असंघटित आणि अविश्वसनीय अॅप्स ओळखण्यासाठी डिजिटल लेन्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, ग्राहकांना मार्गदर्शक सूचना प्रसारित करते
असंघटित आणि अविश्वसनीय अॅप्स ओळखण्यासाठी डिजिटल लेन्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, ग्राहकांना मार्गदर्शक सूचना प्रसारित करते
जबाबदार आणि नैतिक कर्ज देण्याच्या पद्धतींचा डीएलएआय सदस्यांसाठी पुनरुच्चार
29 डिसेंबर, 2020, मुंबईः 2016 मध्ये स्थापन झालेल्या डिजीटल लेन्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (डीएलएआय) मध्ये 85 हून अधिक सदस्य कंपन्यां समाविष्ट आहेत ज्या संपूर्ण देशभरात डिजिटल कर्ज किंवा संबंधित सेवा प्रदान करण्यास सक्षम आहेत . डीएलएआय चे मुख्य उद्दीष्ट भारतामध्ये डिजिटल कर्ज देण्याच्या क्षेत्राची वाढ करणे व त्याची देखभाल करणे हे आहे.
शासनाच्या डिजिटल इंडिया मिशन आणि नियामक संस्थांचा यांचा पाठींबा यास मिळालेला आहे, डिजिटल कर्ज दात्याने वित्तीय सेवा व्यापक बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
- या देशात एकत्रितपणे डीएलएआय सदस्य 4 दशलक्षाहूनही अधिक कर्जदारांची सेवा करतात. यातील बराच मोठा ग्राहकवर्ग हा प्रथमच कर्ज घेणारा आहे.
-गत आर्थिक वर्षात आमच्या सदस्यांनी (त्यांच्या नोंदणीकृत एनबीएफसी आणि बँकासह) जवळजवळ 50,000 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत.
सर्व डीएलएआय सदस्य नोंदणीकृत संस्था आहेत, ज्या किमान एका नियामक मंडळाद्वारे शासित असतात. म्हणून प्रत्येक कंपनी ‘गोपनीयता कायदा’, ‘दुकाने व आस्थापना अधिनियम’, इत्यादी धोरणांचे पालन करते.
अलिकडच्या काळात कंपन्यांच्या विशिष्ट गटांच्या अनैतिक पद्धतींबद्दल बातम्या आल्या आहेत, पण अशा कर्ज देणाऱ्या कंपन्यांपेक्षा डीएलएआय पूर्णपणे भिन्न आहे.
या कंपन्यांकडे सामान्यत: ग्राहक इंटरफेस म्हणून एक मोबाइल अॅप असतो. या द्वारे बर्याच घटनांमध्ये पोलिस विभागाने असे शोधून काढले आहे ज्यामध्ये अशा एपीपीने कोणत्याही ओळखपत्रा शिवाय एखाद्या व्यक्तीला कर्ज दिले आहेत. अशा कंपन्या असंघटित सावकारा प्रमाणेच कार्य करतात ज्यामध्ये ब्लॅकमेलिंग किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर यासारखे गैरवर्तन दिसून येते.
डीएलएआय हे आपल्या सदस्य आणि नियामक संस्थांसह बेकायदेशीर किंवा ग्राहकांसाठी हानिकारक अशा पद्धतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करते. तथापि, आमच्या लक्षात आले आहे की अशा बर्याच अॅप्स ना सिस्टममध्ये कमतरता सापडल्या आहेत, ज्यामध्ये बहुतेक वेळेस पैशाची निकड असल्याने असुरक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे त्यापैकी एक आहे.
आम्ही एक जबाबदार उद्योग संस्था म्हणून अशा पद्धतींचा तीव्र निषेध करतो व ग्राहकांना अशा काही एपीपी ओळखण्यात मदत करू शकणार्या काही मार्गदर्शक तत्त्वांविषयी जागरूक करू इच्छितो:
1) किमान केवायसी किंवा केवायसी नाही: जर लोन अॅप पार्श्वभूमीची तपासणी केल्याशिवाय कर्ज देत असेल तर त्यांच्या प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उभे राहते. केवायसी शिवाय कर्ज देणारया अॅप ची तुलना असंघटित सावकाराशी करता येईल आणि ते विश्वास पात्र ठरणार नाहीत.
