हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर ४६ वर्षीय व्यक्तीला अखेर कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद मिळणार
हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर ४६ वर्षीय व्यक्तीला
अखेर कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद मिळणार
जतिन संघवी या ४६ वर्षीय व्यक्तीला कोविड-१९च्या विविध जटिल लक्षणांमधून बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाले. भाटिया हॉस्पिटलमध्ये विषाणूशी दोन महिन्यांहून अधिक काळ लढा दिल्यानंतर ते हॉस्पिटलमधून बरे होऊन आले. तो अत्यंत लठ्ठ होता आणि त्याला उच्च रक्तदाब, दमा व स्लीप एपनियाचा त्रास होता. ज्यामुळे उपचार करणे अत्यंत अवघड झाले. तो १५ ऑक्टोबर रोजी भाटिया हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्यापासून ५५ दिवस आयसीयूमध्ये होता. एका क्षणाला डॉक्टरांनी विषाणूपासून त्याला वाचवण्याची आशा सोडून दिली होती. त्याच्या शरीरामध्ये पाणी जमा झाले होते आणि त्याच्या वजनामुळे सीटी स्कॅन देखील करता आले नाही.
डॉ. मनिष मवानी आणि डॉ. सुजीत राजन म्हणाले की, तो सहजपणे उपचार करता येणारा रूग्ण नव्हता. आम्ही त्याच्या वजनामुळे त्याच्या फुफ्फुसामध्ये झालेले इन्फेक्शन जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन करू शकलो नाही. आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजन संतृप्त पातळी ६० होती. त्याला ५० दिवस नॉन-इन्वेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते आणि आम्हाला भिती होती की तो हालचाल न झाल्यामुळे एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्यासाठी त्याला विशेष अॅण्टी-फायब्रोटिक औषधे देण्यास सुरूवात केली आणि त्याला १० दिवस रेमडेसिवर देण्यात आले, तसेच प्लाझ्मा संक्रमण करण्यात आले.
विषाणूपासून वाचल्यामुळे संघवी यांनी सर्वांचे आभार मानले. त्याने त्याच्यापेक्षा अधिक स्थिर असलेल्या रूग्णांचा विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे पाहिले होते. त्याच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती व मानसिक सामर्थ्य होते. निराश न होता स्वत:ला खंबीर ठेवण्यासाठी तो सपोर्ट स्टाफसोबत गप्पागोष्टी करायचा आणि हळूहळू तो त्यांचा व आयसीयू कर्मचा-यांचा मित्र बनला. त्याने हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्टरांकडून मिळालेल्या सहकार्याचे आभार मानले. हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्टरांनी आजारामधून बरे करण्यासाठी या दोन महिन्यांमध्ये त्याची उत्तम काळजी घेतली.
Comments
Post a Comment