एल अँड टी सीवूड्स रेसिडेन्सेस – नॉर्थ टॉवरला घरखरेदीदारांचा दमदार प्रतिसाद

  एल अँड टी सीवूड्स रेसिडेन्सेस – नॉर्थ टॉवरला घरखरेदीदारांचा दमदार प्रतिसाद


 

मुंबई, 3 डिसेंबर 2020 – लार्सन अँड टुब्रोच्या स्थावर मालमत्ता व्यवसायाने नवी मुंबईत नॉर्थ टॉवर्स- सीवूड्स रेसिडेन्सेस हा अभिनव शैलीचा निवासी गृहप्रकल्प लाँच केला आहे. या प्रकल्पाला घरखरेदीदारांचा दमदार प्रतिसाद मिळत असून गेल्या केवळ दोन आठवड्यांत 300 जणांनी यात रस दाखवला आहे. यावरून गेल्या वर्षी याच प्रकल्पातील 500 अपार्टमेंट्सची विक्रमी वेळेत विक्री झाली होती व यावर्षीही खरेदीचा तोच उत्साह पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे.

एल अँड टी सीवूड्स रेसिडेन्सेस हा भारतातील पहिल्या ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) – सीवूड्स ग्रँड सेंट्रलचा भाग आहे. जगातील सर्वोत्तम टीओडीजच्या धर्तीवर बनवण्यात आलेले हे केंद्र नवी मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. नव्याने सजवण्यात आलेले रेल्वे स्थानकमुंबईतील सर्वात लोकप्रिय मॉल आणि कॅम्पसमधे असलेल्या मोठ्या कार्यालयीन जागा यांमुळे सीवूड्स रेसिडेन्सेसकडे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले आहेत.

 हा निवासी प्रकल्प सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल आणि रेल्वे स्थानकापासून केवळ काही पावले अंतरावर असून आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासूनही अतिशय जवळ आहे. 10 एकरांच्या जागेत वसलेला हा प्रकल्प नवी मुंबईतील सर्वात उच्चभ्रू प्रकल्प मानला जातो. भावी नागरिकांना इथे गेटेड कम्युनिटीचा आनंद घेता येईल व त्याचप्रमाणे 20,000 चौरस फुटांच्या अत्याधुनिक क्लबसह विविध सुविधांचा लाभ घेता येईल. या परिसरात दुर्मीळ म्हणता येईल असा 3.5 एकरात वसलेला हिरवागार बगिचा इथल्या पोडियमवर तयार करण्यात आला असून त्याबरोबर जॉगिंग ट्रॅक आणि ओपन- एयर अम्फीथिएटरही आहे.

 एल अँड टी रिअलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीकांत जोशी म्हणाले, नवी मुंबईतील आमच्या एल अँड टी सीवूड्स रेसिडेन्सेस येथील नॉर्थ टॉवर्सच्या लाँचला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. यावरून दर्जेदार उत्पादने आणि एल अँड टीसारख्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या ब्रँडला कायमच मागणी असते हे सिद्ध झाले आहे.

 विश्वासार्हता, वितरणाची बांधील वेळबांधकामाचा लयबद्ध वेग आणि अनोखी प्रकल्प संकल्पना यांमुळे नॉर्थ टॉवर्सच्या मागणीला चालना मिळत आहे,’ असेही श्री. जोशी म्हणाले.

 ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी करण्यात आलेला बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि लघुबाजारपेठेच्या आकांक्षा यांच्या मदतीने आम्ही सीवूड्ज  रेसिडेन्सेसमधील नॉर्थ टॉवर्सचे बारकाईने नियोजन आणि रचना केली आहे. या टॉवर्समधे सध्या मागणी असलेल्या प्रशस्त 2 आणि 3 बीएचके अपार्टमेंट्सचा समावेश आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशा पद्धतीने या अत्याधुनिक अपार्टमेंट्सची रचना करण्यात आली आहे.

 मोकळ्या जागा आणि हिरवाई यांचा जास्तीत जास्त वापर होईल अशा पद्धतीने सीवूड्ज रेसिडेन्सेसचे लँडस्केप डिझाइन करण्यात आले आहे. वूड्स बॅगॉटहाँग काँग या जागतिक स्थापत्य आणि सल्लासेवा संस्थेने या प्रकल्पाची स्थापत्य संकल्पना तयार केली आहेतर लँडस्केपचे डिझाइन आंतरराष्रट्रीय लँडस्केप आर्किटेक्ट – डब्ल्यूएएचओ यांनी केले आहे.

 

एल अँड टी सीवूड्स रेसिडेन्सेसने हे सिद्ध केले आहेकी प्रतिकुल व्यावसायिक वातावरण असतानाही जर ब्रँड्सनी योग्य घटकांचा मिलाफ असलेला प्रकल्प वितरणाची बांधील वेळ आणि ग्राहकांच्या मनात चांगले स्थान असलेल्या ब्रँडच्या पाठिंब्यासह दिलातर तो नक्कीच बाजारपेठेत आघाडीवर राहातो.

 

 


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24