ब्रिजस्टोन इंडियाकडून वाहतूक पर्याय प्रस्तावांचे सक्षमीकरण

 

ब्रिजस्टोन इंडियाकडून वाहतूक पर्याय प्रस्तावांचे सक्षमीकरण

टायर मॅनेजमेंट सर्विसेस स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी धोरणात्मक गुंतवणूक 

ट्रक आणि बस रेडीअल्स सेगमेंटमधील ग्राहक सेवा उपक्रमाचे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने गुंतवणूक

 

मुंबई, 16 डिसेंबर, 2020वाहतूक उत्पादनाशी निगडीत अव्वल स्थान पटकावण्याच्या दिशेने आज ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने  वाहन ऑपरेटरना  डिजीटल आधारीत बिझनेस पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या फ्लिका इंडिया प्रा. लि. स्टार्ट-अपमध्ये गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.  त्यामुळे वाहनाचा ताफा बाळगणाऱ्यांना अधिक कार्यक्षम पद्धतीने टायर वापरता येणार आहे. भारतीय बाजारपेठेचे रूप झपाट्याने बदलते आहे. त्यात डिजीटल तंत्रज्ञानाचा शिरकाव मोठ्या वेगाने होताना दिसतो. डिजीटल-आधार असलेल्या व्यावसायिक उत्पादन पर्यायाला ग्राहक प्राधान्य वाढलेले आढळते.  त्यामुळे या परिघात ब्रिजस्टोन इंडियाचे महत्त्व वाढणार ही भागीदारी फायद्याची ठरेल. 

टायरचे व्यवस्थापन करणे सेवा आधारीत आहे. त्यामध्ये डिजीटल वापर शक्य झाल्याने वाहनांचा ताफा बाळगणाऱ्यांमध्ये महत्त्व वाढले आहे. वाहनाच्या टायर खरेदीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर अधिकाधिक वाहनधारकांचा कल “पे पर किलोमीटर” मॉडेलकडे असतो. वाहनांचा ताफा बाळगणाऱ्यांसाठी त्यांच्या कामासाठी मालकीचा एकूण खर्च कमाल होतो. आपल्या ग्राहकांना असे प्रस्ताव देऊ करण्यासाठी फ्लिका इंडियाया क्षेत्रातील  तज्ज्ञ आहे.

भारतात टायर व्यवस्थापन ही एक सेवा म्हणून अजूनही नवजात अवस्थेत आहे; तरीच ग्राहक प्राधान्य देखील बदलते आहे. पारंपरीक व्यवसाय मॉडेल्सनी विकासात व्यत्यय आणला असून एकंदर दळणवळण प्रकार झपाट्याने बदलत चालला आहे. आमचा ब्रिजस्टोन इंडियामध्ये भर हा संस्थात्मक नवीन बिझनेस मॉडेल्सवर आहे. आम्ही वृद्धी योजनांना चालना देण्यासाठी आमचे व्यवसाय पर्याय अधिक भक्कम करत आहोत. भारतातील आमच्या ग्राहकांसाठी ही गुंतवणूक मोठी फायद्याची ठरेल. त्यामुळे गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यात सुधारणा होण्यास मदत होईलअसे ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले. 

या टायर व्यवस्थापन सेवांमुळे अगदी टायर बसविण्यापासून ते तो भंगारात जाईपर्यंत पूर्ण जीवनचक्राचे निरीक्षण शक्य झाले आहे. वाहनाच्या चाकाचे आयुष्य आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी आवश्यक त्या दुरुस्ती वेळेवर सुचवून वाहनधारकांच्या बचतीत वाढ होणार आहे.

फ्लिका इंडियात गुंतवणूक करून शाश्वत दळणवळण तसेच प्रगत उत्पादन पर्यायात वैश्विक नेतृत्व म्हणून उदयला येणे ब्रिजस्टोन इंडियाच्या दृष्टीने नक्कीच अभिमानाची गोष्ट ठरली आहे. ब्रिजस्टोन इंडिया हे नाव आमच्या उत्पादन प्रस्तावांशी जोडले गेले हे आमच्या दृष्टीने आत्मविश्वासाचे प्रतिबिंब आहे.” असे फ्लिका इंडियाचे संस्थापक आणि सीईओ तिकम जैन म्हणाले.

या गुंतवणुकीमुळे फ्लिकाच्या स्थापित पायाभूत सेवेला राष्ट्रीय महामार्गांवर चालना मिळेल, तसेच ब्रिजस्टोन इंडियाच्या सध्याच्या पायाभूत सुविधा गुणवत्ता आणि व्यापक टायर सेवा आणखी बळकट होतील.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth