एएससीआय - आयएसएच्‍या संयुक्‍त अहवालानुसार, १० पैकी ८ व्‍यक्‍तींचा जाहिरातींवर विश्‍वास


एएससीआय - आयएसएच्‍या संयुक्‍त अहवालानुसार, 

१० पैकी ८ व्‍यक्‍तींचा जाहिरातींवर विश्‍वास

मुंबईडिसेंबर २०२०: अ‍ॅडव्‍हर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) व इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅडव्‍हर्टायझर्स (आयएसए) यांनी केलेल्‍या आणि निल्‍सेनद्वारे आयोजित संशोधन जाहिरातीमधील उच्‍च विश्‍वासाच्या बाबीला निदर्शनास आणते. प्रामाणिकपणा व सत्‍यतेची खात्री घेत विश्‍वास कायम ठेवणे व वाढवणे यावर एएससीआयचा प्रमुख भर राहिला आहे. आयएसएच्‍या पाठबळासह एएससीआयची स्‍थापना करण्‍यात आली.जाहिरातीवरील विश्‍वास संशोधनामध्‍ये भारतातील महानगर व लहान शहरांमधील २० केंद्रांतील विविध वयोगटातील व्‍यक्‍तींचा समावेश होता. संशोधनाने निदर्शनास आणले की, १० पैकी आठ व्‍यक्‍तींनी मीडियावरील जाहिरातींच्‍या संदेशांवर विश्‍वास ठेवला.

टेलिव्हिजन (९४ टक्‍के) हे जाहिराती दाखवण्‍याचे सर्वात सामान्‍य माध्‍यम होते, त्‍यानंतर डिजिटल (८२ टक्‍के), प्रिंट (७७ टक्‍के) आणि रेडिओ (२९ टक्‍के) यांचा क्रमांक होता. नॉन-मेट्रो बाजारपेठांनी टेलिव्हिजन जाहिरातींच्‍या दर्शकत्‍वाला चालना दिली आहे. रोचक बाब म्‍हणजे डिजिटलवरील जाहिरातींचे दर्शकत्‍व ग्रामीण भाग (८२ टक्‍के) आणि महानगर भाग (८३ टक्‍के) येथे जवळपास समानच आहे. स्‍ट्रॅटेजिक अलायन्‍सेस व न्‍यू व्‍हर्टिकल्‍स निल्‍सेन आयक्‍यूचे जागतिक प्रमुख प्रसून बसू यांच्‍या मते, यामधून अंतर्गत प्रदेशामधील या माध्‍यमाचे वाढते महत्त्व व केंद्रीकरण दिसून येते. एएससीआयने पूर्वीच ओळखले की, डिजिटल कन्‍टेन्‍ट व जाहिरातींच्‍या वाढत्‍या वापरामधून ग्राहकांची वर्तणूक व विपणनामध्‍ये सतत होणारा बदल दिसून आला. त्‍याअनुषंगाने डिजिटल व्‍यासपीठांसाठी आणि त्‍यांच्‍या प्रिंट व टेलिव्हिजन जाहिरातींच्‍या देखरेखीसाठी प्रबळ देखरेख यंत्रणा स्‍थापित करण्‍यात आली आहे. ही यंत्रणा आता दिशाभूल करणा-या संदेशांसाठी ३,००० हून अधिक डिजिटल व्‍यासपीठांची देखरेख करते.

समकालीन मीडियावर दिसण्‍यात येणा-या जाहिरातींवर ग्राहकांचा प्रबळ विश्‍वास आहे. वर्तमानपत्रांमध्‍ये येणा-या जाहिरातींवर (८६ टक्‍के) सर्वाधिक विश्‍वास ठेवण्‍यात आला, त्‍यानंतर टेलिव्हिजन (८३ टक्‍के) आणि रेडिओ (८३ टक्‍के) यांचा क्रमांक होता. टेक्‍स्‍ट/एसएमएस जाहिरातींवर विश्‍वास ठेवण्‍याचे प्रमाण ५२ टक्‍के होते.

परिवर्तनांच्‍या संदर्भात ग्राहकांनी टेलिव्हिजन, प्रिंट, रेडिओ, सोशल मीडिया, आऊटडोअर व सर्च इंजिनांवर दाखवण्‍यात येणा-या जाहिरातींवर अधिक विश्‍वास ठेवला. २०१५ मध्‍ये निल्‍सेनने अशाच प्रकारचे सर्वेक्षण केले होते, पण या कालावधीदरम्‍यान ग्राहकांच्या टेक्‍स्‍ट संदेशांवर विश्‍वास ठेवण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये घट झाली (५८ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ५२ टक्‍के).

विभागांमध्‍ये प्रेक्षकांनी शैक्षणिक संस्‍थांच्‍या जाहिरातींवर सर्वाधिक विश्‍वास दाखवला. याचे प्रमाण ८२ टक्‍के होते. हे कदाचित संस्‍कृतीमुळे असेल, जेथे भारतीयांचा भविष्‍य सुरक्षित करण्‍यासाठी शिक्षणावर दृढ विश्‍वास आहे. तसेच एएससीआय निदर्शनास आणते की, दिशाभूल करणा-या बहुतांश जाहिराती शैक्षणिक विभागातील आहेत. म्‍हणूनच एएससीआयचा शिक्षण विभागाशी संबंधित जाहिरातींवर अधिक फोकस आहे.    

