दालमिया पोलिप्रो इंडस्ट्रीज (दालमिया) या प्रमुख प्लास्टिक रिसायकलर कंपनीला भारतातील चक्रीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्क्युलेट कॅपिटलकडून निधी प्राप्त

 दालमिया पोलिप्रो इंडस्ट्रीज (दालमियाया प्रमुख प्लास्टिक रिसायकलर कंपनीला भारतातील चक्रीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्क्युलेट कॅपिटलकडून निधी प्राप्त

   जागतिक फॅशन तसेच आघाडीच्या ग्राहकोपयोगी ब्रॅण्ड्सना उच्च दर्जाची उत्पादने पुरवणाऱ्या दालमियानेप्राप्त झालेल्या निधीच्या जोरावर२०२५ पर्यंत रिसायकलिंग क्षमता तिप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले

   नवीन सुविधा आणि तंत्रज्ञानांच्या माध्यमातून तसेच मूल्यवर्धित उत्पादनश्रेणीउदाहरणार्थबॉटल-टू-बॉटल सायकलिंगसारखी फूड-ग्रेड उपयोजनेयांच्या माध्यमातून वाढ साध्य केली जाणार

   भारतातील कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंग उद्योगाच्या कायापालटाच्या उद्देशाने आपल्या १०६ डॉलर्स निधीपैकी निम्मा भारतात गुंतवण्याच्या सर्क्युलेट कॅपिटलच्या वायद्याचा भाग म्हणून दालमियाला निधीपुरवठा

मुंबईडिसेंबर२०२०महासागरात प्लास्टिक टाकले जाण्यास प्रतिबंध करण्यावर तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेला बढावा देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सर्क्युलेट कॅपिटल या सिंगापोर-स्थित गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने मुंबईस्थित दालमिया या बाजारपेठेतील आघाडीच्या व शाश्वततेवर भर देणाऱ्या पीईटी व पोलीओलिफिन रिसायकलर कंपनीमध्ये सर्क्युलेट कॅपिटल ओशन फंडाद्वारे (सीसीओएफधोरणात्मक गुंतवणूक केल्याची घोषणा आज केलीपेप्सीको (त्यांचे पहिले गुंतवणूकदार), प्रॉक्टर अँड गॅम्बलडोडॅनोनचॅनेलयुनिलिव्हरदि कोका-कोला कंपनी आणि चेव्हरॉन फिलिप्स केमिकल्स यांच्या भागीदारीतून स्थापन झालेला सीसीओएफ हा दक्षिण तसेच आग्नेय आशियातील समुद्रांमधील प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करणारा जगातील पहिला गुंतवणूक निधी आहे.

पॉलीथिलीन टेरेफ्थलेट (पीईटीप्लास्टिक हा प्लास्टिक बाटल्यांच्या स्वरूपात सर्वाधिक आढळणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण भारतातील एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या १० टक्के आहेयातील ९० टक्के कचरा गोळा केला जातो आणि रिसायकल केला जातो[1] तरी रिसायकल झालेला पीईटी उच्च दर्जाचा नसतोत्यामुळे तो केवळ एकदा पुन्हा वापरता येतो आणि त्याचा प्रसार मर्यादित होतोतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीईटी डाउनसायकलिंगच्या पारंपरिक पद्धतींपलीकडे जाऊनदालमिया उच्च दर्जाचा रिसायकल्ड पीईटी तसेच पोलिओलेफिनचे फ्लेक्स तसेच ग्रॅन्युअल्स (दाणेनिर्माण करतेत्यांचा उपयोग वस्त्रनिर्मिती तसेच पॅकेजिंग उद्योगात होतोकंपनीचे साहित्य जगातील विख्यात तयार कपड्यांचे ब्रॅण्ड्स तसेच पॅकेजिंग उत्पादकांद्वारे वापरले जातात.

दालमियाने १५ वर्षांत १२०,००० मेट्रिक टन्स प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग केले आहेहे वजन २,६०० हम्पबॅक व्हेल्सच्या[2] वजनाहून अधिक आहेयेत्या पाच वर्षांत ही क्षमता तिप्पट करण्याची कंपनीची योजना आहेदालमियाचे दर्जेदार साहित्य जागतिक रिसायकलिंग मानकांची त्याचप्रमाणे युरोपीय संघातील रीच नियमांची पूर्तता करणारे आहेत्याचप्रमाणे आयएसओचीही पूर्तता करणारे आहे.

दालमियाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य दालमिया या गुंतवणुकीबद्दल म्हणालेभारतातील प्रमुख पीईटी रिसायकलर म्हणून आमचा भर नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावर असतोयामुळे ग्राहकांना सातत्यपूर्ण व खात्रीशीर साहित्य पुरवण्याची क्षमता आम्हाला प्राप्त झाली आहेदेशात फूड-ग्रेड उपयोजने विकसित करण्याच्या मार्गाचे नेतृत्व करण्यासाठी आम्ही सक्षम आहोतयामुळे आम्ही गोळा करत असलेल्या प्लास्टिकला सर्वोत्तम मूल्य प्राप्त होत आहेसर्क्युलेट कॅपिटलच्या सहाय्यामुळे आम्ही आमची रिसायकलिंग क्षमता वाढवू शकू आणि पर्यावरण व संपूर्ण मूल्य साखळीच्या लाभासाठी प्लास्टिक पुनर्वापराच्या क्षमतांचा विस्तार करू शकू.”

सर्क्युलेट कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब काप्लान या गुंतवणुकीबद्दल म्हणालेप्लास्टिकचा फेरवापर वाढवून तसेच फूड-ग्रेड उपयोजन क्षमता विकसित करून दालमिया कचरा व्यवस्थापन व रिसायकलिंग उद्योगाचा कायापालट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक मूल्य निर्माण करण्याच्या पलीकडे जात कंपनीने शाश्वततेवर लक्ष केंद्रित केले आहे आणि स्थानिक समुदायांना कंपनी सहाय्य करत आहेत्यामुळे लक्षणीय पर्यावरणविषयक तसेच सामाजिक लाभाची निर्मिती होत आहेआमच्या सहयोगींच्या साथीने दालमियाला त्यांच्या वाढीच्या प्रवासात मदत करणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे.”

आजपर्यंत सर्क्युलेट कॅपिटलने प्लास्टिक प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी तसेच भारतात प्लास्टिक कचऱ्याची चक्रीय अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी समर्पितपणे काम करणारा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्याच्या उद्देशाने ३९ दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचा वायदा केला आहेया पोर्टफोलिओमध्ये सहा स्थानिक छोट्या व मध्यम उद्योगांचा (एसएमईसमावेश होतोहे उद्योग कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील आद्य उद्योग आहेत आणि रिसायकलिंग मूल्यसाखळीत वेगळे प्रयोग करत आहेतत्याचप्रमाणे भारतातील व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी तसेच परिसंस्थेतील कमकुवत जागांवर उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवून उद्योगक्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट पोर्टफोलिओपुढे आहेया व्यवस्थेत विखंडनशोध घेण्याची अपुरी क्षमता व रिसायकल्ड साहित्याचा निकृष्ट दर्जा हे दोष आहेततीन प्रमुख नवोन्मेषकारी धोरणांच्या माध्यमातून हे केले जाणार आहेकचऱ्याचे रूपांतर मूल्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अपसायकलिंग (ल्युक्रो प्लास्टिकलश्रीचक्र पोलिप्लास्टरिक्रॉन व दालमिया); डिजिटायझेशन वाढवणे (रेकीकॅलआणि संग्रह व वर्गवारीचे प्रमाण वाढवणे (नेप्रा रिसोर्स मॅनेजमेंट).

सीसीओएफच्या गुंतवणुकीतून पुरवले जाणारे संप्रेरक भांडवल क्षमता विस्तारासाठी निधी पुरवतेयामुळे पोर्टफोलिओतील कंपन्यांना वाढीचा पुढील टप्पा साध्य करण्यासाठी मदत होतेवित्तपुरवठ्यासोबतच सर्क्युलेट कॅपिटल मेंटॉरशिपतंत्रज्ञानातील कौशल्य यांच्या स्वरूपात मदत करतेतसेच मूल्यसाखळीमधील आपल्या अन्य सहयोगींची ओळख पोर्टफोलिओतील कंपन्यांना करून देतेजेणेकरून त्यांची वाढ दीर्घकाळ जोमाने होत राहील.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24