भारताच्या सर्वांत मोठ्या इस्पोर्टस् चॅम्पियनशिपचा व्हर्चुअल ग्रँड फिनाले

 भारताच्या सर्वांत मोठ्या इस्पोर्टस् चॅम्पियनशिपचा व्हर्चुअल ग्रँड फिनाले

निवड फेरीमध्ये भारतभरातून ८००० हून अधिक गेमर्सचा विक्रमी सहभाग



१९ डिसेंबर २०२० : ७व्या तैवान एक्सलन्स गेमिंग कप (टीईजीसी) २०२० चा ग्रँड फिनाले आता गेमिंगच्या इतिहासात अधिकृतरित्या नोंदवला गेला असून टीम मार्कोस गेमिंग, बीआय४झी ईस्पोर्टस् आणि युनियन गेमिंग या टीम्स मोठी पारितोषिके जिंकण्यासाठी उत्तम कामगिरी करत आहेत. या तीन टीम्सनी क्लॅश ऑफ क्लॅन्स (सीओसी), काऊंटर स्ट्राइकः ग्लोबल ऑफेन्सिव्ह (सीएसःजीओ) आणि रेनबो ६ सेज (आर६) मध्ये विजय प्राप्त केला आहे.

अनेक चढ उतारांच्या फेऱ्यांनंतर ही चॅम्पियनशिप रविवारी सुरू झाली असून तीन विजेत्या टीम्ससह टीम पुशर्स, २ईझी गेमिंग आणि फुलस्टॉप यांनी तिन्ही गेम्समध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. इंडियन रॉकबाझ, रेकनिंग ईस्पोर्टस्, किरा ईस्पोर्टस् यांनी तिसरे स्थान मिळवले असून टीम ८बिट, रिएक्टिव्ह आणि मॉन्कास यांनी चौथ्या स्थानावर उडी घेतली. यातील मोठ्या समापन कार्यक्रमात जगभरातील ईस्पोर्टसच्या चाहत्यांना १० लाख रूपयांचे प्रतिष्ठित पारितोषिक जिंकण्यासाठी लढणाऱ्या भारतातील काही सर्वोत्तम अ‍ॅथलेट्सना पाहण्याची संधी मिळाली.

सीएस:गोसाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील टीम्सना प्रत्येकी ५०,००० रूपयांची रोख रक्कम मिळाली, रनर अप टीमला १ लाख रूपये मिळाले आणि विजेत्या टीमला २ लाख रूपयांची घसघशीत रक्कम मिळाली. क्लॅश ऑफ क्लान्स आणि रेनबो ६ साठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील विजेत्यांना प्रत्येकी ३७,५०० रूपये, रनर अप टीमला ७५,००० रूपये आणि विजेत्या टीमला १,५०,००० रूपये पारितोषिक मिळाले.

२०२० मध्ये साथीचा आजार सुरू असतानाच्या काळात टीईजीसीने एक खास व्हर्चुअल स्वरूपाचा खेळ सुरू केला, तसेच त्यांनी न्यू नॉर्मलच्या सर्व नियमांचे पालन केले आणि तरीही त्याने मोठे यश संपादन केले. चाहत्यांनी भरलेल्या मैदानात आपल्या विरोधकांचा सामना करण्याऐवजी गेमर्सनी फक्त ऑनलाइन स्वरूपात एकमेकांचा सामना केला आणि त्यात टीम सहभागी होऊन त्यांनी दूरस्थ पद्धतीने एकमेकांशी संवाद साधला.

दरवर्षी टीईजीसीकडून खेळाच्या मैदानात मोठा उत्साह दिसून येतो. यावर्षी परिस्थिती वेगळी होती. यामुळे अॅक्शन कठीण व वेगवान झाली आणि ८००० पेक्षा अधिक गेमर्स प्रत्येकी ५ सदस्यांच्या १,६१० टीम्सच्या स्वरूपात प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते.

यावर्षीच्या टीईजीसीला जगातील काही सर्वोत्तम पुरस्कार विजेत्या तैवानी ब्रँड्सनी पाठबळ दिले होते, जसे एसर, एओरस, एव्‍हेरमीडिया, बेंक, कूलर मास्टर, डी-लिंक, इनविन, एमएसआय, ऑप्टोमा, रिपब्लिक ऑफ गेमर्स, सिलिकॉन पॉवर, टीम ग्रुप, थर्मलटेक, ट्रान्सेंड, एक्सपीजी आणि झॅडेक. या कार्यक्रमादरम्यान काही अद्ययावत उत्पादने प्रदर्शित करण्यात आली, जसे एओरस- आरटीएक्स ३०, एव्हेरमीडियाचा सी५७०डी, बेंक्यूचा ईडब्ल्यू३२८०यू, थर्मलटेक- कोअर पी८ टीजी इत्यादी.