२) अल्पावधी कर्जाचा उल्लेखनीय कालावधी: 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी दिले जाणारे कोणतेही कर्ज हे ग्राहकांची आर्थिक निकड व शोषण लक्षात घेऊन दिले जाते. या मध्ये सामान्यत: अधिक व्याज दर आणि तितकेच जास्त विलंब शुल्क आकारतात. ग्राहक कल्याण त्यांचे प्राधान्य नसते.
3) आरबीआय नोंदणीकृत फर्म सोबत कर्जाचा करार केला गेला नाही: ग्राहकाने कर्ज करार पक्षांचे परीक्षण केले पाहिजे. कर्जाचा करार आरबीआय नोंदणीकृत फर्म सोबत नसल्यास (गूगल द्वारे ह्याचा शोध घेऊ शकतो), फर्मची प्रक्रिया नियमित नसल्याचे सूचित करते आणि एखादी समस्या असल्यास ते धोकादायक असल्याचे सिद्ध होते.
4) खूप जास्त अग्रिम प्रक्रिया शुल्क: ह्याची पद्धत पारंपारिक सावकारी प्रक्रीये प्रमाणेच असते, जर कर्जाच्या अॅपमध्ये खूप जास्त प्रक्रिया शुल्क / आगाऊ प्रक्रिया शुल्क असेल तर, उदा. मंजूर कर्जाची रक्कम 5000 आहे परंतु वास्तविक वितरण 4000 आहे, तर त्यावर लाल चिन्ह दर्शवितो.
5) परतफेड / संकलन यंत्रणा: अॅप डिजिटली परतफेड करण्याचा पर्याय देते का? तसे नसल्यास, पैशाचा हिशोब नसतो आणि यावर देखील लाल चिन्ह दाखवते. याचाच अर्थ असा आहे की संग्रहण एजंटला ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचावे लागते, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
6) विलंब शुल्काचा तपशील आणि संरचना: संशयास्पद कंपन्या लागू असलेले विलंब शुल्क लपवतात किंवा चुकीचे निर्देशित करतात. ते जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी ग्राहकांच्या अज्ञानाचा व त्यांच्या अल्प आर्थिक समज याचा फायदा घेतात. उदा. आमच्या लक्षात आले आहे की काही प्रकरणांमध्ये कंपन्यांकडून लागू होणारे विलंब शुल्क दररोज 1% इतकी जास्त आहे. इतकेच नाहीतर ग्राहकाने लागू व्याज दरासोबत लपलेल्या शुल्काबाबतही दखल घेणे अत्यावश्यक आहे.
7) उत्पन्न / ब्यूरो पडताळणी अतिशय सोपी आहे: एखाद्या व्यक्तीच्या परतफेड क्षमतेचे न्यायोचीत मूल्यमापन करण्यासाठी त्याच्या उत्पन्नाची पडताळणी करणे महत्वाचे आहे आणि दीर्घ मुदतीसाठी ग्राहकासाठी देखील हे उपयुक्त ठरते. कोणताही अॅप जो उत्पन्नाचा तपशील/किंवा ब्यूरोकडे दुर्लक्ष करतो तो कर्जांच्या सापळ्यांला प्रोत्साहित करतो आणि म्हणूनच हे टाळावे.
वरील सर्व बाबी तपासणे शक्य नसल्या तरी आम्ही डीएलएआय येथे ग्राहकांना उपरोक्त किमान 4-5 बाबींची पडताळणी करुन घेण्याची विनंती करतो.
आम्ही योग्य पद्धतींचे पालन करून तसेच देशातील हानिकारक पद्धतींवर नियंत्रण ठेवून ग्राहकांचा विश्वास राखण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही योग्य पद्धती सुनिश्चित करण्यासाठी इको-सिस्टम प्लेयर्ससह सतत कार्य करत आहोत.
Comments
Post a Comment