नव्या युगातील मल्टी टास्कर्ससाठी इन्फिनिक्सने लॉन्च केला 'झिरो ८आय'

 नव्या युगातील मल्टी टास्कर्ससाठी इन्फिनिक्सने लॉन्च केला 'झिरो ८आय'

~ स्मूथ डिस्प्ले, हाय गेमिंग परफॉर्मन्स आणि सुपेरिअर कॅम-याचा अनुभव ~मुंबई, ४ डिसेंबर २०२०: भारतीय ब्रँड बाजारात तीन वर्षानंतर फ्लॅगशिप सीरीज पु्न्हा आणत, इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपच्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने झिरो सीरीजमधील सर्वात प्रॉमिसिंग स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची तयारी केली आहे. नवा रिफ्रेशिंग झिरो ८आय (ZERO 8i) हा मल्टी टास्किंग व्यक्तींसाठी प्राइस सेगमेंटमधील उत्कृष्ट ऑल-राउंडर स्मार्टफोन आहे. हा फोन फ्लिपकार्टवर फक्त १४,९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत मर्यादित कालावधीकरिता उपलब्ध आहे.

इनफिनिक्स झिरो ८आय झिरो सीरीजमधील सर्वात मोठे अपग्रेड असून, त्यात टॉप-नॉच फीचर्स उपलब्ध आहेत. मोहक डिझाइन, उत्कृष्ट गेमिंग परफॉर्मन्ससाठी प्रगत चिपसेट आणि प्रो-लेव्हल फोटोग्राफी मोड्समुळे आकर्षक व गुंतवून ठेवणा-या स्मार्टफोनचा अनुभव ग्राहकांना येतो. हा फोन सिल्व्हर डायमंड आणि ब्लॅक डायमंड या दोन आकर्षक रंगात उपलब्ध आहे.

यात अल्ट्रा-पॉवरफुल मीडियाटेक हेलिओ जी90टी 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर असून त्यात 12एनएम फिनफेटची सुविधा आहे. स्मूथ गेमिंग अनुभवासाठी उत्कृष्ट नेटवर्किंग व रिसोर्स मॅनेजमेंट आहे. स्मार्टफोनला एआरएम माली-जी70 जीपीयूचा सपोर्ट असून सुपर क्लॉक ८००GHz तसेच मीडिया टेक हायपर इंजिन गेम टेक्नोलॉजी आहे. झिरो ८आयमध्ये २५६ जीबीपर्यंत विस्तारणा-या मेमरीसह ३ कार्ड स्लॉट (ड्युएल नॅनो सिम+मायक्रो एसडी) आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड १० वर ऑपरेट होत असून एक्सओएस ७ची सुविधा असल्याने ग्राहकांना अधिक स्मूथपणाचा अनुभव येतो. फोनची सुरक्षितता वाढवण्यासाठी यात एक मल्टीफंक्शनल साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

यात ४८एमपी एआय क्वाड रिअर कॅमेरा असून त्यात अगदी ११९ डिग्री, २एमपी डेफ्थ सेन्सर आणि एआय लेन्सचा परफेक्ट वाइड शॉट घेण्यासाठी ८एमपीचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहेत. यातील सुपर नाइट मोडद्वारे ब्राइट फोटो घेता येतात तर कमी प्रकाशातही कमी आवाजातील व्हिडिओ घेता येतात. दरम्यान, यूझर्स ४के एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडद्वारे ३०एफपीएसला फोर के हाय डेफिनेशन व्हिडिओ शूट करू शकतात किंवा ६०एफपीएसवर एफएचडी व्हिडिओ शूट करू शकतात. यात अल्ट्रा-पॉवर मॅरेथॉन तंत्रज्ञानावर आधारीत एक हेवी ड्युटी ४५०० mAh बॅटरी असून ज्यामुळे अॅपची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाते. त्यामुळे २५ टक्के बॅटरी बॅकअप वाढतो.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.