युनियन बँक ऑफ इंडियाची महत्वपूर्ण कामगिरी

 

युनियन बँक ऑफ इंडियाची महत्वपूर्ण कामगिरी

~ पूर्वीच्या कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण ~

मुंबई, १ डिसेंबर २०२०: सरकारी मालकीच्या युनियन बँक ऑफ इंडियाने तीन बँकांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत आणखी एक महहत्त्वाचा टप्पा गाठला. आजच्या आयटी एकत्रीकरणानंतर, पूर्वीच्या कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखा (सेवा शाखा आणि विशेष शाखांसह) युनियन बँक ऑफ इंडियामध्ये पूर्णपणे एकत्रित झाल्या आहेत.

पूर्वीच्या कॉर्पोरेशन बँकेचे सर्व ग्राहक विक्रमी वेळेत युनियन बँकेच्या सीबीएसमध्ये यशस्वीरित्या स्थानांतरीत झाले आहेत. या यशसोबतच बँकेने इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, युपीआय, आयएमपीएस, एफआय गेटवे, ट्रेझरी आणि स्विफ्ट या सेवा पूर्वीच्या कॉर्प बँकेच्या ग्राहकांसाठी खुल्या केल्या असून याद्वारे ते युबीआयच्या शाखा आणि डिलिव्हरी चॅनल्सद्वारे अखंडपणे व्यवहार करू शकतील. बँकेने यापूर्वीच एटीएम स्विच आणि एटीएम टर्मिनल सहजपणे युबीआय नेटवर्कमध्ये स्थलांतरीत केले आहे.

संपूर्ण स्थलांतर विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून ग्राहकांना अत्यंत कमी गैरसोय सोसावी लागली. यात ग्राहकांच्या अकाउंट नंबर, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग क्रिडेन्शिअल्समध्येही कोणताही बदल करण्यात आला नाही. हे संपूर्ण स्थलांतर इन्फोसिस, ईवाय आणि बीसीजी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. बँकेने यापूर्वीच नवीन संस्था रचना, सुसंवादित उत्पादने आणि प्रक्रिया इत्यादीसह प्रशासकीय एकत्रिकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, हे सांगणे उल्लेखनीय ठरते.

युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय जी म्हणाले, “सर्व ई-सीबी शाखा व डिलिव्हरी चॅनल्सचे पूर्ण एकत्रिकरण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. याद्वारे आमच्या ग्राहकांसाठी मोठी संधी खुली झाली असून नवनवीन उत्पादने व सेवांची क्षमताही वाढली आहे. नियोजनानुसार, पुढील टप्प्यात ई-आंध्र बँकेच्या सर्व शाखा चालू आर्थिक वर्षात फिनॅकल १० मध्ये स्थलांतरीत होतील."

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.