''ही निष्‍पत्ती पाहता एएससीआयचे शिक्षण विभागावर देखरेख ठेवण्‍याचे काम अधिक महत्त्वाचे आहे. भारतामध्‍ये, गरीब लोक देखील त्‍यांच्‍या आवश्‍यक गरजांपेक्षा शैक्षणिक खर्चाला अधिक प्राधान्‍य देतात. बहुतांश शैक्षणिक संस्‍था रोजगार मिळण्‍याच्‍या हमी देतात किंवा पहिल्‍या क्रमांकाची संस्‍था असण्‍याचा चुकीचा दावा करतात किंवा कोणत्‍याही वस्‍तुनिष्‍ठ माहिती अथवा पुराव्‍याशिवाय १०० टक्‍के प्‍लेसमेंटची खात्री देतात. बाजारपेठेमधून अशा फसव्‍या जाहिराती काढून टाकण्‍याची खात्री घेण्‍यासाठी आम्‍ही सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहोत,'' असे एएससीआयच्‍या सरचिटणीस मनिषा कपूर म्‍हणाल्‍या.

डिटर्जण्‍ट्स, मॉस्किटो रिपलेण्‍ट्स इत्‍यादी सारख्‍या होम केअर उत्‍पादनांसंदर्भातील जाहिरातींवर देखील उच्‍च विश्‍वास ठेवला जातो. पण बांधकाम विभागासंदर्भातील जाहिरातींवर ग्राहकांनी कमी विश्‍वास दाखवला. 

जवळपास ७० टक्‍के प्रतिसादकानी सांगितले की, ते सेलिब्रिटीज असलेल्‍या जाहिरातींवर विश्‍वास ठेवतात.

दिशाभूल करणा-या किंवा आक्षेपाई जाहिराती पाहिल्‍यानंतर कारवाई करण्‍याच्‍या संदर्भात एक-तृतीयांश ग्राहक त्‍यांचे कुटुंब/ मित्रांसोबत चर्चा करतात, आणखी एक-तृतीयांश ग्राहक सोशल मीडियावर पोस्‍ट करत किंवा त्‍याबाबत तक्रार करत कारवाई करतात. पण, जवळपास ३० टक्‍के ग्राहक कोणतीच कारवाई करत नाहीत. यावर देखील एएससीआयचा मुख्‍य फोकस आहे. एएससीआयने प्रत्‍येक साधन उपलब्‍ध करून देत ग्राहकांना जाहिरातींमधील दिशाभूल करणारे दावे ओळखण्‍यामध्‍ये सुलभ सुविधा दिली आहे. ग्राहक त्‍यांच्‍या वेबसाइटवर (www.ascionline.org) किंवा ईमेलच्‍या (contact@ascionline.org) माध्‍यमातून तक्रार करू शकतात. ग्राहक व्‍हॉट्सअॅप क्रमांकाच्‍या (7710012345) माध्‍यमातून देखील तक्रार पाठवू शकतात.

जाहिरात क्षेत्राचे स्‍वयं-नियामक मंडळ म्‍हणून एएससीआयने मागील ३५ वर्षांपासून नैतिक व जबाबदार जाहिरातींना चालना देण्‍यासाठी संहिता व मार्गदर्शक तत्त्वे स्‍थापित केली आहेत. ज्‍यामधून ग्राहक विश्‍वासाच्‍या उच्‍च स्‍तराची खात्री मिळते. ही संहिता व मार्गदर्शक तत्त्वे काळासह सर्वसमावेशक बनली आहेत आणि बदलत्‍या विपणन व ग्राहक स्थितीनुसार आहेत.

कपूर म्‍हणाल्‍या, ''मी जाहिरातीमधील विश्‍वास संशोधनासाठी संयुक्‍त संयोजक असण्‍यासाठी आयएसएचे आभार मानते. एएससीआय जाहिरातीवरील ग्राहक विश्‍वास राखण्‍यासाठी जबाबदारी घेण्‍यासोबत ब्रॅण्‍ड्सना प्रामाणिकपणे व प्रभावीपणे जाहिरात करण्‍यामध्‍ये मार्गदर्शन देखील करते. संस्‍था ग्राहक विश्‍वास व ब्रॅण्‍ड प्रतिष्‍ठेला बहुमूल्‍य प्राधान्‍य देते आणि प्रामाणिक जाहिरात दीर्घकाळापर्यंत ब्रॅण्‍डचे महत्त्व वाढवण्‍यासाठी महत्त्वाची आहे. हा स्‍वयं-नियमनाचा आधार आहे. या संशोधनाने काही अत्‍यंत रोचक निष्‍पत्तींचा उलगडा केला आहे, जेणेकरून ब्रॅण्‍ड्सना ग्राहकांमध्‍ये विश्‍वास निर्माण करण्‍यासाठी कोणते कार्य करण्‍याची गरज आहे हे समजण्‍यामध्‍ये मदत होईल. स्‍वतंत्र स्‍वयं-नियामक असलेल्‍या एएससीआयकडे विविध अंतरिक माहिती आहे, ज्‍यामुळे आम्‍हाला ग्राहकांशी उत्तमरित्‍या संलग्‍न होण्‍यामध्‍ये मदत होईल.''  

आयएसएचे अध्‍यक्ष सुनिल कटारिया म्‍हणाले, ''ब्रॅण्‍ड्स ग्राहक व प्रेक्षकांच्‍या दीर्घकालीन संवादाच्‍या आधारावर निर्माण करण्‍यात येतात. सर्व संवाद प्रामाणिक व खरे असण्‍याची खात्री घेणे हे जाहिरातदारांचे स्‍वत:चे कर्तव्‍य आहे. ज्‍यामुळे ग्राहक जाहिरातींमधील संदेशांवर आणि त्‍याद्वारे ब्रॅण्‍ड्सवर विश्‍वास ठेवू शकतील. हे संशोधन जाहिरातदार, एजन्‍सीज, मीडिया मालक व नियोजकांना काय योग्य आहे आणि काय सुधारणा केल्‍या पाहिजेत याचे आत्‍मनिरीक्षण करण्‍यामध्‍ये मदत करते.''

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.