दूरसंचार उपग्रह ‘सीएमएस-01’च्या प्रक्षेपणाकरीता ‘पीएसएलव्ही’च्या 52व्या मोहिमेसाठी ‘गोदरेज एअरोस्पेस’ची ‘इस्रो’शी भागीदारी


दूरसंचार उपग्रह सीएमएस-01च्या प्रक्षेपणाकरीता पीएसएलव्हीच्या 52व्या मोहिमेसाठी गोदरेज एरोस्पेसची इस्रोशी भागीदारी

 मुंबई, 18 डिसेंबर 2020 : पीएसएलव्ही-सी50’चा वापर करून सीएमएस-01’ दूरसंचार उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी गोदरेज एरोस्पेसने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेबरोबर (इस्रो) भागीदारी केली आहेअशी माहिती गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉतर्फे आज देण्यात आली. गोदरेज एरोस्पेस हा गोदरेज अँड बॉचा एक व्यवसाय आहे. पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणाची ही 52वी मोहीम होती. या मोहिमेत श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून (एसडीएससी) सीएमएस-01’ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

सीएमएस-01 हा भारताचा 42वा दूरसंचार उपग्रह आहे. 2011 मध्ये अवकाशात सोडलेल्या जीसॅट 12आर या उपग्रहाची जागा तो घेईल. फ्रीक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या विस्तारीत सी-बॅंडमध्ये सेवा पुरविण्याच्या उद्देशाने हा सीएमएस-01 दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. विस्तारित सी-बँडच्या व्याप्तीमध्ये भारतीय मुख्य भूभागअंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांचा समावेश असेल. विकास कंटूर इंजिनांची निर्मिती करून गोदरेज एरोस्पेसने या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रक्षेपणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रक्षेपकाला गती देण्यासाठी आणि इलिट थ्रस्टरमध्ये ही इंजिने वापरण्यात आली होती.

यावेळी बोलताना गोदरेज एअरोस्पेसचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख सुरेंद्र एम. वैद्य म्हणाले, “इस्रोशी भागीदारी करून तिच्या आणखी एका उपग्रहाच्या प्रक्षेपण मोहिमेमध्ये सहभागी होता आल्याचा आम्हाला अभिमान आहे. विकास कंटूर इंजिन आणि उपग्रह थ्रस्टर्स यांचे उत्पादन करून  या प्रक्षेपणात त्यांचे योगदान आम्ही दिले, याचा आम्हाला आनंद आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून हातभार लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जागतिक स्तरावर भारताच्या तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी या मोहिमा महत्वपूर्ण आहेत. इस्रोच्या भावी मोहिमांमध्ये आमचा सहभाग वाढण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.

पीएसएलव्ही  जीएसएलव्ही रॉकेटसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, ‘उपग्रहांसाठी थ्रस्टर आणि अॅन्टीना सिस्टम यासारख्या जटिल प्रणालींच्या उत्पादनात गोदरेज एरोस्पेस कंपनी इस्त्रोरोबर गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सहभागी आहे. गोदरेज एरोस्पेसने प्रतिष्ठित चंद्रयान आणि मंगलयान मोहिमांमध्येही अविभाज्य भूमिका बजावलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.