कापड, कपडे आणि चैनीच्या वस्तू उद्योगातील आशियामधील सर्वात शाश्वत कंपनी म्हणून ABFRL चा एसअँडपी ग्लोबल सीएसए 2020 कडून गौरव


कापड, कपडे आणि चैनीच्या वस्तू उद्योगातील आशियामधील सर्वात शाश्वत कंपनी म्हणून ABFRL चा एसअँडपी ग्लोबल सीएसए 2020 कडून गौरव

 

·       ABFRL चा जगात 8 वा तसेच उदयोन्मुख बाजार आणि आशियात पहिला क्रमांक  

·       कापड, कपडे आणि चैनीच्या वस्तू उद्योगात 85 टक्के वाटा

·       मागील वर्षीच्या तपासणी चक्रात 7 टक्क्याने सुधारणा

 

मुंबई, 30 डिसेंबर 2020 आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (ABFRL), हे फॅशन तसेच रिटेल क्षेत्रातील शक्तिस्थळ असून तिचा एसअँडपी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनबिलिटी असेसमेंटआवृत्ती 2020 मध्ये कापडकपडे आणि चैनीच्या वस्तू उद्योगात आशियातील सर्वात शाश्वत कंपनी म्हणून पर्यावरणीय, सामाजिक तसेच नियमन कामगिरीकरिता जगात 8 वा क्रमांक पटकवला आहे. डॉव्ह जोन्स सस्टेनबिलिटी इनडायसेस (डीजेएसआय)करिता इतरांमध्ये,  कंपनी निवडीकरिता सीएसएच्या पद्धतीचा वापर करण्यात येतो.

यावेळी बोलताना ABFRL चे व्यवस्थापकीय संचालक आशिष दीक्षित म्हणाले कीएसअँडपी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनबिलिटी असेसमेंटआवृत्ती 2020 मध्ये कापडकपडे आणि चैनीच्या वस्तू उद्योग प्रवर्गात ABFRL चा आशियात पहिला क्रमांक लागतो हे सांगताना आनंद होतो आहे. आम्ही कायमच ABFRLमध्ये आर्थिक, प्रशासकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांचे जतन केल्याची ही पोचपावती म्हणावी लागेल. मागील दशकात फॅशन आणि रिटेल उद्योग क्षेत्रात शाश्वत कार्यपद्धतीला चालना देण्यात ABFRL ही संस्थापक ठरली. एक जबाबदार संघटना म्हणून उद्योगक्षेत्रात विचार निर्मिती आणि शाश्वत पद्धतीला चालना देण्याचा आमचा मानस आहे.”

SAM हा एसअँडपी ग्लोबलचा भाग असून ईडॉर्डो गाई हे व्यवस्थापक संचालक आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले कीकॉर्पोरेट सस्टेनबिलिटी असेसमेंट (सीएसए) 2020च्या आधारे कापड, कपडे आणि चैनीच्या वस्तू उद्योगात सर्व आशियाई कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडकरिता सर्वाधिक गुण मिळवणारी कंपनी ठरली तसेच जागतिक उद्योग क्रमवारीतही आठवे स्थान पटकावलेयाकरिता आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. तुमच्या उद्योग क्षेत्रात शाश्वत नेतृत्वाचे हे प्रतिबिंब ठरले. 2020 कॉर्पोरेट सस्टेनबिलिटी असेसमेंटमध्ये विक्रमी संख्येने कंपन्या सहभागी होत असतात. त्यात नाव सामील झाल्यास तुमच्या कंपनीचे वेगळेपण सिद्ध होते. अवतीभोवतीचे लोक आणि या ग्रहाविषयीच्या तुमच्या वचनबद्धतेला प्रशस्ती मिळते."

 

दरवर्षी जागतिक कंपन्यांचे गुणांकन करण्यासाठी एसअँडपी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनबिलिटी असेसमेंट पद्धतीचा अवलंब केला जातो. कंपन्यांना त्यांच्या ईएसजी कामगिरीच्या आधारे क्रमवारी देण्यात येते. ABFRL गुणांकन हे कॉर्पोरेट नियमन तसेच आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक पैलूंवर आधारीत द्रष्टेपणा, अविरत प्रयत्न, बचनबद्धता आणि कार्यक्षम शाश्वत कामकाज आदी गुणांचे प्रतिबिंब म्हणावे लागेल.   

या इलेक्ट्रोनिक संभाषणात समाविष्ट माहिती ही संबोधित करण्यात आलेली व्यक्ती किंवा एंटीटीच्या व्यक्तिश: उद्देशाशी निगडीत आहे. यामध्ये मालकी, गोपनीय आणि/किंवा कायदेशीर माहितीचा समावेश असू शकतो. कोणतेही पुनरावलोकन, पुन:हस्तांतरणप्रसार/प्रचार, मुद्रण, नक्कल अथवा अन्य वापर किंवा लक्ष्यित प्राप्तीकर्त्याशिवाय अन्य व्यक्ती अथवा कंपनीने माहितीचा वापर करणे प्रतिबंधित आहे. तसे झाल्यास हे कायद्याचे उल्लंघन ठरेल. जर कोणतेही संभाषण चुकीने तुमच्यापर्यंत पोहचल्यास संदेश/त्याच्या प्रती तसेच ई-मेल जोड-पत्र (अटॅचमेंट) कायमस्वरुपी काढून टाकावी/ डिलीट करावी. तसेच आम्हाला त्वरीत ईमेल अथवा फोनवरून संबंधित प्रकारची माहिती कळवावी. या संदेशातील मजकूर आदित्य बिर्ला ग्रुपचे विचार किंवा धोरणांचे प्रतिनिधित्व करतोच असे नाही. आदित्य बिर्ला ग्रुप कंपनी व्हायरसकरिता ई-मेल तसेच अॅटचमेंट स्वीप करू शकते. मात्र त्यामुळे व्हायरस-मुक्ती मिळेल याची हमी देता येणार नाही. ई-मेल किंवा अटॅचमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस नाही याची खातरजमा संदेश प्राप्तकर्त्याने करावी.  व्हायरसमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी आदित्य बिर्ला ग्रुप जबाबदार असणार नाही.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202