रेनॉ KIGER : तुमचे लक्ष वेधून घेणारी संपूर्णतः नवी, स्मार्ट आणि रोमांचक B-SUV भारतात सादर होत आहे

 रेनॉ KIGER : तुमचे लक्ष वेधून घेणारी संपूर्णतः नवी, स्मार्ट आणि रोमांचक 

B-SUV  भारतात सादर होत आहे


जागतिक बाजारात रेनॉ KIGER SHOW CAR चे आगमन :अशी प्रदर्शनीय कार, ज्यावर रेनॉ KIGER ची बांधणी करण्यात आली आहे आणि डिझाईनच्या बाबतीत या कारशी जवळपास 80% साम्य आहे

भारतात प्रथमच : संपूर्णतः नवे जागतिक उत्पादन ज्याचे सर्वप्रथम भारतीयबाजारात आगमन आणि त्यानंतर अन्य बाजारपेठांत आगमन

अनोखी स्टायलिंग :स्पोर्टी, मर्दानी आणि आधुनिक KIGER show car ने दिलेल्या उदाहरणानुसार रेनॉ KIGER ही एसयूव्हीश्रेणीतील सध्याच्या डिझाईनपेक्षा अग्रगण्य श्रेणी.

यास्मार्ट एसयूव्हीचीरचनाकार्यक्षम CMFA+ प्लॅटफॉर्मवर आधारित: रेनॉ KIGER ने CMFA+ प्लॅटफॉर्मवरआधारित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणूनसर्वाधिक प्रशस्त जागा, केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेस असलेल्या या श्रेणीतील ट्रायबरच्या यशाची पायाभरणी केली.

नव्या जागतिक स्तरावरील इंजिनमुळे ड्रायव्हिंगचा रोमांचकारी अनुभव : रेनॉ KIGER मध्येकार्यक्षमता आणि इंधन किफायतशीरता हे दोन्ही पुरविणारे नवेटर्बो पेट्रोल इंजिन

रेनॉकडूननव्यासंकल्पनामांडणारीआणखीएककार:भारतातरेनॉने सादर केलेल्या क्रांतीकारी उत्पादनांपैकी रेनॉ KIGER हे सर्वात एक नवे उत्पादन असेल. KIGER ही या श्रेणीतील डस्टर, क्विड आणि ट्रायबरप्रमाणेच बाजारपेठेतील सर्व परिमाणेबदलून टाकेल.

 


मुंबई,18 नोव्हेंबर 2020 : उत्पादनांसाठीचे प्रबळ धोरण आणि उत्पादनांमध्ये आमूलाग्रनवप्रवर्तन घडवण्यासाठीची वचनबद्धता याचा भाग म्हणून, रेनॉ इंडिया हे रेनॉ KIGER या नव्याउत्पादनाला बाजारपेठेत आणून त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची श्रेणी आणि विभागांचे विस्तारीकरण करतील. या कारच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व खेळच पालटून जातील. ट्रायबरची बांधणी ज्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे, त्याच प्लॅटफॉर्मवर या कारची बांधणी केली जाईल आणि रेनॉ ग्रुपकडून जागतिक स्तरावर ती सादर केली जाईल. रेनॉ KIGER सोबत रेनॉ आपले नवे जागतिक स्तरावरील इंजिनही सादर करणार आहे.

ग्राहकांना रेनॉ KIGER कडून काय अपेक्षित आहे, हे पाहण्यासाठी रेनॉने KIGER show car  या चे  जागतिकअनावरण केले. या  प्रदर्शनीय कारच्या संरचनेवरच रेनॉच्या नव्या एसयूव्हीची संरचना आणि विकसन करण्यात आले आहे. रेनॉ KIGER show car ही फ्रान्समधील कॉर्पोरेट डिझाईन्स टीम्स आणि रेनॉ इंडिया डिझाईन्स यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आली आहे. रेनॉच्या अन्य सर्व कारप्रमाणेच रेनॉ KIGER show car ची अनोखी आणि आकर्षक संरचना असून, त्यात शहरी आधुनिकता आणि शहराबाहेरही असलेली कार्यक्षमता यांचे दर्शन घडते. रेनॉ KIGER show car चा बाह्यरंग आपला पाहण्याचा दृष्टीकोन आणि उजेडावर अवलंबून असतो आणि एखाद्या जादूप्रमाणे निळा आणि जांभळा असा बदलताना दिसतो. कार्यक्षम आणि आटोपशीर असलेली रेनॉ KIGER show car स्पोर्टी अनुभव देते. कारला द्विस्तरीय प्रभावी प्रकाशयोजना आहे.

रेनॉ KIGER तिच्या अनोख्या रचनेमुळे ओळखली जाईल, KIGER show car च्या जागतिक स्तरावरील आजच्या अनावरणातून त्याचे प्रत्यंतर येईल. KIGER show car ही प्रदर्शनीय कार असून, तिच्यावर रेनॉ KIGER ची बांधणी करण्यात आली आहे. दोघांमध्ये संरचना, बांधणी यांत 80% साम्य आहे. रेनॉ KIGER मध्येविविध स्मार्ट गुणधर्म आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यातील काही तर या श्रेणीतील सर्वोत्तम आहेत. ते या कारची संरचना आणि बांधणीला पूरक असेच आहेत. रेनॉ KIGER सह रेनॉ पूर्णतः नवे टर्बो इंजिनही बाजारात आणणार असून, त्या माध्यमातून ड्रायव्हिंगचा एक अनोखा आनंद मिळेल. हे इंजिन उच्च दर्जाची कामगिरी करणारे असून, आधुनिक आणि कार्यक्षम इंजिन म्हणून एक उत्तम पर्याय आहे.

भारतातील नव्या उत्पादनांच्या योजनेबद्दल रेनॉ इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममिलापल्ली म्हणतात, “रेनॉ KIGER ही आमची पूर्णतः नवी B – एसयूव्ही असून, ग्रुप रेनॉचे ते एक आकर्षक, स्मार्ट आणि उत्साहित करणारे उत्पादन म्हणून ओळखले जाईल. आम्हाला सांगण्यात आनंद होतो की, रेनॉ KIGER जागतिक बाजारपेठेत सर्वप्रथम भारतात उपलब्ध केली जाईल आणि त्यानंतर जगभरातील अन्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध केली जाईल. क्विड आणि ट्रायबरनंतर रेनॉ KIGER ही तिसरी जागतिक कार आहे जी ग्रुप रेनॉकडून पहिल्यांदा भारतात उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतर अन्य बाजारपेठांमध्ये तिचे आगमन होईल. आमच्या भारतविषयक धोरणाचा भाग म्हणून रेनॉ KIGER ला उत्तम प्रलयकारीनाविन्यपूर्णता घेऊन येईल. ही कार या उद्योगातील वाट्यापैकी 50%पेक्षा अधिक वाटा असलेल्याB – सेगमेंटमध्ये सादरकेलीजाणार आहे. त्यामुळे आम्हाला देशभरात आमचे अस्तित्व अधिक ठळक करता येईल. थोड्याच काळात, रेनॉने भारतात 6,50,000 विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढेही रेनॉ KIGER सोबत आम्हाला विकासाचा हा प्रवास करायचा आहे.”

रेनॉ KIGER हे उत्पादन भारतीय आरेखन, अभियांत्रिकी आणि उत्पादन सामर्थ्य यांच्यातील क्षमता दाखवून देईल आणि मेक इन इंडिया मोहिमेसाठीची रेनॉची ठाम कटिबद्धताही दाखवून देईल. ग्रुप रेनॉ नेहमीच नाविन्यपूर्णतेच्या ध्यासाने पछाडलेला असून, उत्पादनांच्या श्रेणीतून ते पुरेसे सिद्धही झाले आहे. रेनॉ KIGER च्या माध्यमातून रेनॉ पुढेही हेच सतत उभारत राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24