यूएसमधील वेस्ट कोस्ट भागातील भारतभरातील आठ शहरांमधील विद्यार्थ्यांशी संवाद

यूएसमधील वेस्ट कोस्ट भागातील भारतभरातील आठ शहरांमधील विद्यार्थ्यांशी संवाद 

 मुंबई, 27 नोव्हेंबर 2020: हरयाणातील एका लहानशा गावातून झालेल्या सुरुवातीपासून ते जागतिक व्यापारी संस्थेचा प्रमुख बनण्यापर्यंतचा आपला प्रवास होतकरू भारतीयांच्या नव्या पिढीला या अनुभवांचा लाभ देण्याची प्रेरणा देत असल्याचे मत डिलॉइट ग्लोबलचे सीईओ पुनित रंजन यांनी मांडले. 250 हून अधिक युवा विद्यार्थिनींशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. रंजन यांचे सध्याचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या यूएसमधील वेस्ट कोस्ट भागातील पोर्टलँड शहरातून त्यांनी आज भारतभरातील आठ शहरांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 


झूमवर पार पडलेल्या या संवादसत्राने जगातील सर्वात विशाल सर्व्हिस ऑर्गनायझेशन अशी ओळख असलेल्या डिलॉइटचे स्वयंसेवक आणि कंपनीचे पाठबळ लाभलेल्या स्वयंसेवी संस्थांचे विद्यार्थी यांना एका मंचावर आणणा-या डिलॉइट इन इंडियाच्या वार्षिक इम्पॅक्ट डेची दिमाखदार सुरुवात झाली.

 

इम्पॅक्ट डे हा कंपनीच्या वर्ल्डक्लास (WorldClass) या उपक्रमाचा एक भाग असून भारतातील 10 दशलक्ष स्त्रिया मुलींसह जगभरातील 50 दशलक्ष लोकांना 2030 पर्यंत विविध क्षेत्रांत आपले भवितव्य घडविण्याच्या संधीसाठी सज्ज करण्याच्या हेतूने 2017 मध्ये रंजन यांनी स्वत: ही संकल्पना मांडली प्रत्यक्षात आणली आहे.

 

‘’डिलॉइट्सच्या भारतातील कामासाठीच्या माझ्या ध्यासाला माझ्या अनुभवांमधून चालना मिळत असते,‘’ उच्च शिक्षणाच्या माध्यमातून युवा मुलींच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न करणारी स्वयंसेवी संस्था उदयन केअरच्या युवा विद्यार्थिनींशी बोलताना रंजन म्हणाले.आमच्या वर्ल्डक्लास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नांना पाठबळ देतो. हा कार्यक्रम म्हणजे शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याप्रती आमच्या बांधिलकी एक मूर्त रूप आहे. भारतामध्ये आम्ही महिला आणि मुलींवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि या गोष्टीची आम्हाला अत्यंत अभिमान आहे. तेजस्वी, खंबीर मुलींना योग्य संधी मिळाली तर त्यांना साध्य करता येणार नाही अशी एकही गोष्ट नसेल, असा माझा ठाम विश्वास आहे. ‘’

 

 डिलॉइटमधील आपल्या तीन वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीदरम्यान रंजन यांच्या मदतीला आलेले आणि आजही त्यांचा आयुष्याचा अविभाज्य भाग असलेले पाच गोल्डन रुल्स त्यांनी यावेळी सांगितले. ‘’पहिला नियम म्हणजे कष्ट करा. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणची सर्वात ज्ञानी व्यक्ती नसालही कदाचित पण सर्वाधिक कष्ट करणारी व्यक्ती तुम्ही जरूर बनू शकता. दुसरा नियम म्हणजे चुका करायला घाबरू नका. चुकांपासून शिका आणि पुढच्या वेळेला अधिक चांगले काम करा. तिसरा नियम म्हणजे अशा माणसांच्या सान्निध्यात रहा ज्यांचे जगणे तुमच्यासाठी प्रेरणादायी असेल, ज्यांच्यापासून तुम्हाला काहीतरी शिकता येईल. चौथा नियम म्हणजे आपल्या आतल्या आवाजाला नेहमी मोल द्या. इतरांच्या चौकटीत आपण बसतो की नाही याची फारशी चिंता करू नका किंवा इतरांसारखे बनण्याचा प्रयत्नही करू नका. आपल्या मूल्यांना धरून रहा आणि आपल्याला योग्य वाटणा-या गोष्टींच्या बाजूने मोकळेपणाने बोला. पाचवा आणि अखेरचा नियम म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या संधी आपल्या मागून येणा-या व्यक्तींनाही मिळाव्यात यासाठी प्रयत्न करा. याचा अर्थ तुम्ही स्वत:ची प्रगती साधत असताना इतरांनाही पुढे येण्याची संधी देण्याचे मार्ग शोधत रहा. खरा, शाश्वत बदल याच गोष्टींनी साध्य होतो.‘’

रंजन यांचे विचार ऐकायला उपस्थित सर्व विद्यार्थिनी या उदयन केअरतर्फे चालविल्या जाणा-या आणि डिलॉइट इंडियाच्या पाठबळाने दिल्या जाणा-या उदयन शालिनी फेलोशिप ही पाच वर्षांची शिष्यवृत्ती मिळविणा-या युवती होत्या. ही शिष्यवृत्ती व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक यशावर लक्ष केंद्रित करते व शिष्यवृत्तीधारक युवतींचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच त्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या हेतूने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. रंजन यांनी श्रोतृवर्गाला सांगितलेल्या स्वानुभवांनुसार त्यांच्या स्वत:च्या कारकिर्दमधूनही सुजाणपणे केलेली करिअरची निवड व त्यातून मिळालेली प्रतिष्ठेच्या पदांवर काम करण्याची मिळालेली संधी याच गोष्टींचे महत्व अधोरेखित होते.

 

विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर कारकिर्द घडविण्याच्या संधी खुल्या व्हाव्यात यादृष्टीने त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी व अशा संधींसाठी त्यांना सुसज्ज करण्यासाठी डिलॉइट स्वयंसेवकांनी गेल्या सहा महिन्यांपासून 150 हून अधिक व्हर्च्युअल सत्रे घेतली असून, सुमारे 1600 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात तर 6,600 हून अधिक विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्षपणे या सत्रांचा लाभ घेतला आहे. अलीकडेच डिलॉइटच्या महिला स्वयंसेवकांनी उदयन केअरच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनत या प्रयत्नांमध्ये भाग घेतला.

 

डिलॉइट इन इंडियाची इम्पॅक्ट डी व्हर्च्युअल कौशल्याधारित कार्यशाळा भारतातील स्त्रिया आणि मुलांच्या सक्षमीकरणाच्या कंपनीच्या प्रयत्नांना अधिक बळ देते. या कार्यशाळा डिलॉइटच्या वरीष्ठ स्वयंसेवकांद्वारे चालविल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धीचा अधिक दर्जेदार अनुभव मिळतो.

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE