हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड ने आपल्या 3000 व्या आऊटलेट्सचा टप्पा गाठला

 महाराष्ट्रातील, नवी मुंबई येथील खारघरमध्ये “ एचएपी डेली” नामक आऊटलेट सह 

हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड ने आपल्या  3000 व्या आऊटलेट्सचा टप्पा गाठला 

 



2 डिसेंबर 2020, मुंबई, महाराष्ट्र: हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड (एचएपी), भारतातील, खाजगी क्षेत्रातील एक अग्रगण्य डेअरी कंपनी, ज्यांनी महाराष्ट्रातील, नवी मुंबई मधील खारघर भागात आपल्या 3000 व्या एचएपी आऊटलेट चा शुभारंभ केला.  असंख्य अशा ग्राहकांचा आपल्या दर्जेदार अशा उत्पादनांनी विश्वास जिंकत, एचएपी डेली ने आपल्या हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेडच्या मार्फ़त दुध, दुग्धजन्य पदार्थ आणि आईस्क्रीम्ससारख्या वस्तू ग्राहकांना सहजतेने उपलब्ध होतील याची काळजी घेतली आहे. 


एचएपी ने आपल्या रिटेल उद्योगाबाबतीत एका तत्वाचे पालन कायमच केले आहे, ते म्हणजे ताजी आणि गुणवत्ता पुर्ण उत्पादने नेहमीच एचएपीच्या डेली आऊटलेट्समध्ये उपलब्ध असतील, तसेच ग्राहकांना नेहमीच सेवेमध्ये सातत्यता, उत्पादनांची उपलब्धता आणि स्वच्छ आणि आऊटलेटचे चांगले स्वरूप बघायला मिळेल. आऊटलेट्स ही योग्य प्रशिक्षित स्वतंत्र अशा फ़्रॅन्चायझीधारकांनीच चालवावीत असा आमचा मानस आहे. 


या शिवाय अरूण आईस्क्रीम्सच्या संपूर्ण श्रेणीसह, एचएपी डेली आऊटलेट्समध्ये उपलब्ध असलेली उत्पादने म्हणजे, आरोक्य मिल्क, अरूण आईस्क्रीम्स, हॅटसन- दही, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, योगर्ट शेक्स, तूप, बटर, स्कीम्ड मिल्क पाऊडर आणि डेअरी व्हाईटनर्स. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीसह एचएपी डेली आऊटलेट्स द्वारे आपल्या अवाक्यातील इतर दुकानांमध्ये देखील आपली उत्पादने ठेवेल ज्यामुळे जास्तीत जास्त उत्पादने ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील आणि ब्रॅन्ड देखील सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. फ़्रेन्चायझींची वाढ होण्याकरता रिटेल आऊटलेट्सद्वारे विकासाच्या संपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या जातात.  


आपल्या 3000 व्या एचएपी आऊटलेटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड, चे संचालक श्री. आर जी चंद्रमोगन म्हणाले, “एचएपी डेअरी उत्पादनांची मागणी वाढत असून आपल्या विकासामुळे ग्राहकंचा आमच्या उत्पादन श्रेणींच्या गुणवत्तेवरती विश्वास देखील बसतो आहे, हे यावरून स्पष्ट आहे. रिटेल आऊटलेट चा विस्तार हा हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेडच्या विकासाची निती असून, त्यांचा दृष्टीकोन हा लोकांपर्यंत डेअरी उत्पादने ही आपल्या उच्च गुणवत्तेसह नेण्याचा आहे. महाराष्ट्रासह इतर भागातील रिटेल संख्यांमध्ये होणारी वाढ ही एचएपी करता एक चांगली बाब असून यामुळे सोलापूर, महाराष्ट्र येथील आपल्या युनिटमधील उत्पादनांच्या क्षमतांमध्ये अपेक्षित कमिशनिंगसह वाढ होण्यास मदत मिळेल. 


एचएपीचा मानस हा उत्तम दर्जेदार उत्पादनांमुळे देशभरातील घरा घरात आपले नाव कमाविण्याचा आहे. हे ध्येय साध्य करत असताना, एचएपी आपल्या अस्तित्वात असलेल्या बाजारातील स्थानासह नव नवीन ठिकाणी आपले स्थान बळकट करण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. म्हणूनच एचएपी ला नवीन बाजारपेठांच्या ठिकाणी जसे महाराष्ट्र, केरळ, ओरिसा आणि छत्तीसगढ येथे आपली पकड मजबूत करायची आहे तसेच तमिळनाडू, कर्नाटक, अंध्रप्रदेश, तेलंगाना, पॉंडेचेरी आणि गोव्यासारख्या ठिकाणी आपले खोलवर रोवलेले पाय अधिक मजबूत करायचे आहेत. एचएपीचे ध्येय हे भारतीय डेअरी उद्योगाच्या रिटेल विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24