एमआयटी-डब्ल्यूपीयू अभियांत्रिकी चे अद्ययावत बीटेक अभ्यासक्रम- उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी

 एमआयटी-डब्ल्यूपीयू अभियांत्रिकी चे अद्ययावत बीटेक अभ्यासक्रम- उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी 



उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमि करण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ इंजिनीअरिंग ने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बरोबर करार करत चार नवीन उद्योग-संबंधित अभ्यासक्रम सुरु केले आहेत. 

 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, सीआयएपी चे  मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री प्रवीण व्ही पाटील म्हणाले, “सीआयएपीचा उद्देश विद्यार्थ्यांचे कौशल्य, शैक्षणिक समज आणि त्यांची रोजगार क्षमता यातील अंतर कमी करणे आहे. आम्ही उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी मिटवण्यास मदत करतो.” 

 

भारतीय शिक्षण प्रणालीला वारंवार अप्रचलित अभ्यासक्रमाद्वारे आव्हान दिले जाते ज्यात सतत विकसित होत असलेल्या उद्योगासाठी महत्त्वपूर्ण कौशल्ये आणि कार्यक्षमता प्रदान करण्याचा व्यावहारिक घटक नसतो. अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत व उद्योगास लागू व्हावा, यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेने उद्योग-संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश करून आणि सर्व विद्यार्थ्यांना संगणक अभियांत्रिकी निवडण्यास सक्षम करुन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे.  उद्योग क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार आवश्यक कौशल्ये समाविष्ट करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शैक्षणिक पुनर्रचना देखील केली आहे. ह्या अनुषंगाने,सर्व बीटेक प्रोग्राम्ससह लिनक्स, पायथन, एआय-एमएल, आयओटी आणि डेटा सायन्स सारख्या उद्योग-संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश केला गेला  आहे.  

 

लिनक्स आधारित पायथन प्रयोगशाळा (1 क्रेडिट): Linux based Python Laboratory (1 Credit): या कोर्सच्या शेवटी, विद्यार्थी पायथन वापरण्यास सक्षम होतील. 

 

आयओटी प्रयोगशाळा (2 क्रेडिट्स) Basic IoT Laboratory (2 Credits): यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट गोष्टीत लक्ष केंद्रित करता येईल. 

 अभियंत्यांसाठी डेटा विज्ञान (2 + 1 क्रेडिट्स) Data Science for Engineers (2 + 1 Credits): हे सिद्धांत आणि प्रयोगशाळेतील सराव एकत्र करेल. 


 कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) (2 + 1 क्रेडिट्स) Artificial Intelligence (AI) and Machine Learning (ML) (2 + 1 Credits): विद्यार्त्यांना त्यांच्या डोमेन आणि प्रकल्पांमध्ये एआय आणि एमएल कौशल्ये लागू करण्यास सक्षम करेल. 

उद्योग-शैक्षणिक सहयोग: टीसीएस सह: 

डिजिटल तंत्रज्ञानातील कौशल्यांसह अभियांत्रिकी प्रतिभेची वाढती गरज दूर करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या सहकार्याने संगणक विज्ञान आणि व्यवसाय प्रणाली (सीएसबीएस) या संगणक विज्ञान विषयावरील- ४ वर्षाच्या पदवीधर कार्यक्रमासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे, जो  संगणक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्कूल अंतर्गत चालविली जाईल 

अभ्यासक्रम टीसीएसने तयार केला आहे 

प्रत्येक त्रैमासिक सुरू होण्यापूर्वी, टीसीएसचे शैक्षणिक आणि वरिष्ठ अधिकारी प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण सत्रे घेतील 

टीसीएस त मुल्यांकनांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करून इंटर्नशिप देऊ शकेल  

टीसीएस द्वारे काही विषयांसाठी तज्ञांची व्याख्याने घेण्यात येतील 

टीसीएस विद्यार्थ्यांचे नियमित प्रगती मूल्यांकन करेल 

 बाजारपेठ सज्ज विद्यार्थी:  

या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट हे आहे की विद्यार्थ्यांनी अनालिटिक्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्यूटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज ह्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे जे त्यांना उद्योग-सज्ज करण्यासाठी मदत करतील. एमआयटी-डब्ल्यूपीयू सर्व बीटेक विद्यार्थ्यांना संगणक अभियांत्रिकी निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देत आहे  

 अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अधिष्ठाता,  प्रोफेसर डॉ प्रसाद डी खांडेकर यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांना विकसित होत असलेल्या कौशल्यांकडे आणण्यासाठी, आम्ही बीटेक स्तरावर (minor in computer engineering) संगणक अभियांत्रिकी ऑफर करीत आहोत. सर्व बीटेक प्रोग्राम्स आणि स्पेशलायझेशनचे सर्व पात्र विद्यार्थी (संगणक अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वगळता) यासाठी         निवड करू शकतात. 


एमआयटी पुणे, कोथरूड (एमआयटी-डब्ल्यूपीयू) येथे बीटेक प्रवेश डीटीई सीएपी (DTE CAP) यामधून नव्हे तर स्वतंत्र अर्ज प्रक्रियेद्वारे केला जातो. या प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2020 आहे. 

 

डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी बीटेक कार्यक्रम: 

एमआयटी-डब्ल्यूपीयू येथे बीटेक लेटरल एंट्री, डायरेक्ट सेकंड इयर प्रोग्राम (BTech Lateral Entry, Direct Second Year Program) द्वारे, डिप्लोमा विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधींचा फायदा घेता येईल आणि दुसर्‍या वर्षापासून एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये बीटेक प्रोग्राममध्ये प्रवेश घेता येईल. 

बीटेक लेटरल एंट्री (डायरेक्ट सेकंड इयर) प्रोग्राममध्ये सध्या प्रवेश खुले आहेतः https://apply.mitwpu.edu.in/bts/application.php 

 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती: 

डॉ विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी नेहमीच शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करते. बीटेक विद्यार्थ्यांच्या पहिल्या वर्षासाठी शिष्यवृत्ती, जेईई मेन्स आणि एमएचटीसीईटी प्रवेश गुणांच्या आधारे दिली जाते. 

 एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सध्या बीटेक प्रोग्राम्ससाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारत आहे. 2020 साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.<link> 

एमआयटी पुणे, कोथरूड (एमआयटी-डब्ल्यूपीयू) येथे बीटेक प्रवेश डीटीई सीएपी (DTE CAP) यामधून नव्हे तर स्वतंत्र अर्ज प्रक्रियेद्वारे केला जातो. या प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2020 आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24