एनबीएचसी प्रोकॉम लॅबोरेटरीला एकात्मिक एनएबीएल अधिस्वीकृती प्राप्त

 एनबीएचसी प्रोकॉम लॅबोरेटरीला एकात्मिक एनएबीएल अधिस्वीकृती प्राप्त  


प्रोकॉमच्या तृतीय पक्ष निरीक्षण आणि तपासणी सेवांमधील अलीकडील प्रवेशामुळे मौल्यवान ऑफर्समध्ये वाढ 

मुंबई, 16 डिसेंबर, 2020: एनबीएचसी प्रोकॉम ही नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन (एनबीएचसी) चा विभाग असून कापणी-पश्चात एकात्मिक मूल्य श्रुंखला सेवेचा भारतातील अग्रगण्य पुरवठादार आहे. त्यांनी एनबीएएलच्या इंटीग्रेटेड असेसमेंट स्कीमसह FSSAI (फूड सेफ्टी अथोरिटी ऑफ इंडिया), APEDA (अॅग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फुड्स अथोरिटी ऑफ इंडिया) तसेच आयओपीईपीसी (इंडियन ऑईससीड्स अँड प्रोड्यूस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल) अंतर्गत त्यांच्या वाशी, नवी मुंबई येथील लॅबोरेटरीला अधिस्वीकृती प्राप्त झाल्याची घोषणा केली. 9 अधिकृत सिग्नेटरी आणि 13 संमत सँपलर्स सोबत 13 अन्न वर्गात विस्तारलेल्या प्रोकॉम लॅबोरेटरीला ही अधिस्वीकृती प्राप्त झाली आहे.

 यापूर्वीच प्रोकॉमला शेतमाल गुणवत्ता तपासणीकरिता असलेल्या GAFTA द्वारे आयएसओ 17025 (एनएबीएल), आयएसओ 22000 आणि आयएसओ 9001  ची मान्यता मिळाली आहे. या नवीन अधिस्वीकृतीमुळे एनबीएचसीच्या तृतीय पक्ष निरीक्षण आणि तपासणी सेवा व्यवसायाच्या प्रवेशाला संमती मिळाली आहे. सुमारे 1100 ठिकाणी अस्तित्व असलेली, भारतभर 2000 हून अधिक ग्राहकांसमवेत बळकट नाते, शेतमालाचा समृद्ध अनुभव असलेली एनबीएचसी प्रोकॉम सर्विस ऑफरींग समवेत भारतीय शेती समुदायात मूल्य-वर्धित अन्न प्रक्रिया आणि कृषी निर्यातीचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांत आहे.

 एनबीएचसी प्रोकॉमद्वारे निर्मातीकर्ते, आयात-निर्यातदार, विक्रेते आणि देशातील HORECA उद्योगाला विशेष प्रकारची टेस्टींग आणि सॅम्पलिंग उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्याद्वारे त्यांच्या सुरक्षा, सर्वोत्कृष्टता आणि विश्वासार्हता विषयक गरजांची काळजी घेतली जाईल. त्यांचा पुनरावलोकन निकष हा प्रगतशील उद्योग-केंद्री आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन वेगवान शासन प्रक्रियेद्वारे प्रभावीपणे राबविण्यात येतो. एनबीएचसी प्रोकॉम क्वालिटी सिस्टीम आणि तिच्या डिजीटलक्षम प्रक्रिया ग्राहकांना सर्वोत्तम आणि वेगवान, निश्चित वेळेवर निरीक्षण आणि चाचणी सेवा उपलब्ध करून देते.    

 एनबीएचसीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ रमेश दोराईस्वामी म्हणाले की, “एनबीएचसी ही  कापणीनंतरची कृषी-वस्तू पुरवठा साखळीकरिता असलेली सर्वात व्यावसायिक संस्था आहे. प्रॉकॉम ही भारताच्या कृषी समुदायाचे महत्त्वपूर्ण सक्षमीकरण करू शकते, कारण मूल्यवर्धित खाद्यपदार्थाची प्रक्रिया आणि ग्राहकांना वर्धित मानदंडांची पूर्तता करण्यासाठी निर्यातीच्या संधींची अपेक्षा आहे. प्रोकॉम ही एनबीएचसीला एनबीएचसीच्या इतर विभागांसह चालना देण्यासोबतच ऑडिट, मूल्यांकन, चाचणी आणि तपासणी सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना ऑफर देणाऱ्या  विस्तृत पोर्टफोलिओसह पीक पश्चात कृषी मूल्य साखळीत नेतृत्व मजबूत करण्यास मदत करेल”.

 एनबीएचसीचे बिझनेस हेड आणि व्हीपी अजित लागू म्हणाले की, “मेक इन इंडिया अभियान तसेच सरकारच्या शेत निर्यातीबाबतच्या प्रमुख उपक्रमामुळे त्याचप्रमाणे वैश्विक बाजारपेठा आणि नियामक / ग्राहक दर्जा याबाबत भारताच्या अधिक एकात्मिक भूमिकेसह  तपासणी आणि चाचणी सेवा बाजारात महत्त्वपूर्ण वाढ होण्याचा अंदाज आहे. सेवा अतिवापर, अल्प-मूल्य चाचणी, महागड्या चाचणीचा अयोग्य वापर, आयात करणाऱ्या देशांकडून बंदरातूनच माल माघारी पाठवणे, चांगल्या चाचणी पसंतीविषयी असलेल्या पुरवठादार गोंधळासारख्या समस्या एनबीएचसी प्रोकॉमने समजणे फार महत्त्वाचे आहे. आमच्या मूलभूत मूल्यांपैकी एक म्हणजे, अचूकता, चपळता आणि सुरक्षिततेमुळे आम्ही सेवांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलो. आम्हाला विश्वास आहे की या (तृतीय पक्ष तपासणी आणि चाचणी) सेवा निर्यात, किरकोळ, वस्तू, व्यापार, आरोग्यसेवा, खाद्यपदार्थ यासारख्या काही प्रमुख बाबींना मदत करतील. आमच्या ग्राहकांना एकूण गुणवत्ता आश्वासन प्रदान करण्यासाठी आम्ही आमच्या तृतीय पक्ष तपासणी आणि चाचणी सेवांबद्दल आशावादी आहोत.”

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App