एफएमसीजी, आयटी क्षेत्रात तेजी; सेन्सेक्स ४३७ अंकांनी वधारला

 एफएमसीजी, आयटी क्षेत्रात तेजी; सेन्सेक्स ४३७ अंकांनी वधारला


मुंबई, २३ डिसेंबर २०२०: एफएमसीजी, आयटी आणि पीएसयू बँकांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आल्याने बेंचमार्क निर्देशांकांनी १ टक्क्यांनी वृद्धी दर्शवली. निफ्टी १% किंवा १३४.८० अंकांनी वधारला व १३,५०० च्या पुढे १३,६०१.१० अंकांवर पोहोचला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.९५% किंवा ४३७.४९ अंकांनी वाढला व ४६,४४४.१८ अंकांवर स्थिरावला.  

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले आजच्या व्यापारी सत्रात की डिश टीव्ही (११.११%), आयडिया (१०.५३%), एमफॅसिस (८.५१%), इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स (९.१७%) आणि वेदांता इंडिया (८.२३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर याउलट पंजाब नॅशनल बँक (४.६४%), आयडीबीआय बँक (२.३७%), क्रॉम्पटन ग्रिव्हज कंझ्युमर इलेक्टिकल्स (१.९१%), पेज इंडस्ट्रीज (१.०५%) आणि अजंता फार्मा (१.३१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक स्थितीत स्थिरावले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे २.४०% आणि २.६५% ची वृद्धी अनुभवली.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.: ग्लेनमार्क लिमिटेड फर्मने मेनारिनीसोबत एक्सक्लुझिव लायसनिंग करार केल्यानंतर तिचे स्टॉक्स २.५० टक्क्यांनी वाढले व त्यांनी ४९६.१५ रुपयांवर व्यापार केला. या कराराद्वारे कंपनीच्या नव्या रियालट्रिस या नसल स्प्रे ची ३३ देशांमध्ये व्यापारीकरण करण्यात मदत होईल.

विप्रो लि.: कंपनीने बुधवारी मेट्रो एजी या जर्मन होलसेलरसोबत धोरणात्मक डिजिटल व आयटी पार्टनरशिपची घोषणा केली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ५.७० टक्क्यांनी वाढले व त्यांनी ३८४.९५ रुपयांवर व्यापार केला. ५ वर्षाच्या कालावधीतील या कराराचे अंदाजे मूल्य ७०० दशलक्ष डॉलर्स एवढे आहे.

दिलीप बिल्डकॉन लि.: दिलीप बिल्डकॉन लि. चे स्टॉक्स ६.०२.% नी वाढले व त्यांनी ३८०.२५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीला राजस्थानमध्ये १,००१ कोटी रुपये मूल्याच्या इपीसी प्रकल्पाला मंजूरीचे पत्र मिळाल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

लार्सन अँड टर्बो लिमिटेड: कंपनीला पाणी व कचरा प्रक्रियेसाठी जल जीवन मिशनचा एक भाग म्हणून २५०० व ५००० कोटी रुपयांदरम्यान किंमतीची ऑर्डर मिळाली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ०.३४ टक्क्यांनी वाढले व त्यांनी १,२६६ रुपयांवर व्यापार केला.

डब्ल्यूपीआयएल लि.: मध्यप्रदेश जल निगमकडून दोन प्रकल्पांकरिता कंपनीला पत्र मिळाल्यानंतर डब्ल्यूपीआयएल लि. कंपनीचे स्टॉक्स २०.००% नी वाढले व त्यांनी ५९७.६० रुपयांवर व्यापार केला. या प्रकल्पाचे करारातील मूल्य ८५१.३१ कोटी रुपये एवढे आले.

भारतीय रुपया: सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजार सत्रामुळे भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.८९ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार: कोरोना विषाणूच्या नव्या चिंतेने तसेच कोव्हिड-१९ विधेयकावर स्वाक्षरी न होण्याची भीती असूनही जागतिक बाजार उच्चांकी स्थितीत बंद झाला. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.५१%, निक्केई २२५ चे शेअर्स ०.३३%, हँगसेंगचे शेअर्स ०.८६% नी वाढले तर एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१९ टक्क्यांनी घसरले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.