नरोतम सेखसारिया फाऊंडेशनतर्फे 'प्रोजेक्‍ट इग्‍नाइट'च्‍या सादरीकरणाची घोषणा

 नरोतम सेखसारिया फाऊंडेशनतर्फे 'प्रोजेक्‍ट इग्‍नाइट'च्‍या

सादरीकरणाची घोषणा

मुंबई, १० डिसेंबर २०२०: शैक्षणिक संस्‍थांना डिजिटली सर्वसमावेशक युगामध्‍ये टिकून राहण्‍यामध्‍ये मदत करण्‍याच्‍या उद्देशाने पाठिंबा व अनुदान देण्‍यासाठी नरोतम सेखसारिया फाऊंडशेनने (एनएसएफ) डिजिटल लर्निंग सोल्‍यूशन प्रदाता डिस्‍प्रझेड आणि प्रमाणित संस्‍था सेण्‍टासोबत सहयोगाने 'प्रोजेक्‍ट इग्‍नाइट' सादर केला आहे. हा प्रकल्‍प फाऊंडेशनला व्‍हर्च्‍युअल शैक्षणिक यंत्रणेला चालना देण्‍यासाठी व्‍हर्च्‍युअल कॅम्‍पस् व लर्निंग मॅनेजमेंट सिस्‍टम (एलएमएस)च्‍या मदतीसह मिश्रित ऑनलाइन व ऑफलाइन स्‍वरूपाला अलंबणारी सक्षम संस्‍था बनवण्‍यासाठी साह्यभूत ठरेल.

'प्रोजेक्‍ट इग्‍नाइट' कोविडनंतरची स्थिती लक्षात घेत तयार करण्‍यात आला आहे, जेथे शैक्षणिक यंत्रणेमध्‍ये आगामी दिवसांत सर्वांगीण बदल होण्‍याचीअपेक्षा आहे. आजच्‍या काळात व्‍हर्च्‍युअल शैक्षणिक यंत्रणा अधिक समर्पक बनत असताना एनएसएफने व्‍यापक, बहुआयामी प्रशिक्षण अनुभव निर्माण करण्‍याच्‍या उद्देशाने एआयची शक्‍ती आत्‍मसात करण्‍याकरिता डिस्‍प्रझेडसोबत सहयोग केला. ते ऑफर करत असलेले व्‍यासपीठ जवळपास त्‍यांच्‍या नावाप्रमाणेच आहे, ते म्‍हणजे - डिप्रझेड. हे व्‍यासपीठ एकाच युजर इंटरफेसमध्‍ये विविध अॅप्सना एकीकृत करण्‍याची सुविधा देते

एनएसएफने सेण्‍टा®सोबत देखील सहयोग केला आहे, जेथे ते ऑनलाइन टिचिंग - टेक्‍नोलॉजी मॉड्यूलवर कोर्स ऑफर करत आहेत. हा ३ वेबिनार्समध्‍ये (सामान्‍यत:) देण्‍यात येणारा सर्वसमावेशक, व्‍यावहारिक कोर्स आहे. या कोर्समध्‍ये तीन व्‍यापक पैलूंचा समावेश आहे - प्रभावी ऑनलाइन अध्‍यापन (तंत्रज्ञान संचालित वितरण पद्धतींचा वापर करत अध्‍यापन कशाप्रकारे परस्‍परसंवादी व सर्वसमावेशक करावे याबाबत सखोल माहितीसह), पाठ नियोजन व वर्गातील संप्रेषण (नियोजनामध्‍ये तंत्रज्ञानाला एकीकृत करण्‍यावर भर देण्‍यासह), विद्यार्थ्‍यांचे मूल्‍यांकन व उपाय (मूल्‍यांकनांचे हेतू आणि तंत्रज्ञान साधने विद्यार्थ्‍यांची चाचणी घेण्‍याच्‍या हेतूला सर्वोत्तम सेवा देण्‍यावर लक्ष केंद्रित, तसेच विद्यार्थ्‍यांना प्रभावी अभिप्राय देण्‍यामध्‍ये, विद्यार्थ्‍यांच्‍या प्रगतीचे विश्‍लेषण करण्‍यामध्‍ये आणि योग्‍य उपाययोजनांचे नियोजन करण्‍यामध्‍ये शिक्षकांना साह्य).

या सादरीकरणाबाबत बोलताना नरोतम सेखसारिया फाऊंडेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. मोनिक कामत म्‍हणाले,''नरोतम सेखसारिया फाऊंडेशनमध्‍ये आमचा भावी दृष्टिकोनाला अवलंबवण्‍यावर विश्‍वास आहे. अध्‍ययनाच्‍या सर्वोत्तम पद्धती अवलंबणे हा पुढे जाण्‍याचा एकमेव मार्ग आहे आणि आम्‍ही ते लवकरच ओळखले आहे. डिप्रझेडसोबतचा आमचा सहयोग अगदी योग्‍य वेळी झाला आहे, जेथे शिक्षक व विद्यार्थ्‍यांना ऑनलाइन लेक्‍चर्सना उपस्थित राहणे, गृहपाठ सादर करणे आणि एकाच इंटरफेसचा वापर अशा विविध कृतींसाठी अनेक अॅप्‍सचा वापर करण्‍यामध्‍ये सघर्ष करावा लागत आहे. या सादरीकरणामुळे प्रत्‍येकाला एकाच समान व्‍यासपीठावर आणण्‍यामध्‍ये मदत होईल. सेण्‍टाचा कोर्स शिक्षकांना दूरस्‍थ अध्‍ययनामधील अध्‍यापन पद्धती समजण्‍यामध्‍ये आणि त्‍यांचे संदर्भ व त्‍यांच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या अध्‍ययन गरजांना साजेशा अशा तंत्रज्ञान साधनांचा उपयोग करण्‍याची पद्धती अवलंबण्‍यामध्‍ये मदत करतो.''

एनएसएफ देत असलेले अनुदान लर्निंग मॅनेजमेंट सिस्‍टमसाठी आणि शिक्षकांना त्‍यांची ऑनलाइन प्रशिक्षण क्षमता सुधारण्‍याकरिता शिक्षक प्रशिक्षणांसाठी सुरूवातीला सेट अप खर्चाच्‍या रूपात असेल. शिक्षण प्रशिक्षण म्‍हणजेच सेण्‍टासह संपूर्ण प्रशिक्षण खर्च फाऊंडेशनने उचलला आहे. नरोतम सेखसारिया फाऊंडेशनचा शिष्‍यवृत्त्या व फेलोशिप प्रोग्राम्‍सच्‍या रेंजच्‍या माध्‍यमातून विद्यार्थी व करिअरच्‍या दिेशेने वाटचाल करणा-या व्‍यावसायिकांना आर्थिक साह्य करत सर्वोत्तमता व नाविन्‍यतेला चालना देण्‍यावर प्रबळ विश्‍वास आहे. फाऊंडेशन फेलोशिप्‍स व चेअर्सच्‍या रेंजच्‍या माध्‍यमातून, तसेच संशोधन, वैद्यकीय व सर्जिकल प्रशिक्षणाला सक्षम करत आणि वास्‍तु वारसाचे जतन करत शैक्षणिक संस्‍थांना देखील पाठिंबा देते. 


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth