व्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ

 व्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ

~ २०२० मध्ये १०२ स्टार्टअप्समध्ये केली ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक ~मुंबई, १६ डिसेंबर २०२०: भारतातील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारा व्हेंचर कॅटलिट्स ग्रुप (व्हीकॅट्स) हा कोव्हिड-१९ साथीच्या काळाती पुन्हा एकदा या श्रेणीत २०२० या वर्षातील अग्रेसर लीडर म्हणून पुढे आला आहे. ही मुंबईतील गुंतवणूक संस्था असून ती इन्क्युबेटर व सेबी रजिस्टर्ड अॅक्सलरेटर फंड ९युनिकॉर्न्स चालवते. या संस्थेने मागील ६३ करारांच्या तुलनेत या वर्षी १०२ या सर्वाधिक संख्येने करार केले.

भारतातील लहान शहरांतील स्टार्ट-अप इकोसिस्टिम मजबूत करण्यावर भर असलेल्या व्हीकॅट्सने विविध क्षेत्रातील कल्पनेच्या स्वरुपात असलेल्या तसेच अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या बिझनेसमध्ये यावर्षी ७०० कोटी रुपये सिंडिकेशनद्वारे गुंतवले. २०१९ मध्ये ही गुंतवणूक ५०० कोटी रुपयांची होती.

व्हेंचर कॅटलिट्स ग्रुपचे सह संस्थापक व अध्यक्ष अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “२०२० मध्ये भारत व विदेशातील असंख्य गुंतवणूक संस्थांनी गुंतवणुकीची प्रक्रिया धीमी केली असताना, आम्ही वृद्धी कायम ठेवली. संस्थापकपूरक गुंतवणुकदार या नात्याने विचार केल्यास, प्रत्येक संकट हे संधी घेऊन येत असते, यावर आम्ही विश्वास ठेवतो. अर्थात, आम्ही योग्य मूल्यांकनानुसार नावीन्यपूर्ण व चांगल्या स्टार्टअपची निवड करू शकलो आणि या आशादायी  स्टार्टअप्सच्या पाठीशी उभे राहिलो. ”

अग्रगण्य जागतिक रिसर्च फर्म- ट्रॅक्सन आणि क्रंचबेसच्या आकडेवारीनुसार, व्हीकॅट्सने सुरुवातीच्या टप्प्यातील किंवा कल्पनेच्या टप्प्यातील गुंतवणूक करणाऱ्या संस्थांना मागे टाकले. यात एंजललिस्ट इंडिया, लेट्सव्हेंचर, मुंबई एंजल्स आणि ब्लूम व्हेंचर यांचा समावेश आहे. स्टार्ट-अपमधील निधीत गुंतवणुकीपासून त्यांच्या अस्तित्वापर्यंतच्या सर्व निकषांनुसार ही तुलना करण्यात आली. सलग दुस-या वर्षी व्हीकॅट्सने, जागतिक स्तरावरील १० सर्वात सक्रिय अॅक्सलरेटर्स आणि इन्क्युबेटर्सच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत वायकॉम्बिनेटर आणि टेकस्टँडर्डनंतर कंपनीने तिसरे स्थान पटकावले. तसेच प्लगअँड प्ले, ५०० स्टार्टअप्स, एसओएसव्ही आणि अँटलर ग्लोबल या संस्थांना करार संख्येच्या निकषावर मागे टाकले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.