आपल्या स्थापनेपासूनच टीईजीसी ही ई-स्पोर्ट समुदायातील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक ठरली आहे.या सामन्यांनी फक्त एक गेमिंग टूर्नामेंटपासून एक भावनेपर्यंत प्रवास केला आहे, जिथे गेमर्सना अद्ययावत गेमिंग तंत्रज्ञानाचा तसेच अत्यंत व्यावसायिक पातळीवर गेम खेळण्याच्या संधीचा लाभ घेता येतो.

मागील सहा टीईजीसी कार्यक्रमांमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आहे. टीईजीसीने स्वतःसाठी भारताची सर्वांत दीर्घकाळ चालणारी ईस्पोर्ट चॅम्पियनशिपचे नाव मिळवले असून त्यांनी गेमर्सना अटीतटीची स्पर्धा करण्याची संधी दिली आहे. टीईजीसीच्या सीझन ७ चे सर्व प्रकारचे खेळ ऑनलाइन असल्यामुळे त्यात भारतभरातील गेमिंगच्या चाहत्यांना प्राथमिक फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली. पात्रता फेरी २९ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि ती २९ नोव्हेंबर रोजी संपली.

टीईजीसीच्या फिनाले कार्यक्रमात बोलताना टायट्राच्या स्ट्रॅटेजिक मार्केटिंग डिपार्टमेंटचे कार्यकारी संचालक श्री. मार्क वू म्हणाले की,''टीईजीसीच्या सातव्या आवृत्तीसह आम्ही उगवत्या भारतीय ई-स्पोर्टसच्या खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत प्रत्येक आवृत्तीसाठी आम्हाला कायमच भारतातील गेमिंग समुदायाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. टीईजीसीने मागील सात वर्षांपासून ईस्पोर्टसमधील सर्व अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही भारतीय ईस्पोर्टसचे टॅलेंट आघाडीवर नेऊन त्यांना जागतिक व्यासपीठावर चमकण्यासाठी संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सर्वोत्तम गेमिंग उत्पादनांसाठी ओळखले जातो आणि आम्ही आमच्या सहभागींना सर्वोत्तम गेमिंग अनुभव देतो. हे वर्ष जागतिक साथीमुळे वेगळे ठरले आहे परंतु टीईजीसीला तरीही उत्तम कामगिरीद्वारे ईस्पोर्टसच्या क्षेत्रात आपली छाप पाडणे शक्य झाले आहे.''

नवीन व्हर्चुअल फॉर्मेटमुळे गेमर्समध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे. टीम बीआय४झी ईस्पोर्टसमधील मर्झिल म्हणाले की, ''यावेळी लॅनमधील गर्दी आणि वातावरणाची मला आठवण झाली कारण ऑन ग्राऊंड कार्यक्रमात विविध बूथ्सवर आम्हाला विविध धमाल उपक्रमांमध्ये सहभागी होता येत होते. आम्हाला नवीन उत्पादने वापरून पाहण्याची संधीही मिळत होती. तरीही ऑनलाइन उपक्रम हा सर्व कार्यक्रम वेळेवर होऊन अत्यंत सुंदररित्या हाताळण्यात आला. तसेच, हा एकूणच आरामदायी अनुभवही होता.''

बीआय४झी ईस्पोर्स्टमधील त्याची सहकारी रोझीने आपले विचार मांडले. तो म्हणाला की,हा आमच्यासाठी एक खास अनुभव होता कारण आम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांचा अनुभव आला नाही आणि आम्ही आरामात गेम खेळू शकलो. आम्ही खूप कमी नर्व्हस झालो आणि एक चांगला वॉर्म अप व पीसी सेटअप यांच्यामुळे आम्हाला फायदा झाला. मला लॅन अनुभवाची आठवण नक्कीच येते कारण तुमचे चाहते आजूबाजूला असतात आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत वेळ घालवू शकता. पण मला वाटते की, या परिस्थितीशी जुळवून घेण्याची ही वेळ आहे आणि या काळात हा सर्वोत्तम अनुभव होता.''

सीएसःगो आणि सीओसीचा ग्रँड फिनाले ऑफिशियल तैवान एक्सलन्स इंडिया चॅनल्सवर ऑनलाइन ब्रॉडकास्ट करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24