ट्रेडइंडिया.कॉम बनला गूगल माय बिझनेसचा मान्यताप्राप्त भागीदार

 ट्रेडइंडिया.कॉम बनला गूगल माय बिझनेसचा मान्यताप्राप्त भागीदार

~ एसएमईंना डिजिटल होण्यासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट ~

मुंबई, २३ डिसेंबर २०२०: देशातील अग्रगण्य ऑनलाइन बी२बी मार्केटप्लेसपैकी एक असा ट्रेडइंडिया.कॉम हा आता गूगल माय बिझनेसचा विश्वसनीय भागीदार ठरला आहे. ही कंपनी आता स्थानिक एसएमईंची नोंदणी त्यांच्या बिझनेस यादीत करू शकते. जेणेकरून त्यांचे बिझनेस गूगल सर्च आणि मॅप्समध्ये दिसू शकतील. प्रसिद्ध गूगल माय बिझनेस व्हर्टिफायर या भूमिकेतून ट्रेडइंडिया आता व्यवसायांच्या ठिकाणी जाऊन खूप कमी वेळेत त्यांना अधिकृतता देऊ शकेल.

एकदा निश्चित झाल्यानंतर व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाबद्दलची माहिती संपादित तसेच अपडेट करू शकतील. तसेच त्यांच्या बिझनेस यादीवर नजर टाकू शकतील. याद्वारे त्यांच्या सध्याच्या व संभाव्य ग्राहकांशीही संवाद साधू शकतील. या प्लॅटफॉर्मवरील कंटेंटमध्ये फोटो, कामाचे तास, ग्राहकांच्या प्रतिक्रिया इत्यादी समाविष्ट असतील. व्यावसायिकांनी त्यांच्या प्रोफाइलला नेमकी माहिती समाविष्ट केली तर संभाव्य ग्राहकांसाठी हा खूप चांगला अनुभव ठरू शकतो.

आज ५.५ दशलक्षांपेक्षा जास्त एसएमई हे ट्रेटइंडियाच्या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा एक भाग आहेत. हे सर्वजण गूगल माय बिझनेस प्रोग्रामवर सविस्तर बिझनेस प्रोफाइल तयार करून ग्राहकांशी जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी साधू शकतील. हाय-क्वालिटी लिस्टिंगद्वारे अधिक फुटफॉल मिळून जास्तीत जास्त बिझनेस डीलची शक्यताही वाढते.

ट्रेडइंडिया.कॉमचे सीओओ श्री संदीप छेत्री म्हणाले. “गूगल माय बिझनेसचा भागीदार म्हणून ओळख मिळणे, हे खरोखरच अभिमानास्पद आहे. याद्वारे स्थानिक व्यवसायांना कस्टमाइज्ड बिझनेस लिस्टिंग तयार करता येतील, जेणेकरून ते गूगल सर्च व मॅपवर दिसतील. या सुविधेद्वारे त्यांची उत्पादने किंवा सेवांची माहिती यावर दिसेल व एकूण ग्राहकांविषयीच्या अनुभवात भर पडेल. यामुळे देशातील असंख्य लघु उद्योगांना प्रत्यक्ष मदत होईल व त्यांना अधिक चांगली व्हिजिबिलीटी व ग्राहकसंख्या मिळेल.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24