‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे फॅब५ कलेक्शन सादर

 ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे फॅब५ कलेक्शन सादर

पुणे, 13डिसेंबर २०२० : वर्ष २०१९ मध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे वर्ष २०२० साठीचे ‘फॅब कलेक्शन’ सादर करण्यात आले आहे. ‘फॅब कलेक्शन’ हे किफायतशीर व मूल्यांवर आधारित आहे. हे कलेक्शन पुणे, मुंबई व गोवा येथील निवडक स्टोअर्समध्ये ४ डिसेंबर २०२०पासून स्टॉक असेपर्यंत उपलब्ध असेल.

‘फॅब५ कलेक्शन’ हे प्रत्येक महिलेच्या ज्वेलरी बॉक्ससाठी लागणारे एक अचूक, एकत्रित कलेक्शन आहे. त्यामध्ये हिरेजडित नेकलेस, पेंडंट, इअर रिंग्स, रिंग व ब्रेसलेटचा समावेश आहे. या कलेक्शनमधील डिझाईन्स समकालीन असून त्यामध्ये ९ विविध स्टाईल्स आणि सेट्सचा त्यात समावेश असून त्याची किंमत १,४९,९९९ रूपये आहे. या सेटमध्ये प्रमाणित फॉरएव्हरमार्क दागिने आहेत. प्रत्येक फॉरएव्हरमार्क दागिन्यामध्ये मध्यस्थानी ०.०८ कॅरेटचे डायमंड असून महिला व दागिन्यांचे सौंदर्य प्रतिबिंबित करते.

फॉरएव्हरमार्क डायमंड्स हे जगातील सर्वांत काळजीपूर्वक निवडलेले हिरे आहेत. ‘पीएनजी ज्वेलर्स’ हे हिऱ्यांच्या दागिन्यांमधील कलाकुसर आणि उच्च गुणवत्ता व मानकांसाठी ओळखले जातात. हे दोन ब्रँडस गेल्या काही वर्षात एकत्रित आल्याने एक उत्तम सहयोग जुळून आला आहे. यामुळे सर्वांत आकर्षक, दुर्मिळ व निवडक डायमंडसच्या हमीसह हॉलमार्क डायमंड ज्वेलरी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, आमचे ध्येय हे सातत्याने नावीन्यपूर्ण डिझाईन्स व सेवा आमच्या ग्राहकांपर्यंत पोहचविणे हे आहे. डायमंड ज्वेलरी ही आकर्षक असल्याने व कुठल्याही एका समारंभासाठी सीमित नसल्याने गेल्या काही वर्षात विशेष करून महिलांमध्ये याची वाढती पसंती दिसून येत आहे. हे दागिने कौटुंबिक समारंभ, कामकाजाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही समारंभाला परिधान करता येतात. त्यामुळे ‘फॅब५ कलेक्शन’ ही काळाची गरज आहे. हे किफायतशीर असून महिलांच्या दागिन्यांच्या पेटीमध्ये आवश्यक असणाऱ्या ५ दागिन्यांचे प्रकार यामध्ये आहेत. ‘फॉरएव्हरमार्क’च्या  फॉरएव्हरमार्क प्रमाणित आहेत.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.