भारतीय निर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर

 


भारतीय निर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर

~ निफ्टी १३,६०० पातळीपुढे तर सेन्सेक्सने ४०० अंकांची वृद्धी ~

मुंबई, १६ डिसेंबर २०२०: बेंचमार्क निर्देशांक उच्चांकी स्थितीत पोहोचले. कारण निफ्टी आणि सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला. या वृद्धीचे नेतृत्व मेटल, फार्मा, ऑटो आणि रिअॅलिटी शेअर्सनी केले.

 

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात निफ्टी ०.८५% किंवा ११४.८५ अंकांनी वधारला व १३,६०० पातळीपुढे म्हणजेच १३,६८२.७० वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्समध्ये ०.८७% किंवा ४०३.२९ अंकांची वाढ झाली व तो ४६,६६६.७० अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १,८०१ शेअर्सनी नफा कमावला, १,१२९ शेअर्स घसरले तर १६४ शेअर्स स्थिर राहिले. एचडीएफसी (२.७५%), हिंडाल्को (२.८४%), टायटन (२.०६%), डिव्हिस लॅबोरेटरीज (२.५९%) आणि ओएनजीसी (२.५९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर आयसीआयसीआय बँक (१.०७%), अल्ट्राटेक सिमेंट (०.८३%), एनटीपीसी (०.६६%), गेल (०.६८%) आणि टेक महिंद्रा (०.६०%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

 

पीएसयू बँक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात कामगिरी केली. यापैकी बहुतांश नफा मेटल आणि ऑटो क्षेत्राचा झाला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.८७% आणि ०.८८% नी वधारले.

 

रत्नमणी मेटल्स अँड ट्युब्स लि.: रत्नमणी मेटल्स कंपनीने १०५ कोटी रुपयांची देशांतर्गत ऑर्डर मिळाली. तरीही कंपनीचे शेअर्स ०.९२% नी घसरले व त्यांनी १,५९६.९५ रुपयांवर व्यापार केला. तेल व वायू क्षेत्रातील कोटेड कार्बन स्टील पाइपसाठी ही ऑर्डर मिळाली.

लुपिन लि.: लुपिन लिमिटेड कंपनीचे स्टॉक्स १.८६% नी वाढले व त्यांनी ९६२.०० रुपयांवर व्यापार केला. गॅव्हिस/नॉव्हेल ट्रान्झॅक्शन्समधील विक्रेत्याशी झालेला वाद मिटल्याचे कंपनीने जाहीर केल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

 

एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लि.: एच.जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीने एक ऑर्डर मिळवली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ५.३७% नी वाढले व त्यांनी २३४.४५ रुपयांवर व्यापार केला. आज इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडकडून  L-1 कंपनीला L-1 बिडर म्हणून घोषित करण्यात आले.

 

फ्युचर एंटरप्रायझेस लि.: एंटरप्राइजने २८३.६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झेलला, तर १७ कोटींचा नफा कमावला. तर १७०० कोटी रुपयांच्या महसूलाच्या तुलनेत २३८ कोटी रुपयांचा महसूल कमावला. नुकसान होऊनही कंपनीचे स्टॉक्स १.३२% नी वधारले व त्यांनी ११.५५ रुपयांवर व्यापार केला.    

 

पंजाब नॅशनल बँक: बँकेचा क्यूआयपी फ्लोअर प्राइस ३७.३५ रुपये प्रति शेअरवर सुरु झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स ६.०३% नी घसरले व त्यांनी ३८.१५ रुपयांवर व्यापार केला. क्यूआयपीद्वारे बँकेने ७,००० कोटी रुपये जमवण्याचे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे.

 

महिंद्रा अँड महिंद्रा लि.: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने प्रवासी व कमर्शिअल वाहनांची किंमत वाढवल्यानंतर कंपनीचे शेअर्स १.८८% नी वाढले व त्यांनी ७३१.४५ रुपयांवर व्यापार केला.

 

भारतीय रुपया: भारतीय रुपयाने देशांतर्गत बाजारात खरेदी दिसून आल्यानंतर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.८५ रुपयांवर व्यापार केला.

 

जागतिक बाजारात सकारात्मक व्यापार: कोरोना विषाणूच्या साथीमुळे हादरलेल्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी सरकार प्रोत्साहन देतील, या आशेमुळे नॅसडॅकने १.२५%  ने विक्रमी वृद्धी केली. एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० चे शेअर्स अनुक्रमे ०.८५% व १.१२% नी वाढले. तर दुसरीकडे निक्केई २२५  आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.२६% आणि ०.९७% नी वधारले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.