२०२१ मध्ये या शेअर्सवर ठेवा नजर

२०२१ मध्ये या शेअर्सवर ठेवा नजर

(लेखक : अमरजीत मौर्य, एव्हीपी, मिडकॅप्स, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)

हॉकिन्स कूकर्स सीएमपी: ५,८२० अपसाइड-१५%: हॉकिन्स कूकर्स लि. (एचसीएल)ही कंपनी दोन सेगमेंटमध्ये काम करते. एक म्हणजे प्रेशर कूकर व दुसरे कूकवेअर. कंपनीच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आम्ही हॉकिन्स कूकर्सच्या मजबूत महसूलाबाबत सकारात्मक आहोत. तसेच बाजारातील शेअर वाढवणे, स्वयंपाकाच्या गॅस क्षेत्रात प्रवेश, ब्रँडचे मजबूत नाव, वितरणाची विस्तृत प्रणाली व कोव्हिड-१९ नंतर किचन उत्पादनांची भरपूर मागणी या कारणास्तव आम्ही कंपनीबाबत सकारात्मक आहोत.

स्वराज इंजिन्स सीएमपी:- १,४०८ अपसाइड- २५%: स्वराज इंजिन्स (एसईएल) ही एमअँडएम साठी ट्रॅक्टर डिझेल इंजिन्स तयार करण्याच्या व्यवसायातील कंपनी आहे. २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत, एसईएलने ~31% ची मजबूत व्हॉल्यूम ग्रोथ अनुभवली. तसेच ट्रॅक्टर क्षेत्रातील वृद्धीचे आकडे पाहता ही कंपनी आणखी प्रगती करेल, असा आमचा अंदाज आहे. ( उत्तम मान्सून, खरीपात झालेली भरपूर लागवड आणि सरकारचा सातत्याने मिळणारा पाठींबा, प्रमुख पिकांना सर्वाधिक एमएसपी इत्यादी कारणे यामागे आहेत.) या सर्वांचा फायदा स्वराज इंजिन्ससारख्या कंपन्यांना होईल. त्यामुळे या स्टॉकबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

व्हर्लपूल ऑफ इंडिया सीएमपी:- २,५५६ अपसाइड- २२%: व्हर्लपूल ऑफ इंडिया (WIL) ही कंपनी रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, एअर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, बिल्ट इन आणि स्मॉल अप्लायन्सेसच्या निर्मितीत काम करते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीने स्थान मिळवले आहे.

खालील स्तरावरील श्रेणीत WIL च्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओची उपस्थिती लागल्याने अधिक वृद्धी होऊ शकते. तसेच कंपनी उत्तम भविष्य असलेल्या श्रेणीवर भर देत आहे. उदा. वॉटर प्युरिफायर, एसी तसेच किटच हूड्स व हॉब्स. ही उत्पादने लाँच करून पोर्टफोलिओतील उत्पादनांमधील फरक भरून काढला जात आहे. यासोबतच, मजबूत ब्रँड, विस्तृत वितरण प्रणाली, विस्तारण्याची क्षमता व उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत असणे, या मुद्द्यांआधारे कंपनीची अधिक समृद्धी होईल, अशी अपेक्षा आहे.

रॅडिको खेतान सीएमपी:- ४५० रुपये अपसाइड- २०%: रेडिको खेतान लि. (RKL) ही IMFL ची आघाडीची निर्माती आहे. मॅजिक मोमेंट्स व्होडका, ८पीएम प्रीमियम ब्लॅक व्हिस्की इत्यादी प्रीमियम ब्रँडमध्ये वाढत्या विक्रीसह संपूर्ण भारतभरात तिची जोरदार उपस्थिती आहे. २०२१ च्या दुस-या तिमाहीत आरकेएल कंपनीने आयएमएफएल उद्योगात भरभराट कोली. रेडिकोने विक्रीत ~११% ची वृद्धी घेतली, यूबीचा महसूल वार्षिक स्तरावर - ४३% डीग्रोथ झाला, यूएनएसपी -७% डीग्रोथ आणि पेरनॅड रिकर्ड -१३.५% वर डीग्रोथ झाला. त्यामुळे भविष्यात आरकेएल ही बाजारातील वाटा, नवी उत्पादने आणणे, प्रीमियम प्रॉडक्ट मिक्स, मजबूत ब्रँडनेम आणि विस्तृत वितरण प्रणाललीच्या आधारे टॉप-लाइन व बॉटम लाइनमध्ये वृद्धी करेल, अशी अपेक्षा आहे.

पेज इंडस्ट्रीज सीएमपी:- २७,५२५ रुपये. अपसाइड- २०%: पेज इंडस्ट्रीज ही कंपनी पुरुष महिला आणि मुलांसाठीचे इनरवेअर, अॅथलेजर, स्लीपविअर आणि स्विमविअरचे उत्पादन, वितरण आणि मार्केटिंग करते. कंपनीला जॉकी ब्रँडचे एक्सक्लुझिव्ह लायसन्स आहे. प्रीमियम इनरविअर आणि लेजर विअर श्रेणीत भारतात जॉकी हा आघाडीचा ब्रँड आहे. त्यामुळे, एक दमदार ब्रँड नेम, विस्तृत वितरण प्रणाली, अॅथलेजर व किड्ससारख्या नव्या श्रेणीत प्रवेश या मुद्द्यांआधारे कंपनीच्या महसूलात वृद्धी होईल, अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE