱ्यांना चांगले आरोग्यसुरक्षितता व निरोगीपणा यांसारखे फायदे मिळणेही सुनिश्चित होते. दररोज मालाची ने-आण हाताने करावयाच्या कामात एमओपीट्रोने क्रांती घडून येते. ऑपरेटरांना हाताने सामान उचलावे लागण्याची दमविणारी क्रिया सुलभ होऊन त्यांना एमओपीट्रोच्या सहाय्याने सामान अचूकपणे उचलणे व ठेवणे शक्य होते. एमओपीट्रोच्या मोबाईल डिव्हाईसवरील सॉफ्टवेअर ऑपरेटर्सना गोदामातील सर्वात जलद गतीने जाण्यासाठीची वाट दाखवते आणि त्यामुळे ऑपरेटर्सची कार्यक्षमता वाढते.

स्वावलंबी होण्याच्या देशाच्या वाटचालीमध्ये भारतीय नवकल्पनांना गोदरेजने नेहमीच पाठबळ दिले आहे. गोदामांतील उत्पादनांची ने-आण करण्याचा वेळ वाचावा यासाठी स्वयंचलित उपकरणांच्या वापरावर पुरवठा साखळी उद्योगाने सध्या भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर, गोदरेज व ग्रीनडिझाईन टेक्नोलॉजीज यांच्यातील भागीदारीने देशातील स्टार्टअप कंपन्यांच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रातील नाविन्यतेला पाठिंबा मिळाला असून पुरवठा साखळी क्षेत्रातील एक कसर भरून निघाली आहे.

गोदरेज मटेरियल हँडलिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनिल लिंगायत म्हणाले, “वाढलेली टाळेबंदी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शिथिलीकरण या कारणांमुळे दोन तिमाही इतक्या कालावधीवर परिणाम झाला. या काळात साचून राहिलेली उत्पादनांसाठीची मागणी या आर्थिक वर्षातील उर्वरीत दोन तिमाहींमध्ये पूर्ण करण्यासाठी भारतीय उद्योग क्षेत्राने कंबर कसली आहे. यातील बहुतांश मागण्या मध्यम व लहान शहरांमधून येत आहेत. त्यांची पूर्तता वेळेत करणे ही एक कसोटीच ठरणार आहे. गेल्या वर्षी सादर झाल्यापासून, एसकेयूएट्रोने इंट्रा-लॉजिस्टिक’ क्षेत्रात आपले अभिनवनाविन्यपूर्ण स्वरूप दाखवून देऊन मालवाहतुकीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. एसकेयूट्रोचे एक विस्तारीत रूप असलेल्या एमओपीट्रोसाठी गोदरेज मटेरियल हँडलिंगने भागीदारी केली आहे. गोदामांमध्ये स्वयंचलित पिकिंग उपकरणांना मोठी मागणी असल्याची संधी गोदरेजने उचलली आहे. एसकेयूट्रोचे सर्व फायदे आणि त्याहूनही काही अधिक लाभ या एमओपीट्रोमध्ये मिळू शकतील. या आमच्या भागीदारीतून ऑपरेटर्सनातसेच इ-कॉमर्स’, थ्रीपीएल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांनाही मोठी मदत होईल.’’

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202