आयकिया १८ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे त्यांचे नवीन स्टोअर सुरु करणार

 आयकिया १८ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे त्यांचे नवीन स्टोअर सुरु करणार



मुंबई, ४ डिसेंबर २०२०:- स्वीडिश ब्रँड आणि आघाडीचे घरगुती फर्निचरचे विक्रेते आयकिया (इंग्का समूहाचा एक भाग) ने १८ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे त्यांचे नवीन स्टोअर सुरु करण्याची घोषणा केली आहे. आयकिया ला मोठे स्वप्न आणि कमी पैसे असलेल्या लोकांना गुणवत्तापूर्ण दैनंदिन जीवन प्रदान करायचे आहे. घर हे जगातील सर्वात महत्वपूर्ण स्थान आहे आणि म्हणूनच आयकिया ची अद्वितीय आणि परवडणारी श्रेणी ग्राहकांना त्यांच्या घरी गुणवत्तापूर्ण जीवनशैली प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ५ लाख+ चौ. फूट जागा असलेले आयकिया चे स्टोअर, प्रत्येक घरासाठी प्रेरणा आणि कल्पनेसह ७००० पेक्षा अधिक उत्कृष्ट डिजाईन, परवडणारे, उत्तम दर्जाचे आणि टिकावू होम फर्निशिंग उत्पादनांसह अनेक लोकांना प्रोत्साहित करेल. आयकिया चे हे स्टोअर ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे स्थानकापासून अंदाजे ६०० मीटर अंतरावर आहे. ग्राहक आता बिली बुककेस, माल्म बेड,इकटॉर्फ सोफा इत्यादी असे आयकिया चे अद्वितीय उत्पादने टेस्ट, ट्राय आणि खरेदी करू शकतील.


पीटर बेटझेल, सीईओ अँड चीफ सस्टेनॅबिलिटी ऑफिसर, आयकिया   इंडिया म्हणाले की, “मुंबई भारतातील आमच्या महत्वपूर्ण बाजारपेठांपैकी एक आहे ज्यासाठी आम्ही अत्यंत उत्साही आहोत. २०१९ च्या सुरुवातीपासूनच आम्ही मुंबई मध्ये ऑनलाईन उपलब्ध आहोत आणि लवकरच मुंबईतील बरेच लोक अद्वितीय आयकिया  स्टोअरमधून खरेदी करण्यास सक्षम असतील. महाराष्ट्राशी आमच्या दीर्घकालीन प्रतिबद्धतेमुळे आम्ही २०३० पर्यंत ६००० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करू ज्यापैकी ५०% महिलांसाठी असेल.”


सुभाष देसाई, आदरणीय उद्योग मंत्री, महाराष्ट्र सरकार म्हणाले की “त्यांच्या नवी मुंबई येथील स्टोअरसह आयकिया चा पुढील विस्तार बऱ्याच मार्गाने सकारात्मक प्रभाव निर्माण करेल. याच्या माध्यमातून होम फर्निशिंग रिटेल आणि मॅनिफॅक्चरिंग सेक्टरचा विस्तार होईल तसेच राज्यात अधिक रोजगार, कौशल्य विकास आणि लॉजिस्टिकल डेवलपमेंट निर्माण होईल. स्थानिक समुदायाला आयकिया च्या उपस्थितीचा अत्यधिक फायदा होईल आणि म्हणूनच आम्ही आयकिया चे अत्यंत उत्साहाने स्वागत करू इच्छितो.”


नवी मुंबईत आयकिया च्या उपस्थितीने स्थानिक समुदायासाठी  रोजगाराच्या संधीं निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई येथील स्टोअरमध्ये जवळपास १२०० सहकारी काम करणार आहे ज्यामध्ये ५०% महिलांचा समावेश असेल. ज्यामध्ये ४०% कर्मचारी नवी मुंबई परिसरातील आहेत तर ७०% कर्मचारी जे मुख्यतः हाऊसकिपींग आणि सिक्युरिटी विभागात काम करेल ते घाणसोली आणि तुर्भे किंवा आजूबाजूच्या परिसरातील आहे. कोविड-१९ महामारीच्या दरम्यान आयकिया ने निरंतरपणे समाजातील असहाय्य कुटुंबांना मदत केली आहे.तसेच आयकिया ने समाजाला मदत करत पाठिंबा देण्यासाठी एमआयडीसी(महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन)  सोबत देखील  भागीदारी केली आहे.


आयकिया ने ईकॉमर्स, फिजिकल स्टोअर्स आणि क्लिक अँड कलेक्ट, क्लिक अँड डिलिवर आणि रिमोट प्लॅनिंग या अतिरिक्त सेवांसह त्यांची उपस्थिती सर्वत्र विकसित केली आहे. नवी मुंबई स्टोअरनंतर, मुंबईतील अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी २०२१ दरम्यान आयकिया आणखी दोन सिटी सेंटर स्टोअर्स सुरू करण्याची योजना आहे. आतापर्यंत जवळपास ३५ दशलक्ष ऑनलाइन विजिटर्स सह आयकिया मुंबई, हैदराबाद आणि पुणेमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे तसेच २०२२ पर्यंत १०० दशलक्ष भारतीय ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे आयकिया चे लक्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24