‘वर्ल्ड जीबीसी’च्या ‘एशिया पॅसिफिक लीडरशिप इन ग्रीन’ पारितोषिकासाठी ‘गोदरेज अँड बॉईस’ ही एकमेव भारतीय कंपनी अंतिम फेरीत दाखल
‘वर्ल्ड जीबीसी’च्या ‘एशिया पॅसिफिक लीडरशिप इन ग्रीन’ पारितोषिकासाठी
‘गोदरेज अँड बॉईस’ ही एकमेव भारतीय कंपनी अंतिम फेरीत दाखल
31 डिसेंबर, 2020 : ‘वर्ल्ड ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’तर्फे (जीबीसी) आयोजित केलेल्या ‘एशिया पॅसिफिक लीडरशिप इन ग्रीन बिल्डिंग अॅवॉर्ड्स 2020’ या पारितोषिकासाठीच्या अंतिम फेरीत ‘गोदरेज अॅंड बॉईस’ या भारतातील एकमेव कंपनीचा समावेश झाला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाश्वत उपाय योजण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशिया-प्रशांत क्षेत्रातील कंपन्यांना गौरविण्याकरीता हे पारितोषिक देण्यात येते. ‘बिझनेस लीडरशिप इन सस्टेनॅबिलिटी’ आणि ‘लीडरशिप इन सस्टेनेबल डिझाईन अॅंड परफॉर्मन्स’ या पारितोषिकांच्या श्रेणींमधील अंतिम फेरीत ‘गोदरेज अॅंड बॉईस’ची निवड झाली आहे. ही गोदरेज समुहातील एक प्रमुख कंपनी आहे.
‘बिझनेस लीडरशिप इन सस्टेनॅबिलिटी’ या पारितोषिकासाठी नामांकन झालेल्या चार कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चा समावेश आहे. आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये शाश्वत मूल्यांचा अंगीकार खऱ्या अर्थाने करणाऱ्या व पर्यावरण रक्षणासाठी शाश्वतेवर आधारीत परिवर्तन आणणाऱ्या कंपन्यांसाठी हे पारितोषिक असते. त्याचबरोबर, ‘लीडरशिप इन सस्टेनेबल डिझाईन अॅंड परफॉर्मन्स’ या श्रेणीतील पारितोषिकासाठी मुंबईतील विक्रोळी येथील ‘प्लॅंट 13 अॅनेक्स बिल्डिंग’ला नामांकन मिळाले आहे. सर्वंकष शाश्वततेमधून लाभ मिळवून देणाऱ्या ‘ग्रीन बिल्डिंग’ प्रकल्पांमध्ये आद्य ठरणाऱ्या कंपन्यांसाठी ही पारितोषिक श्रेणी आहे.
या नामांकनामुळे आनंदित झालेले ‘गोदरेज इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स’चे सीओओ जॉर्ज मेनेझेस म्हणाले, “गोदरेज अॅंड बॉईस येथे आम्ही आमच्या अंतर्गत व बाह्य या कार्यक्षेत्रांत सर्व प्रकारच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास कटिबद्ध आहोत. उद्योगात शाश्वत मूल्ये निर्माण करण्यासाठी सतत नवीन आणि चांगल्या मानकांचे निर्धारण केले जावे व त्यातून आपला भूतल व त्यावरील लोक यांच्या भल्यासाठी सकारात्मक गोष्टी घडाव्यात, हेच उद्दिष्ट आम्ही बाळगले आहे. या उद्दिष्टांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली गेल्यामुळे आम्ही कृतज्ञ आहोत व आनंदित आहोत. आम्ही यापुढेही शाश्वतेच्या उच्च मापदंडांचा पुरस्कार करीत, दखल घेण्याजोगी कामगिरी करीत राहू.”
‘गोदरेज अँड बॉईस’ ही भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील उद्योग क्षेत्रात तिने अग्रगण्य व प्रभावी स्थान मिळविले आहे. कंपनीने ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ (आयजीबीसी) रेटिंग सिस्टीमअंतर्गत भारताची पहिली ‘नेट झिरो कार्बन बिल्डिंग’ उभारली असून, आशिया-प्रशांत प्रदेशातील ‘नेट झिरो बिल्डिंग’ना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वर्ल्ड ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’शी भागीदारी केली आहे. व्यवसाय आणि शाश्वतता हेच एकमेकांसोबत स्थिरपणे राहतात हे ओळखून, ’जी अँड बी’ने अलीकडेच आपली उर्जा उत्पादकता 2030 पर्यंत दुप्पट करण्याचे वचन दिले आहे. त्याकरीता तिने ‘क्लायमेट ग्रूप’च्या नेतृत्वाखालील ‘ग्लोबल इपी 100’ उपक्रमात भाग घेतला आहे.
Comments
Post a Comment