कलर थ्रेड्स आयएनसीच्या सहयोगाने व्हॅन ह्यूसेनने करुन दिला इनस्टेम्स ’जी-फॅब’ नावाच्या भारतातल्या नवीन तंत्रज्ञानाचा परिचय

कलर थ्रेड्स आयएनसीच्या सहयोगाने व्हॅन ह्यूसेनने करुन दिला
इनस्टेम्स ’जी-फॅब’ नावाच्या भारतातल्या नवीन तंत्रज्ञानाचा परिचय
मुंबई; 4 डिसेंबर 2020: - अदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लि.चा आघाडीचा ड्रेसिंग ब्रॅड असलेल्या व्हॅन ह्यूसेनने भारतात इनस्टेमच्या ’जी-फॅब’ तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्याच्या दृष्टीने कलर थ्रेड्स आयएनसीसोबत सहयोगात्मक करार केला आहे. या सहयोगामार्फत व्हॅन ह्यूसेन प्रिमियम दर्जाचे भारतीय बनावटीचे मास्क आणि एथलीशर क्लॉथिंग, म्हणजे व्यायामासाठी रोज घालता येण्यायोग्य कपड्यांचा परिचय करुन देणार आहे, ही उत्पादने नवीन युगातल्या ग्राहकांच्या वर्तमान गरजांना पूर्ण करण्यासाठी G99+ एंटीवायरल™ने सक्षम आहेत. ’जी-फॅब तंत्रज्ञानाचा’ वापर करुन तयार करण्यात आलेले मास्क आणि एथलीशर क्लॉथिंग इनस्टेमकडून परवानाप्राप्त आहेत. इनस्टेम ही जैवतंत्रज्ञान विभागाची एक ऑटोनॉमस संस्था असून जिला कलर थ्रेड्स इंक पुढे विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानाला इनस्टेममध्ये डॉ. प्रवीण कुमार वेम्युलांच्या प्रयोगशाळेत विकासीत करण्यात आले आहे. स्टेमसेल आणि पुनरुत्पादन चिकित्सा संस्था म्हणजेच स्टेमसेल, भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाची एक स्वायत्त संस्था आहे. वर्तमान स्थितीत ’मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या भारत सरकारच्या उपक्रमांना समर्थन करण्यावर जोर देणे आवश्यक आहे. कलर थ्रेड्स हे सेल्युलर आणि मोलेक्युलर मंच (C-CAMP) केंद्र परिसरातील एक उपक्रम आहे. C-CAMP उपक्रमाला भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे समर्थन लाभले असून तो भारतामध्ये आधुनिक संशोधन आणि नवीनतमतेला सक्षम करणा-या घटकाची किंवा उत्प्रेरकाची भूमिका पार पाडत आहे. G99+ एंटीवायरल™ने सबळता मिळालेल्या व्हॅन ह्यूसेन मास्कची निर्मिती इनस्टेमच्या जर्मेसाइडल फेब्रिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात आली आहे, ज्यामुळे **SARS-CoV-2 विषाणूचे संक्रमण 5-15 मिनीटांमध्ये अनुक्रमे >90% and 99.99% कमी होते. *जेव्हा विषाणू कापडाच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा, त्याचा उपचार SARS-CoV-2चा वायरल भार कमी करतो, ज्याची भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या एका स्वतंत्र जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये, ISO 18184 च्या सुधारीत प्रोटोकॉलच्या अंतर्गत निर्धारीत स्थितीत चाचणी घेण्यात आली आहे. ** SARS-CoV-2 विषाणूमुळे कोविड-19 होतो हे आता सर्वश्रुत आहे. हा मास्क धुता येतो आणि धुण्याच्या सूचनांचे पालन केल्यास त्याला 30 धुण्यांपर्यंत पुन्हा वापरता येऊ शकते. या परिचयाबद्दल बोलताना व्हॅन ह्यूसेन इनरवेअर आणि ऍथ्लेजरचे सीइओ श्री पुनीत कुमार मलिक म्हणाले, “आम्हाला सध्या जागतीक समस्या बनलेल्या या महामारीविरुध्द समाधान शोधणा-या संस्थेसोबत सहयोग केल्याचा अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वच सामना करत असलेल्या या आपदेबद्दल विचार करताना, आवश्यक ते निवारणात्मक उपाय करण्याला आम्ही प्राधान्य देत असून, बाहेर पडताना वापरले जाणारे मास्क हा त्यात समाविष्ट असलेल्या घटकांपैकी एक आहे. आमच्या सहयोगामार्फत आपल्या जीवनाची गरज बनलेल्या फेसमास्कची ओळख करुन देणे हा आमचा उद्देश आहे. व्हॅन ह्यूसेनचे मास्क G99+ एंटीवायरल ™ने सक्षम असून ते दर्जा, सहजता आणि माफकपणा देतात. आम्ही पुरुष व स्त्रियांसाठी सुरक्षा, स्टाइल तसेच आराम देणा-या G99+ एंटीवायरल™ सक्षम एथलीशर वेअरची देखील ओळख करुन देणार आहोत.”

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.