या आर्थिक संकल्पांसह करा नववर्षाची सुरुवात

 

या आर्थिक संकल्पांसह करा नववर्षाची सुरुवात

२०२१ या वर्षाची प्रत्येकजणच आशा, उत्सुकता आणि अपेक्षापूर्वक वाट पाहत आहे. लस तयार करणारे अनेकजण संशोधनाच्या शेवटच्या ट्प्यात असून, अखेरीस या नव्या वर्षात फेसमास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि मागील वर्षातील प्रचंड अस्वस्थता यांची बंधने झुगारन देण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास, हे स्वातंत्र्याचे वर्ष असेल, जो आनंद, उत्साह आपण साजरा करायचो, त्याकडेही आता पाहता येईल.

२०२१ या नव्या वर्षात एक नवी सुरुवात करण्याची तसेच दीर्घकाळापासून अपेक्षित आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीही योग्य संधी आहे. तुम्ही नवीन कल्पनांच्या शोधात असाल तर एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिड कॅप-एव्हीपी श्री. अमरजीत मौर्य यांनी नवीन वर्षाकरिता काही संकल्प सुचवले आहेत जे तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजेत:

१. मी गुंतवणूक सुरु करेन: आपल्याकडे आर्थिक साठा का असायला हवा, याची उत्तम शिकवण २०२० या वर्षाने दिली. कोणत्याही अनिश्चित घटनेसाठी याद्वारे आपल्याला व कुटुंबाला सुरक्षितता मिळते. यासोबतच अधिकाधिक संपत्ती निर्माण करण्याकरिता स्रोतही तयार होतात. अशा प्रकारे, बाजारात संधी येता, आपण त्यात गुंतवणूक करू शकता.

उदा. मार्चमधील निचांक गाठल्यानंतर आतापर्यंत बेंचमार्क निर्देशांकांनी ८० टक्क्यांची वृद्धी केली. वर्षाच्या सुरुवातीला ते जेथे होते, तिथपासून १३% ची वाढ झाली. या काळात आयटी आणि फार्मासारख्या अनेक क्षेत्रांतील शेअर्सनी अनेक पटींनी प्रगीत केली. तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक कराल, ती कायम ठेवाल, बाजारात संधी मिळताच, तुम्ही जमवलेली संपत्ती तेवढ्या जास्त प्रमाणात वाढेल.

२. माझे खर्च मी वेगळ्या प्रकारे करेन: तुम्ही गुंतवणूक सुरु करताय, याचा अर्थ आता खर्च कमी करावा लागणार, असा नव्हे. महान रोमन नाटककार प्लुटस यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, “जास्त पैसे कमावण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.” या मित्राच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमचा खर्च अशा प्रकारे करा की, त्यातून तुमच्यासाठी नवी संपत्ती निर्माण होईल. म्हणजेच तुम्ही बर्गरला रामराम करून एसआयपी सुरु करू शकता किंवा शेअर्स खरेदी करू शकता. असे केल्याने तुमच्या आर्थिक आरोग्यासह शारीरिक आरोग्यही राखले जाईल.

मी माझे आर्थिक ज्ञान वाढवेन: फार ज्ञान नसलेल्या गुंतवणूकदारांना थोडा नफा आणि भरपूर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही चूक करू नका. तुम्ही जरी एखादा सल्लागार, इन्व्हेस्टमेंट इंजिन किंवा स्मॉलकेसच्या शिफारशीनुसार, खरेदी करत असलात तरी, खरेदी करत असलेल्या गोष्टीतील सर्व धागेदो-यांबद्दल माहिती करून घ्या. त्यामुळे तुमचे परतावे नेहमीच योग्य असतील, याची खात्री होते. असे केल्यास तुम्ही त्वरीत व चांगले निर्णय घेऊ शकता व नशीबाने येणारे नुकसान टाळू शकता.

माझ्या गुंतवणुकीत वैविध्य असेल: गुंतवणूक करत राहण्याची कल्पना सोपी असली तरी अनुभवी गुंतवणूकदार तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी करण्याचा सल्ला कधीच देमार नाहीत. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर (उच्च शक्यतेचे लार्ज-कॅप आणि स्मॉल कॅप कंपनींसह) विविध क्षेत्रांमध्ये करा. सोने किंवा चांदीचे थोडे प्रमाण घेऊनही याचे आणखी संतुलन साधता येईल. वैविध्य असलेला पोर्टफोलिओ थेट जोखीम कमी करतो व एकंदरीत धोक्याच्या शक्यता टाळता येतात.

मी कोडिंग शिकेन: तुम्हाला माहिती आहे का? आजच्या घडीला भारतातील एकूण ट्रेड्सपैकी एक तृतीयांश अल्गोरिदमिक ट्रेड्स आहेत. अल्गोरिदमिक ट्रेडिंगला अल्गो ट्रेडिंग असेही म्हणतात. सिक्युरिटीज ऑटोमेटिकली खरेदी अथवा विक्री करण्याकरिता ट्रेडिंग धोरणाचे हे व्हर्चुअल मॉडेलिंग आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमचा कोड लिहून अल्गोरिदममध्ये क्रिया करण्याचा निर्णय ठरवून द्यावा लागतो. काही डिजिटल ब्रोकर्स आपल्याला अत्याधुनिक चार्ट तयार करायला मदत करातत. यासाठी हिस्टॉरिक आणि रिअल टाइम डेटाही वापरला जातो. क्रिया करण्याचा निर्णय घेण्यासाठी यांची मदत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मॅन्युअली खरेदी किंवा विक्री करण्याच्या तुलनेत ट्रेडिंग करताना या पद्धतीद्वारे तुम्हाला प्रीमियम रेट्स मिळतात.

विकसित अर्थव्यवस्थांमध्ये, एकूण बाजाराच्या मूल्यापैकी ८०% ट्रेड्स अल्गो ट्रेड्स असतात. ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर हा आकडा अजूनही वाढेल, असा अंदाज आहे. भारतात पायथॉन, आर किंवा जावा इत्यादी भाषा शिकण्यासोबत तुम्ही या वलयाच्या अगदी पुढे राहू शकता. अल्गो ट्रेडिंगच्या मार्केटमध्ये उंची गाठू शकता. भविष्यातील ट्रेड्सचा बहुतांश भाग याद्वारे व्यापला जाईल, हे निश्चित.

२०२१ हे आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यासह, ज्या गोष्टीची तुम्ही अनेक वर्षांपासून महत्त्वाकांक्षा मनात धरली आहे, त्या गोष्टी पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे नव्या वर्षात आर्थिक स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या संकल्पांना नक्कीच प्राधान्य द्या.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202