‘युनिकॉर्न्स’ची पहिल्याच वर्षात ३२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

 ‘युनिकॉर्न्स’ची पहिल्याच वर्षात ३२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

~ पुढील युनिकॉर्न बनण्याकरिता स्टार्टअप्सना करते साहाय्य ~

मुंबई, २१  डिसेंबर २०२०: वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (यूनिकॉर्न्स) ने स्थापनेनंतरच्या पहिल्याच वर्षात ३२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. भारतातील अग्रेसर एकिकृत इन्क्युबेटर व्हेंचर कॅटलिस्ट्स (व्हीकॅट्स)चा ३०० कोटी रुपयांचा सेक्टर-अॅग्नोस्टिक फंड ९युनिकॉर्न्सने दर महिन्यात जवळपास ३ स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. दर महिन्यात शेकडो स्टार्ट-अप्सचे स्क्रीनिंग होते, मात्र ९युनिकॉर्न्स हे निवडीबाबत अतिशय काटेकोर आहे. ही प्रक्रिया निधी उभारण्याकरिता लीडर्सची मदत करते आणि यातून पुढील युनिकॉर्न बनण्याकरिता स्टार्टअपला साहाय्य करते.

कंपनीने गुंतवणूक केलेल्या टॉक, जननी एआय आणि क्यूआयएन१ यासारख्या कंपन्यांनी आधीच पुढील फेरीमध्ये लक्षणीय मूल्यांकनावर सहा महिन्यातच प्रगती केली. यासोबतच कंपनीने डीपटेक, बीटूबी सास, एफएमसीजी, फिनटेक, इन्शुअरटेक, हेल्थटेक आणि एडटेक क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे. एक अॅक्सलरेटर फंड म्हणून ९युनिकॉर्न्स कल्पना स्तरावरील स्टार्टअपमध्ये ५ ते ७ इक्विटीसाठी एक लाख अमेरिकी डॉलर्सची गुंतवणू करते. डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीने सिक्वोइया सर्ज, टायटन कॅपिटल, एसओएसव्ही, लाइटस्पीड, मॅट्रिक्स पार्टनर्स आणि नेक्सस व्हेंचर्स या सह-गुंतवणूकदारांसोबत सिंडिकेशनद्वारे २४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

९युनिकॉर्न्सचे भागीदार अभिजीत पै म्हणाले, '९युनिकॉर्न्समध्ये आम्ही कल्पनेच्या किंवा सुरुवातीच्या स्तरावरील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून टेक्टॉनिक परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहोत. यातून दीर्घकालीन मूल्ये आणि मोठा बदल घडेल, अशी आशा आहे. येत्या काही वर्षात भारतात मोठ्या संख्येने संपत्ती निर्माते तयार होतील आणि जागतिक स्तरावर ही संख्या लक्षणीय ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.'

९युनिकॉर्न्सचे संस्थापपक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, 'इंटेल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या पहिल्या पिढीतील स्टार्टअप्सचे कर्मचारी दुसऱ्या व तिसऱ्या पिढीत उद्योजक बनले तेव्हा सिलिकॉन व्हॅलीत इनोव्हेशन आणि स्टार्टअपचा मुख्य प्रवाह खळाळू लागला. फ्लिपकार्ट हे पहिल्या पिढीतील स्टार्टअप मानले तर, भारतीय स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये त्यासारखीच जबरदस्त वृद्धी दिसत आहे. आपल्याकडे सर्वोच्च पातळीचे धाडस स्पर्धा, प्रतिभा आणि महत्त्वाकांक्षेची कमतरता नाही. भारतात एअरबीएनबी आयपीओसारख्या मोठ्या लिक्विडिटी इव्हेंट्स होतच राहतील, अशी आशा आम्ही ९युनिकॉर्न्स मध्ये करतो, त्यामुळेच आम्ही उद्योगांच्या सुरुवातीला त्यांच्या पाठीशी उभे राहतो. भारतातच तयार झालेले असे भारताचे स्वत:चे वाय कॉम्बिनेटर व्हावे, अशी आमची इच्छा आहे.'


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202