रेनो इंडियाच्या वतीने भारतातील दिव्यांगांचे सबलीकरण करणाऱ्या उपक्रमाची घोषणा

रेनो इंडियाच्या वतीने भारतातील दिव्यांगांचे सबलीकरण करणाऱ्या उपक्रमाची घोषणा
मुंबई, 4 डिसेंबर, 2020: रेनो इंडियाने समाजातील समस्त दिव्यांग जनांकडे असलेल्या जिद्दीला सलाम करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत वित्त मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार सवलतीचा 18 टक्के जीएसटी दर देऊ केला आहे. रेनोने आणखी एक पाऊल पुढे घेत देशातील आपल्या सर्व विक्रेता नेटवर्कच्या माध्यमातून अतिरिक्त विशेष विभाग सवलतीचा फायदा उपलब्ध करून दिला आहे. समाजात अनेक दिव्यांग जन विपरीत स्थितीत आव्हानांचा सामना करून संधी निर्माण करत असतात. त्यांच्या जिद्दीला आणि सकारात्मक वृत्तीचा मान राखत रेनोकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
या योजनेतंर्गत रेनो इंडियाच्या सर्व डिलरशीप्सद्वारे दिव्यांग जनांना सवलतीचे जीएसटी दर आणि इंटर्नल कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येईल. तसेच आवश्यक दस्तावेजीकरण यशस्वीपणे करून ग्राहकांना सूट आणि अतिरिक्त डिस्काउंट उपलब्ध करून दिले जाईल. सर्व मॉडेल्सवर कॉर्पोरेट सूट उपलब्ध करून देण्यात येईल, सर्व सब 4-मीटर पेट्रोल वाहने, ज्यांची इंजिन क्षमता 1200 सीसीहून कमी आहे, त्यांच्यावर दिव्यांग व्यक्तींना जीएसटी माफी मिळेल.
या उपक्रमाविषयी बोलताना रेनो इंडियाचे हेड – सेल्स अँड नेटवर्क सुधीर मल्होत्रा म्हणाले की, “आपल्या समाजातील दिव्यांग सदस्य हे महत्त्वाचे सहयोगी असतात. ते नियमित जीवनात संघर्ष करतात, आमच्याकरिता ते मौल्यवान ग्राहक आहेत. आम्ही रेनो इंडियात त्यांच्या वृत्तीला आणि सकारात्मकतेला सलाम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आम्ही त्यांना आमच्या उत्पादनांवर जीएसटी माफीसोबतच अतिरिक्त विशेष सवलती देत आहोत. जेणेकरून आमच्या कार अधिक खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकतील. भारत सरकारने भारतातील दिव्यांगजनांचे आयुष्य सुधारण्याच्या अनुषंगाने जबाबदारी स्वीकारली असून रेनो इंडियाद्वारे या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी तितक्याच जोशाने प्रयत्नशील आहे.”
ग्राहकांना रेनो डस्टरवर रु. 30,000/- ची कमाल सूट मिळेल, तर रेनो क्विड तसेच रेनो ट्रायबरवर रु. 9000 ची रोख सवलत मिळेल. या महिन्यात ग्राहकांसाठी अन्य आकर्षक योजनासुद्धा उपलब्ध आहेत, ज्या कदाचित या सवलतीसोबतच जोडल्या जाऊ शकतात. रेनो ग्रुपकरिता भारत हा प्रमुख 10 सर्वोच्च ग्लोबल मार्केट्सपैकी एक आहे. सर्वाधिक लोकप्रिय ग्लोबल प्रोडक्ट्स त्यांच्या पोर्टफोलियोत आहेत, क्विड हे या ग्रुपचे अग्रेसर उत्पादन असून जगातील सर्वोच्च कार्सपैकी एक मानली जाते. ट्रायबरला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला, ते एक अद्वितीय उत्पादन ठरले. डस्टरने आपला वारसा सुरू ठेवत सर्वोत्तम क्षमतांसोबत आणि वाढीव वैशिष्ट्यांसमवेत एक अस्सल एसयुव्ही म्हणून स्वत:चा ठसा उमटवला. रेनो इंडियाने अलीकडेच ट्रायबर एएमटी, क्विड 1.0एल आरएक्सएल आणि निओटेक एडीशन त्याचप्रमाणे डस्टर टर्बो पेट्रोल रेंज लॉन्च केली. त्यामुळे भारतात रेनो हे नाव अधिक बळकट होण्यास मदत झाली. आपली भक्कम उत्पादन रणनिती तसेच अद्वितीय उत्पादन कल्पकतेविषयीच्या वचनबध्दतेचा भाग म्हणून उत्पादन श्रेणी आणि सेगमेंट अस्तित्वाचा विस्तार आपल्या नवीन गेम-चेंजर रेनो किगर’च्या लॉन्चसह करणार असल्याची घोषणा रेनो इंडियाकडून करण्यात आली.
रेनोचे ड्रायव्हिंग तत्त्व आणि शाश्वत दळणवळण सर्वांसाठी असून या विशेष ऑफर्स त्यांच्या आदर्श विचारातून झळकत असतात.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24