सिंगापूरस्थित व्हिस्टास मीडिया कॅपिटलने (व्हीएमसी) एका एक्स्लुजिव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केली प्लॅनेट मराठीमध्ये गुंतवणूक

 सिंगापूरस्थित व्हिस्टास मीडिया कॅपिटलने (व्हीएमसीएका एक्स्लुजिव 

मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केली प्लॅनेट मराठीमध्ये गुंतवणूक

 

मुंबईनोव्हेंबर २०२०व्हिस्टास मीडिया कॅपिटल (व्हीएमसीया सिंगापूरस्थित माध्यमकेंद्री गुंतवणूक कंपनीने मराठी कंटेण्टवर भर देणारा ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वांपुढे आणण्यासाठी प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडशी (प्लॅनेट मराठीभागीदारी केली आहेयातून लवकरच लाँच होणा-या ओटीटी प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट कंटेण्टच्या अनेकविध प्रकारांच्या माध्यमातून जगभरातील १०० दशलक्षांच्या लक्ष्यसमूहाचे (टीजीमनोरंजन करणे हे आहे.

 

संपूर्ण जग कोविड साथीच्या विळख्यातून बाहेर येत असतानालॉकडाउनमुळे मनोरंजनाचे नवीन मार्ग व प्रकार उदयाला आले आहेतइंटरनेटची यात प्रमुख भूमिका असूनया नवीन मार्ग व प्रकारांमध्ये भारतभरातील प्रेक्षकांची संख्या वाढवण्याची संधी मनोरंजन क्षेत्राला आहेकेपीएमजीच्या इंडिया मीडिया अँड एंटरटेनमेंट रिपोर्ट २०२०नुसार “डिजिटल संरचना व कंटेण्ट पुरवठा यांत झालेल्या महाकाय वाढीमुळे डिजिटल विभागाने आर्थिक वर्ष २०मध्ये अर्थव्यवस्थेची गती मंदावली असूनही २६ टक्के वाढीची नोंद केलीयात डिजिटल व ओटीटी जाहिरातींमध्ये २४ टक्के वाढ नोंदवली गेली.” सर्व उपकरणांवर सातत्याने स्ट्रीम करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समृद्धसमकालीन व वैविध्यपूर्ण कंटेण्ट देण्याची प्लॅनेट मराठीची योजना आहेव्हेंचरमध्ये धोरणात्मक सहभागासाठी व्हीएमसी प्लॅनेट मराठीमध्ये ५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करणार आहे.

 

व्हिस्टास मीडिया कॅपिटल पीटीई लिमिटेडचे ग्रुप सीईओ श्रीअभयानंद सिंग या भागीदारीची घोषणा करताना म्हणाले, “भारतातील ओटीटी क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे पण तरीही प्रादेशिक विभागात अद्याप मोठी संधी आहेजगभरात मराठी प्रेक्षकांची संख्या मोठी आहेडिजिटल क्षेत्रात या प्रेक्षकांनी दीर्घकाळ चांगल्या कंटेण्टला आश्रय दिला आहेहा प्लॅटफॉर्म लाँच करण्यासाठी तसेच गरजेतील तफावत भरून काढण्यासाठी प्लॅनेट मराठीसोबत भागीदारी करणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे.”

 

व्हीएमसी ही सिंगापूरस्थित मीडिया इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनी असूनअनेक माध्यमसंबंधित व्यवसायकंपन्यांची मालकी या कंपनीकडे आहे व यांत कंपनी गुंतवणूकही करतेकॅपिटल मार्केट्स व प्रायव्हेट इक्विटीमध्येही कंपनीची गुंतवणूक आहेगोल्डन रेशो फिल्म्स या व्हीएमसीच्या उपकंपनीचा कंटेण्ट निर्मितीमार्केटिंग व वितरणावर भर आहेहिंदीमराठीतमिळ व इंग्लिश या भाषांतील व हॉलीवूडमधील सर्व बजेट्सच्या फीचर फिल्म्सवेब सीरिजचे वितरण ही कंपनी करतेव्हिस्टास मीडिया कॅपिटलने आपली जागतिक माध्यम व मनोरंजन क्षेत्रावरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी ऑगस्ट २०२० मध्ये नासडॅकवरील १०० दशलक्ष डॉलर्सच्या स्पेशल पर्पज अॅक्विझिशन कंपनी (एसपीएसी)चा आयपीओ प्रायोजित व सूचीबद्ध केला.

 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख  संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणालेआज मराठी प्रेक्षकांना टेलिव्हिजन किंवा अन्य प्लॅटफॉर्म्सवरील मोजके शो व चित्रपट वगळता डिजिटल मनोरंजनाचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीतहे समजल्यामुळे आम्ही एक एक्स्लुजिव मराठी ओटीटी आणत आहोतहा ओटीटी मराठी मनोरंजन उद्योगातील पोकळी भरून काढेलआमची व्याप्ती जगभरात वाढवण्याची आमची योजना आहे आणि या प्रवासात आमच्यासह पहिले पाऊल टाकण्यासाठी व्हीएमसी हा परिपूर्ण भागीदार आहेव्हीएमसीसोबतचा संबंध दीर्घकाळ टिकवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”.

 

मराठी डिजिटल विश्वातील गेम चेंजर असे वर्णन फोर्ब्ज इंडियाने २०१७ मध्ये केलेला प्लॅनेट मराठी हा मराठी माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रस्थापित ब्रॅण्ड आहेमराठी चित्रपट सृष्टीत एक प्रवाह सुरू करण्यात व प्रस्थापित करण्यात ब्रॅण्डने महत्त्वाची भूमिका बजावली आहेमग ती बहुविध सोशल मीडिया कंपन्यांद्वारे मराठी चित्रपटांचे ब्रॅण्डिंग व प्रमोशन करून घेण्याच्या स्वरूपात असो किंवा प्लॅनेट टॅलेंटच्या माध्यमातून सेलेब्रिटीजच्या इमेज बिल्डिंगच्या स्वरूपात असो.

 

गोल्डन रेशो फिल्म्सने (जीआरएफयापूर्वी अमिताभ बच्चन व विक्रम गोखले अभिनित एबी आणि सीडी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी २०१९ मध्ये प्लॅनेट मराठीशी भागीदारी केली होतीत्यानंतर गोष्ट एका पैठणीची आणि आता बहुप्रतिक्षित चंद्रमुखी या चित्रपटांसाठीही ही भागीदारी आहेजीआरएफने अलीकडील काळात प्रदर्शित केलेल्या कंटेण्टमध्ये वेब सीरिज जेएल५० आणि भोंसले यांचा समावेश आहेयांत अनुक्रमे अभय देओल व मनोज वाजपेयी यांच्या भूमिका आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202