खाताबुकचे 'पगारखाता' अ‍ॅप

 खाताबुकचे 'पगारखाता' अ‍ॅप

~ दुकानदारांना फोनवरच स्टाफची हजेरी आणि वेतन व्यवस्थापनाकरिता मदत करणार ~मुंबई,  डिसेंबर २०२०: भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या फिनटेक स्टार्ट-अप, खाताबुकने   कर्मचा-यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन पगारखाता अ‍ॅप लॉन्च केले. हे अ‍ॅप कार्यबल-संबंधित कार्य जसे की, मासिक/तासानुसार वेतन, रोजगाराचा प्रकार, हजेरी/ सुट्ट्या, वेतनपट, वेतन कॅल्क्यूलेशन, पेमेंट आणि अजूनही बरंच काही डिजिटली व्यवस्थापित करण्यास व्यापाऱ्यांना मदत करते.

पगारखाता अ‍ॅप १३ भाषांमध्ये वापरकर्ता-अनुकूल इंटरफेससह सुसज्ज आहे, ज्यामुळे भाषिक पार्श्वभूमीवर व्यवसाय मालकांना त्रास-मुक्त प्रवेश शक्य होईल. हे अ‍ॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून ते लवकरच आयओएसवर प्रकाशित करण्यात येणार आहे. वेतन व्यवस्थापन आणि हजेरी ट्रॅकिंगच्या कार्यक्षमतेसह, पगारखाता फ्लॅगशिप खाताबुक अ‍ॅपच्या आर्थिक व्यवस्थापन क्षमतांच्या मूळ मूल्याच्या ऑफरचा विस्तार आहे. खाताबुक अ‍ॅपच्या वापरकर्ता बेसमध्ये पगारखाता अ‍ॅप सद्यस्थितीत उच्च ऑरगॅनिक प्रवेशाचा अनुभव घेत आहे.

खाताबुकचे सहसंस्थापक आणि सीईओ रवीश नरेश यांनी सांगितले की 'भारतातील एमएसएमईना डिजिटल स्वरुपात सक्षम बनवण्याच्या आमच्या मोहिमेतील पगारखाता एक पाऊल आहे. कर्मचारी व्यवस्थापन प्लॅटफॉर्म ही डिजिटल जगासाठी नवीन कल्पना नाही. आतापर्यंत, अशा प्लॅटफॉर्मवर केवळ संघटित व्यवसाय आणि कॉर्पोरेट्सच्या गरजा पुरवल्या जायच्या. लहान किराणा स्टोअर्स, सलून, इलेक्ट्रिक शॉप्स यासारख्या व्यापा-यांना त्यांचे कार्यबल व्यवस्थापित करण्यासाठी डिजिटल उपायाची आवश्यकता असते.’ 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.