भारतातील सर्वात मोठ्या व्हर्च्युअल घर-खरेदी अनुभवासाठी क्रेडाइ-एमसीएचआयची स्टेट बँक ऑफ इंडिया, गुगल आणि बुकमायशो यांच्यासोबत भागीदारी

भारतातील सर्वात मोठ्या व्हर्च्युअल घर-खरेदी अनुभवासाठी क्रेडाइ-एमसीएचआयची स्टेट बँक ऑफ इंडिया, गुगल आणि बुकमायशो यांच्यासोबत भागीदारी
मुंबई, ३ डिसेंबर २०२०: विश्वासार्ह विकासक आणि गृहखरेदीदार यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या प्रयत्नातून क्रेडाइ-एमसीएचआयने आज जाहीर केले की, ४ डिसेंबर २०२० ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या रिअल-इस्टेट प्रदर्शनाच्या व्हर्च्युअल आवृत्तीसाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, गुगल आणि बुकमायशो यांच्याशी भागीदारी केली आहे. या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील १०० हून अधिक विकासक आणि सुमारे ५ लाख गृहखरेदीदारी सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
रिअल इस्टेटच्या इतिहासात भारतातील पहिल्यावहिल्या अशा प्रकारच्या सहयोगाबद्दल क्रेडाइ-एमसीएचआय चे अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले, “आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजेच उद्योग आणि आर्थिक प्रगतीसाठी आमच्या क्षेत्रातर्फे नेहमीच हातभार लावण्यात येतो, याची एसबीआय, गुगल आणि बुकमायशो यांनी दखल घेतली याचा आम्हाला आनंद आहे. सध्या सुरू असलेल्या महामारीने आपल्या आयुष्यात असलेले घराचे महत्त्व आपल्या सर्वांना जाणवले आणि या धोरणात्मक भागीदारीमुळे विकासकांना प्रामाणिक गृहखरेदीदारांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.”
स्टेंट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मेट्रो सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक प्रवीण राघवेंद्र म्हणाले, “देशातील एक आघाडीची बँक म्हणून क्रेडाइ-एमसीएचआयच्या भारतातील सर्वात मोठ्या गृहखरेदी प्रदर्शनाच्या व्हर्च्युअल आवृत्तीशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. गृहखरेदीदारांना वाजवी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आणि गृह कर्ज प्रक्रिया जलद गतीने करत विकासक आणि गृहखरेदीदार यांच्यातील व्यवहार सुकर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि या उद्योगाची मागणी व त्यामुळे होणारी वाढ यासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देऊ शकू, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
गृहखरेदीदारांना या प्रदर्शनात प्रवेश मिळावा यासाठी अधिक धोरणात्मक आणि लक्ष्यकेंद्री दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी क्रेडाइ-एमसीएचआयने गुगलसोबत डिजिटल भागीदार म्हणून सहयोग केला आहे. या उत्सवी हंगामात घरांच्या शोधात असलेल्या संभाव्य गृहखरेदीदारांसाठी परिणामकारक व अर्थपूर्ण एंगेजमेंट सुकर करून देण्याासाठी गुगलच्या तंत्रज्ञानतील कौशल्याचा उपयोग करून घेण्याचा हेतू आहे.
या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या सुमारे ५ लाख गृहखरेदीदारांना आपल्या आवडीच्या प्रकल्पाची थ्री डी व्हर्च्युअल टूर करण्याची संधी व अॅक्सेस मिळणार आहे, व्याजदर व प्रक्रिया शुल्कात एसबीआयतर्फे सवलत मिळणार आहे. त्याचप्रमाणे लाइव्ह चॅट आणि व्हिडियो कॉन्फरन्सिंग, २४*७ सपोर्ट, सर्व प्रोजेक्ट मटेरिअल्ससाठी हेल्पडेस्कच्या पर्यायांचा लाभ घेऊ शकतात आणि या विषयातील तज्ज्ञांचे विचार ऐकू शकतात. अनेक मोठे व प्रतिष्ठीत विकासक त्यांच्या विद्यमान व नवीन प्रकल्पांवर फ्लॅश डिस्काउंट्सही उपलब्ध करून देतील.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth