फार्मा, इन्फ्रा आणि एफएमसीजी क्षेत्राच्या नेतृत्वात बाजार उच्चांकी पातळीवर

मुंबई, ७ डिसेंबर २०२०: आठवड्याच्या सुरुवातीला प्रगतीचा वेग कायम ठेवत बाजाराने नवा उच्चांक गाठला. बीएसई सेन्सेक्स ३४७.४२ अंक किंवा ०.७७% नी वाढला व ४५४२६.९७ अंकांवर स्थिरावला. तसेच निफ्टी ९७.३० अंक किंवा ०.७३% नी वाढला व १३३५५.८० अंकांवर स्थिरावला. वित्त, फार्मा आणि एफएमसीजी स्टॉक्सनी बाजाराला मजबूत आधार दिला. पीएसयू बँकेचा निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला तर फार्मा, इन्फ्रा आणिएफएमसीजीच्या स्टॉक्समध्ये प्रत्येकी १ टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपनेही प्रत्येकी १ टक्क्यांची वृद्धी दर्शवली.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात सर्वाधिक वृद्धीचा कल कायम ठेवत निफ्टीतील टॉप गेनर्समध्ये युपीएल (४.५६%), अदानी पोर्ट्स (३.५९%), एचयुएल (३.२४%), भारती एअरटेल (३.१९%) आणि कोल इंडिया (२.५५%) चा समावेश झाला. टॉप लूझर्समध्ये कोटक महिंद्रा बँक (१.३६%), जेएसडब्ल्यू स्टील (१.३२%), नेस्ले (१.४४%) आणि एसबीआय लाइफ (१.५१%) चा समावेश झाला.

शेअर्सचा विचार करता, १९७२ शेअर्स हिरव्या रंगात स्थिरावले, ९३६ शेअर्स लाल रंगात तर १९० शेअर्स स्थिर राहिले.

सर्वंकष पुनरावलोकन: एकूणच, एचयुएल, एचडीएफसी, आयटीसी आणि आयसीआयसीआय बँकेने निफ्टीतील नफ्यात निम्म्यापेक्षा जास्त वाटा उचलला. अदानी एंटरप्रायजेसमध्ये तीव्र उलथापालथ दिसून आली. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयनेदेखील निफ्टी बँकेला नफा मिळवून दिला. तर एचडीएफसी बँकेने नकारात्मक कामगिरी करत नफ्यावर मर्यादा आणल्या. निफ्टी मीडियानेदेखील उत्तम खरेदीचा अनुभव दिला. झी एंटरटेनमेंट आणि सन टीव्हीनेही मोठी वृद्धी दर्शवली.

सर्वोच्च पातळीवर असूनही, लसीची प्रगती, आर्थिक सुधारणा, एफआयआयमध्येही मजबूत प्रवाह दिसून आल्यामुळे नजीकच्या काळात देशांतर्गत बाजारात जोरदार प्रगतीची अपेक्षा आहे. प्रत्येक विभागात वर्तुळाकार सहभागाद्वारे खरेदीचा उत्साह दिसून आला. विशेषत: स्टॉकचा विचार करता, योग्य परतावा मिळतो, त्यामुळे या बाबतीत पुढाकार घेण्याचा सल्ला देता येईल.

जागतिक आउटलुक: जागतिक आघाडीवर, ब्रिटन आणि युरोपियन संघादरम्यानच्या ब्रेक्झिटनंतरच्या व्यापारी करारामुळे युरोपियन स्टॉक्सवर परिणाम होत आहे. त्यात काहीशी अस्थिरता आहे. आशियाई बाजारात, हँगसेंग आणि निक्केईचे स्टॉक्स अनुक्रमे १.२३% आणि ०.७६% घटले. तर केओएसपीआयने ०.५१% ची वृद्धी अनुभवली.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth