नरोतम सेखसारिया फाऊंडेशनतर्फे 'टोबॅको-फ्री इंडिया ग्रॅण्‍ट्स अॅण्‍ड अवॉर्डस्'च्‍या १०व्‍या पर्वाचे आयोजन

 नरोतम सेखसारिया फाऊंडेशनतर्फे

'टोबॅको-फ्री इंडिया ग्रॅण्‍ट्स अॅण्‍ड अवॉर्डस्'च्‍या १०व्‍या पर्वाचे आयोजन

मुंबई, १० नोव्‍हेंबर २०२०: आज समाप्‍त झालेल्‍या वेबिनारमध्‍ये नरोतम सेखसारिया फाऊंडेशनने (एनएसएफ) 'टोबॅको-फ्री ग्रण्‍ट्स अॅण्‍ड अवॉर्डस - २०२०-२२'च्‍या १०व्‍या पर्वाचे आयोजन केले. या पर्वामध्‍ये देशाच्‍या विविध भागांमधील एनजीओ व वैयक्तिक लीडर्सचा तंबाखू नियंत्रणाप्रती त्‍यांच्‍या अग्रणी योगदानासाठी पुरस्‍कारांसह सन्‍मान करण्‍यात आला. या व्‍हर्च्‍युअल सोहळ्याला इंटरनॅशनल युनियन अगेन्‍स्‍ट ट्यूबर्क्‍यलोसि‍स अॅण्‍ड लंग डिसीजचे आग्‍नेय आशियामधील उप प्रादेशिक संचालक डॉ. राणा जे. सिंग उपस्थित होते. ते या सोहळ्याचे सन्‍माननीय अतिथी होते. तसेच या सोहळ्यामध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या आरोग्‍य व कुटुंब कल्‍याणच्‍या संचालक डॉ. साधना तायडे, सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती पद्मिनी सोमनी, सलाम मुंबई फाऊंडेशनच्‍या विश्‍वस्‍त श्रीमती राजश्री कदम, सलाम मुंबई फाऊंडेशनच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदिना रामचंद्रन आणि नरोतम सेखसारिया फाऊंडेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. मोनिक कामत हे देखील उपस्थित होते.

या पुरस्‍कार सोहळ्याबाबत बोलताना नरोतम सेखसारिया फाऊंडेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. मोनिक कामत म्‍हणाले,''नरोतम सेखसारिया फाऊंडेशनमध्‍ये आमचे व्‍यक्‍तींमध्‍ये सर्वोत्तमतेला चालना देणे, सामाजिकदृष्‍ट्या व आर्थिकदृष्‍ट्या वंचित समुदायांसाठी जीवनाचा दर्जा सुधारणे आणि भारतीय परंपरांना चालना देणे व त्‍यांचे संरक्षण करणे यावर लक्ष केंद्रित आहे. तंबाखू सेवनामुळे आरोग्‍याला निर्माण होणारे धोके जाणून घेत फाऊंडेशन कर्करोग प्रतिबंधावर तितकाच भर देते. तंबाखू नियंत्रण उपक्रमांना पाठिंबा हा प्रमुख हस्‍तक्षेपांपैकी एक आहे. यासंदर्भात आम्‍ही दरवर्षी संस्‍था व व्‍यक्‍तींना तंबाखू नियंत्रण क्षेत्रामधील त्‍यांच्‍या प्रशंसनीय कार्यासाठी अनुदान देतो. यंदा प्रखर निवड प्रक्रियेनंतर आम्‍ही तंबाखू नियंत्रण क्षेत्रामध्‍ये समर्पितपणे कार्य करत असलेल्‍या ५ एनजीओ व १० व्‍यक्‍तींना ओळखून त्‍यांचा सन्‍मान केला आहे.''

इंटरनॅशनल युनियन अगेन्‍स्‍ट ट्यूबर्क्‍यलोसि‍स अॅण्‍ड लंग डिसीजचे आग्‍नेय आशियामधील उप प्रादेशिक संचालक डॉ. राणा जे. सिंग म्‍हणाले "पुरस्कारप्राप्त संस्थांना आणि त्यांच्या यशाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, पण तंबाखू नियंत्रणासाठीच्या लढाईत एनएसएफ आणि एसएमएफने त्यांच्या पुढाकाराने घेतलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करू इच्छितो.कोविड १९ साठी तंबाखू हा जोखीमीचा घटक आहे आणि गेल्या ते महिन्यांत तंबाखू कंपन्या सीएसआर पुढाकाराने आपल्या ब्रांड आणि उत्पादनांचा प्रचार करीत आहेत ज्यात तरूणांचा हस्तक्षेप होता. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीवर काम केले जे कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्राच्या अनुभवातून शिकून इतर राज्यांनाही तेच स्वीकारण्याचा मार्ग दाखविला आहे. तंबाखूचा वापर रोखण्यासाठी तंबाखूच्या ग्राहकांना आधार देण्याची ही एक संधी आहे यावर जोर देण्यासाठी जागतिक चर्चा सुरू आहे. सरकार आणि एनटीसीपीचे मार्गदर्शन तिथे आहे आणि आम्ही एकत्र कसे यावर कार्य करू आणि ते पुढे कसे आणू शकतो यावर भागीदार म्हणून. हे आपल्या सर्वांवर अवलंबून आहे."

नरोतम सेखसारिया फाऊंडेशन तंबाखू नियंत्रणामध्‍ये उल्‍लेखनीय कामगिरी केलेल्या व्‍यक्‍तींना लीडरशीप अवॉर्डस देते. फाऊंडेशन दोन वर्षांपासून त्‍यांच्‍या प्रशंसनीय प्रयत्‍नांना ५०,००० रूपयांच्‍या बक्षीसासह पाठिंबा देत आहे. अधिकतम दहा व्‍यक्‍तींना पुरस्‍कार दिला जातो. शिक्षक, सामुदायिक आरोग्‍य कर्मचारी, डेण्टिस्‍ट्स, डॉक्‍टर्स, सामाजिक कार्यकर्ते इत्‍यादी सारख्‍या विविध पार्श्‍वभूमींमधील व्‍यक्‍तींना या पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

नरोतम सेखसारिया फाऊंडेशन तंबाखू नियंत्रण क्षेत्रामध्‍ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या ना-नफा तत्त्वावरील संस्‍थांना दोन वर्षांपासून १०,००,००० रूपयांचे एनजीओ अनुदान देखील देत आहे. हे अनुदान १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्‍या असलेले ग्रामीण भाग व नगरांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या संस्‍थांवर लक्ष केंद्रित करते. अशा पात्र संस्‍थांना अधिकतम पाच अनुदान पुरस्‍काराच्‍या रूपात दिले जातात.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202