किराणा, एमएसएमईंची फ्लिपकार्ट होलसेल अॅपला पसंती, 2020 मधील बेस्ट प्राईज कॅश-अँड-कॅरी बिझनेस

 

किराणा, एमएसएमईंची फ्लिपकार्ट होलसेल अॅपला पसंती, 

2020 मधील बेस्ट प्राईज कॅश-अँड-कॅरी बिझनेस

 

   सध्या फ्लिपकार्ट होलसेल अॅपकडून 23 शहरांमध्ये विक्रेत्यांना फॅशन उत्पादने उपलब्ध करून देण्यात येत आहेत, सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाल्यापासून ग्राहक संख्येत 75%ची महिना-ते-महिना वृद्धी नोंदवण्यात आली   

   फ्लिपकार्ट होलसेलकडून लॉन्चपासूनच स्वत:च्या मंचावर 90% पर्यंतची महिना-ते-महिना वृद्धी नोंदवण्यात आली, यामुळे फ्लिपकार्ट ग्रुपवर किराणा विक्रेत्यांचा विश्वास वाढण्यास मदत झाली 

   कोटा, गुंटूर, राजमंड्री, औरंगाबाद, करीमनगर, अमरावतीसारख्या लहान शहरांमधील सदस्यांनी बेस्ट प्राईज कॅश-अँड-कॅरी बिझनेसला पसंती दिल्याचे दिसते, तसेच ई-कॉमर्स पर्याय निवड 10 पटींनी वाढली आहे    

   देशातील नऊ राज्यांमधील टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील सदस्यांच्या बेस्ट प्राईज कॅश-अँड-कॅरी दालनांत एकंदर 95%हून अधिकची विक्री नोंदवण्यात आली    

 

बेंगळूरू 28 डिसेंबर, 2020: देशातील लक्षावधी छोटे विक्रेते आणि शेकडो एमएसएमईंचा ऑनलाईन मंचांवर तसेच डिजीटायजेशनच्या एकंदर विक्री व्यवस्थेवर विश्वास वाढला आहे. सध्याच्या महासाथीच्या आव्हानात्मक काळात सुलभतेने व्यापार करण्याच्या दृष्टीने हे मंच उपयुक्त ठरत आहेत. फ्लिपकार्ट ग्रुपच्या बी2बी बिझनेस – फ्लिपकार्ट होलसेल आणि बेस्ट प्राईज कॅश-अँड-कॅरी स्टोअर्सच्या ई-कॉमर्स व्यापारात 2020 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

फ्लिपकार्ट होलसेल ही फ्लिपकार्ट समूहाची भारतीय बाजारपेठेतील डिजीटल बी2बी मार्केटप्लेस असून तिचा शुभारंभ सप्टेंबर महिन्यांत झाला. 29 बेस्ट प्राईज मॉडर्न होलसेल स्टोअरच्या माध्यमातून लहान किराणा विक्रेत्यांना वृद्धी आणि समृद्धी लाभली आहे, ज्याद्वारे उत्तम किंमतीत वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी उपलब्ध करून देण्यात येते.

यंदा फ्लिपकार्टच्या बी2बी बिझनेसवर वाढत्या ई-कॉमर्स पसंतीविषयी बोलताना फ्लिपकार्ट होलसेल अँड वॉलमार्ट इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले की, भारताचे अग्रगण्य ओमनी-चॅनल बी2बी मार्केटप्लेस म्हणून प्रत्येक लहान किराणा विक्रेत्याला ई-कॉमर्स पर्याय उपलब्ध व्हावा तसेच देशातील प्रत्येक एमएसएमईची वृद्धी व्हावी हाच आमचा प्रयत्न आहे. अचानक निर्माण झालेल्या महासाथीच्या स्थितीमुळे उत्पादन विक्रीला मोठा फटका बसला. या स्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने पुरवठादार आणि खरेदीदार, अशा दोघांनी सुलभ स्वरुपाचे तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स पर्याय निवडण्याचे निश्चित केले. आम्ही टाळेबंदी दरम्यान बेस्ट प्राईजमध्ये अधिकाधिक सदस्यांनी ई-कॉमर्स मंचांवर सहभाग दर्शवावा यासाठी प्रोत्साहीत करीत आहोत. त्यांनी इथे ऑर्डर द्यावी आणि मालाचा पुरवठा व्हावा या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही आमचे बेस्ट प्राईज अॅप तसेच वेबसाईटचे रूप सुधारले असून ते लॉन्च केले. या ई-कॉमर्स पर्यायांना मोठी पसंती मिळालेली दिसते. आमचे सदस्य भराभर ऑनलाईन ऑर्डर देत असून आता हाच ट्रेंड भविष्यात रुजणार आहे. फ्लिपकार्ट होलसेलचे लॉन्च सप्टेंबर महिन्यात झाले. याठिकाणी विक्रेत्यांकडून प्रचंड यश लाभले. इथे एका क्लिकवर फॅशन उत्पादने मागवता येतात. आम्ही सातत्याने किराणा संबंधी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक पर्याय उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे भारतातील बाजारपेठांत एमएसएमईंना अधिक प्रभावीपणे मदत मिळेल. आम्ही आगामी वर्षात देखील या दिशेने कार्यमग्न राहणार आहोत.

डिजीटल हेच भविष्य

फ्लिपकार्ट होलसेल अॅपकडून सध्या फॅशन उत्पादने जसे की, कपडे, फूटवेअर आणि अन्य साहित्य 23 शहरांमधील विक्रेत्यांना देऊ करण्यात येते आहे. त्यांच्या मंचावर अलीकडेच किराणा साहित्य लॉन्च करण्यात आले.

कोविड-19 मुळे फॅशन उत्पादने विकणाऱ्यांना वैविध्यपूर्ण उत्पादनांकरिता प्रवास करण्यावर बंधने आली. फ्लिपकार्ट होलसेल हे पुरुष, महिला, लहान मुलांच्या निरनिराळ्या कपड्यांसाठीचे वन-स्टॉप डेस्टीनेशन आहे. याठिकाणी जयपूर, कोलकाता, मुंबई, कानपूर, दिल्ली, सुरत, आग्रा, तिरुपूरसारख्या भारतातील सर्व फॅशन मंडईंतील शेकडो पुरवठादार एका मंचावर आहेत.  

फ्लिपकार्ट होलसेलवर फॅशन प्रवर्ग पुरवठादारांकडून 50 टक्के महिना-ते-महिना वृद्धी नोंदवली आहे. या मंचावर शुभारंभापासून 2.5 लाखांचे लिस्टिंग झाले. त्यामुळे देशातील एमएसएमईना मुख्य चालना मिळाली. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी त्याकरिता मोठा हातभार लागला. 

भारताच्या विक्रेत्यांची ई-कॉमर्सला पसंती

फ्लिपकार्ट होलसेल अॅप लॉन्च केल्यापासून केवळ काही महिन्यांत मंचावरील महिना-ते-महिना व्यवहाराने 90 टक्क्यांपर्यंतचे यश अनुभवले. लहान शहरांमधील विक्रेत्यांचा ई-कॉमर्स पर्यायाकडे कल वाढत असून हा प्रोत्साहनपर ट्रेंड व्यवसाय सुलभ करणारा ठरतो आहे. वास्तविक फ्लिपकार्ट होलसेलवरील प्रत्येक पाचपैकी एक ग्राहक हा टियर 2 किंवा टियर 3 शहरांमधील आहे.

वर्षभर बेस्ट प्राईज कॅश-अँड-कॅरी बिझनेस हे वाहतूक तसेच लॉजिस्टीककरिता एकत्रित काम करत आहेत, तसेच ई-कॉमर्सच्या रूपात देखील महत्त्वाचे बदल केले. जेणेकरून सदस्यांना कोविड  महासाथी दरम्यान अगदी सुलभतेने ऑर्डरची देवाण-घेवाण करता येईल. परिणामी, ई-कॉमर्स पर्यायांत महत्त्वपूर्ण उलाढालीची नोंद झाली आहे.

