भारतातील सर्वात मोठ्या बायोटेक इकोसिस्टीम अनेबलर्स कम्युनिटीची परिषद

 भारतातील सर्वात मोठ्या बायोटेक इकोसिस्टीम अनेबलर्स कम्युनिटीची परिषद


बिराक आणि एसआयआयसी आयआयटी कानपूर यांनी आयोजित केलेल्या वार्षिक इनोव्हेशन शोकेस कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचे 27 नोव्हेंबर 2020  रोजी उद्घाटन करण्यात आले.             

 

बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बिराक) यांनी स्टार्टअप इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर (एसआयआयसी)आयआयटी कानपूर यांच्या सहकार्याने बिग कॉनक्लेव्ह या आपल्या वार्षिक प्रमुख कार्यक्रमाच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या या सहाव्या आवृत्तीची संकल्पना रेसिलियन्स रिडिफाइन्ड अशी असून त्यामधे तांत्रिक तज्ज्ञजागतिक  बिझनेस लीडर्सइनोव्हेटर्स आणि उद्योजक एका समान व्यासपीठावर एकत्र येऊन बिराकने बायोटेक्नोलॉजी इग्निशन ग्रँट (बिग) प्रोग्रॅमद्वारे पथदर्शी संशोधनांचे अनावरण केले जाणार आहे. शुक्रवारी27 नोव्हेंबर रोजी व्हर्च्युअल व्यासपीठावरून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दोन दिवसीय कार्यक्रमाद्वारे संशोधकांना त्यांच्या यशासाठी आवश्यक असलेले स्त्रोत आणि नेटवर्कचे एकत्रीकरण करण्याचे ध्येय आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. जयंत सिन्हा, आमदार आणि माजी केंद्रीय मंत्रीभारत सरकार यांनी बिग कॉनक्लेव्ह 2020 चे प्रमुख पाहुणे म्हणन हजेरी लावली. डॉ. रेणू स्वरूपसचिवजैवतंत्रज्ञान विभागभारत सरकार आणि अध्यक्ष बिराक यांनी पद्म विभूषण डॉ. आरए माशेलकरमाजी संचालक जनरल सीएसआयआर (प्रमुख पाहुणे) यांनी स्टार्ट प्सगुंतवणूकदारपॅनलिस्ट आणि बिराकच्या संशोधन यंत्रणेतील इतर भागिदारांचे स्वागत केले.

प्रमुख पाहुणे जयंत सिन्हा यांनी संशोधन समाजासी प्रोत्साहपर उद्गार काढत उद्योजक आणि यंत्रणेतील इतर भागिदारांनी चीन व जपानसह इतर पाश्चिमात्य देशांनी अवलंबलेल्या विकास मॉडेलपेक्षा वेगळ्या मॉडेलचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे सुचवले. त्यांच्या शब्दांत सांगायचे झालेतर आपल्याला झंडा चौकाच्या समस्या सोडवायच्या आहेतटाइम्स स्क्वेयरच्या नव्हे.

फर्स्टसाइड चॅट सत्रात पद्म भूषण डॉ. अजय चौधरीसहसंस्थापकएचचीएल यांनी उद्योजकांना एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, तुमच्या आकडेवारीवर   कठोर संवेदनशीलता विश्लेषण करणे अतिशय महत्त्वाचे आहेकारण तुमच्या पुढच्या टप्प्यातील पैसे हे तुमच्या महत्त्वाच्या कामगिरीशी निगडीत असतात. हेच तुमच्या गुंतवणुकदारांशी दीर्घकालीन आणि विश्वासार्ह भागिदारी प्रस्थापित करण्याचे सूत्र आहे. काही अनुभवी बोल ऐकवत पद्म श्री डॉ. सौरभ श्रीवास्व यांनी उद्योजकांना जटील नियम किंवा कलमांना घाबरून न पळण्याचे आणि त्याऐवजी खुल्या मनाने त्या अटींमागचे लॉजिक किंवा कारणे लक्षात घेण्याचे आवाहन केले.

 

पहिल्या दिवसाची सांगता अक्सिलॉर व्हेंचर्सचे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे सह- संस्थापक पद्म भूषण श्री. एगोपालकृष्ण व्हॉइस दॅट इनस्पायर्स या खास सत्राने झाले. डॉ. मनीष दिवाणप्रमुखधोरणात्मक भागिदारी आणि औद्योगिक विकासबिराक यांच्याशी झालेल्या संवादात श्री. गोपालकृष्णन कोव्हिड- 19 महामारीमुळे आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रांच्या विकासाला मिळालेल्या चालनेविषयी भाष्य केले. ही चालना टिकून राहावी यासाठी शिक्षण क्षेत्रकॉर्पोरेट्स आणि स्टार्ट अप्स यांच्यात सहकार्याचे वातावरण असल्याची तीव्र गरजही त्यांनी व्यक्त केली.

 

या दिवशी बिराकचा पाठिंबा लाभलेल्या नॅनोसेफ सोल्यूशन्समायक्रोगो एलएलपी आणि एयु डिव्हाइसेस यांनी आपल्या चिकाटीच्या गाथा कथन केल्या. या दिवशी कोव्हिड- 19 आव्हाने आणि पुढील परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांवर चर्चासत्र घेण्यात आले.

आज झालेल्या बिग कॉनक्लेव्हमधे देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्ट- अप्स सहभागी झाले होते. प्रत्येक सदस्याचा उत्साह व उर्जा कौतुकास्पद होती आणि मी प्रत्येक उत्साही संशोधक तसेच उद्योजकाला अंतिम दिवशी सहभागी होण्याचे आवाहन करतो,’ असे सीआयआयसी आयआयटी कानपूरचे मुख्य कार्यकारी अदिकारी डॉ. निखिल अगरवाल म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth