एसबीआय जनरल इन्शुरन्सची महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड सोबत भागीदारी, भारताच्या ग्रामीण भागात विमा वापर वाढविण्यावर भर

 एसबीआय जनरल इन्शुरन्सची महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड सोबत भागीदारी, 

भारताच्या ग्रामीण भागात विमा वापर वाढविण्यावर भर


टियर 2 आणि 3 बाजारांतील जास्तीत-जास्त उपभोक्त्यांपर्यंत आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी भागीदारी; रोजगार निर्मितीला चालना मिळणार

मुंबई, 11 डिसेंबर, 2020: आज एसबीआय जनरल इन्न्शुरन्सच्या वतीने महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड (एमआयबीएल) समवेत धोरणात्मक भागीदारीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या साझेदारी प्रोग्राममार्फत टियर 2 आणि 3 शहरांत विमा प्रवेशाला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे. परिवर्तनशील भारतासाठी सर्वाधिक विश्वासार्ह सर्वसाधारण विमा पुरवठादार होण्याच्या दूरदृष्टीत ही भागीदारी महत्त्वपूर्ण मापदंड ठरेल.

नवीन कार, व्यावसायिक वाहन, ट्रॅक्टर्स आणि वापरलेल्या कारकरिता देखील एसबीआय जनरलने एमआयबीएल सोबत ही भागीदारी केली आहे. या भागीदारीमार्फत ग्राहकांना काही अतिरिक्त सुविधांसह वाहन विमा उपलब्ध होईल. या डिजीटल परिघात एसबीआय जनरलची महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्सच्या पीएव्हायबीआयएमए या डिजीटल मंचासोबत भागीदारी आहे, ज्याद्वारे किफायतशीर विमा पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील.

एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे एमडी आणि सीईओ पीसी कंडपाल म्हणाले की, “वैद्यकीय खर्चांसाठी अनेकांकडे आरोग्य विमा नाही ही एक गोष्ट अलीकडच्या महासाथीत प्रकर्षाने लक्षात आणून दिली. विमा काढण्यात ‘मध्यमवर्गीय’ मागे असतात. त्यांचा शोध घेऊन त्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.

त्यामुळे आमच्या 2 आणि 3 टियर शहरांतील ग्राहकांच्या विमाविषयक गरजांनुसार त्यांना आमच्या धोरणातील सक्रीय घटक बनविण्यासाठी ही भागीदारी आहे. आरोग्य विमाविषयक जनजागृतीच्या दृष्टीने ही भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावेल, याची आम्हाला खात्री वाटते; आणि यामुळे नक्कीच अधिकाधिक व्यक्ती विमा कवचाखाली येतील.”

 महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. जयदीप देवारे म्हणाले की, “आमच्या साझेदारी प्रोग्राम अंतर्गत एसबीआय जनरल इन्श्युरन्स समवेत भागीदारी करण्याच्या दृष्टीने आम्ही उत्सुक आहोत. हा एक समाज-व्यापी उपक्रम असून विमा पुरवठ्यासाठी पॉइंट ऑफ सेल्स पर्सन्स शोधणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रमाणित करणे यासाठी आरेखित केला आहे. जेणेकरून देशात खोलवर विमा प्रवेश होईल. आम्हाला विश्वास वाटतो की, आमच्या एकत्रित प्रयत्नांनी आम्ही आपल्या देशातील लोकांना, प्रामुख्याने दुर्लक्षित आणि सेवांपासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागापर्यंतील लोकांना आरोग्य पॉलिसींविषयक ज्ञान वाढविण्याच्या आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मदत करणार आहोत, ज्या आजतागायत जनजागृतीचा आणि सुविधांचा अभाव यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.”

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.