बेस्ट प्राईज सदस्यांचा ई-कॉमर्स पर्याय निवडीकडे कल 10 पटीने वाढला. मीरत, कोटा, गुंटूर, राजमुंड्री, औरंगाबाद, करीमनगर, अमरावती आणि विजयवाडासारख्या छोट्या शहरांमधील सुमारे 29 दालनांच्या सदस्यांनी बेस्ट प्राईजमधील ई-कॉमर्सवर मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. भारत ऑनलाईन व्यवहाराला पसंती देत असल्याचा संकेत या व्यवहारातून मिळाला.  

किराणा आहे राजा

सप्टेंबर महिन्यात शुभारंभ केल्यापासून फ्लिपकार्ट होलसेल अॅपवर महिना-ते-महिना 75% ची वृद्धी दिसून आली. ई-कॉमर्स सोबत किराणा व्यापाराला चालना मिळाल्याचे या वृद्धीतून स्पष्ट होते. या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना सुलभ व्यवहार, उत्पादनाची किंमत, पोहोच आणि निवडीला मदत पुरवण्यात येते. 

या महासाथीने व्यापारात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केली. तिरुपती येथे ऑक्टोबर महिन्यात बेस्ट प्राईजने नवीन दालन खुले केले. तिरुपती येथील नव्याने शुभारंभ करण्यात आलेले बेस्ट प्राईज हे देशातील 29 वे दालन आहे. सध्या ते नऊ राज्यांमध्ये अस्तित्वात असून सदस्यत्व नमुन्याद्वारे किराणा, कार्यालये आणि संस्था, त्याप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरर्स (HORECA) ना सेवा उपलब्ध करून देते. तिरुपती येथील नवीन दालन हे विक्रेत्यांना सुरक्षित आणि वेगवान ओमनी-चॅनल पर्याय उपलब्ध करून देते. हे विक्रेते त्यांचे व्यवसाय चक्र अविरत कसे राहील हे पाहत असतात.   

 

यशवंत एमएसएमई

बेस्ट प्राईजचे पुरवठादार हे बहुतांशी एमएसएमई असतात. महामारीमुळे निर्माण झालेल्या विपरीत स्थितीत उद्योजकतेला उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे संधी निर्माण झाल्या. राहुल बजाज हे श्री शक्ती एंटरप्राईजेजचे संचालक असून त्यांनी मागील दशकात बेस्ट प्राईज स्टोअरमध्ये किचनवेअरची विक्री केली. ज्यावेळी महासाथीने जोर धरला, तेव्हा हाताचा स्पर्श न होणारे सॅनिटायजर डिस्पेन्सर तसेच हँड वॉश सोल्यूशन तयार केले. बेस्ट प्राईजमुळे पुरवठादारांना उत्पादन उभारणीच्या टप्प्यात तांत्रिक अंदाज आणि व्यावसायिक दृश्यता लाभली. सारंगी क्रिएशन्सच्या बबिता गुप्ता यांनी बेस्ट प्राईज स्टोअर्समध्ये बेडशीट तसेच उशांची कव्हर्स विकली. त्यांच्या कारखान्यात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त कपड्यांतून टाळेबंदी दरम्यान मास्क तयार केले. सागर आशिया प्रायव्हेटचे अनंत सागर हे शिड्या पुरवठादार आहेत. त्यांनी निर्जंतुकीकरण बोगदे आणि कोविड तपासणी बूथ तयार करून स्थानिक रुग्णालयांना त्यांचा पुरवठा केला. महासाथीचे आव्हान असूनही फ्लिपकार्ट होलसेल आणि रिटेल संस्था यांचे परस्पर संबंध एमएसएमईंना आत्मनिर्भर बनवण्यात साह्यकारी ठरले.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24