एच-एनर्जी आणि होग यांच्यात एफएसआरयू करार

एच-एनर्जी आणि होग यांच्यात एफएसआरयू करार

·         होग जायंट  एच-एनर्जीच्या जयगड एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनलमध्ये फ्लोटिंग स्टोरेज आणि रिगॅसिफिकेशन युनिट (एफएसआरयू) १० वर्षांसाठी तैनात करण्यात येईल, याची डिलिव्हरी २०२१ सालातील पहिल्या तिमाहीमध्ये सुरू होईल.

·         मार्च २०२१मध्ये एच-एनर्जी त्यांच्या जयगड रिगॅसिफिकेशन टर्मिनलचा आरंभ करेल

एच-एनर्जीला आपल्या वेस्टर्न कन्सेशन प्रायव्हेट लिमिटेड (एच-एनर्जी) या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या माध्यमातून जाहीर करताना आनंद होत आहे की, त्यांनी होग एलएनजी होल्डिंग लि. यांच्यासोबत करार केला आहे. होग जायंटतर्फे १० वर्षांच्या करारांतर्गत फ्लोटिंग स्टोरेज आणि रिगॅसिफिकेशन युनिट (एफएसआरयू) पुरविण्यात येणार आहे. ही युनिट्स एच-एनर्जीच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरावर असलेल्या एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल प्रकल्पासाठी उपयोजित करण्यात येणार आहेत. २०२१ या वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये ही एफएसआरयू एच-एनर्जीच्या जयगड प्रकल्पामध्ये पोहचविण्यात येतील.

 २०१७ साली बांधण्यात आलेल्या होग जायंटची साठवणूक क्षमता १७०,००० मी इतकी आहे आणि त्यांची कमाल रिगॅसिफिकेशन क्षमता ७५० एमएमएससीएफडी (अंदाजे ६.० एमएमटीपीए) इतकी आहे. एफएसआरयूतर्फे नॅशनल गॅस ग्रिडला जोडणाऱ्या ५६ किमी लांबीच्या जयगड-दाभोळ पाइपलाइनला रिगॅसिफाइड एलएनजी पुरविण्यात येणार आहे आणि एलएनजी ट्रक लोडिंग सुविधेमद्येही ऑनशोअर एलएनजी पुरविण्यात येईल. बंकरिंग सेवांसाठी इतर एलएनजी जहाजामध्ये एलएनजी रिलोड करण्याची क्षमताही एफएसआरयूकडे आहे

 एफएसआरयूच्या डिलिव्हरीनंतर एच-एनर्जी मार्च २०२१मध्ये त्यांचा जयगड एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल प्रकल्प सुरू करेल. हे एलएनजी टर्मिनल भारतातील पहिले एफएसआरयूवर आधारीत एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल असेल.

 आपल्या ग्राहकांना ट्रकमधून एलएनजीचा पुरवठा करण्यासाठी एच-एनर्जीच्या जयगड एलएनजी टर्मिनलमद्ये ट्रक लोडिंग सुविधाही निर्माण करण्यात येत आहेत. वाहतुकीसाठी इंधन म्हणून एलएनजी आणि सीएनजीचा वापर वाढावा यासाठी भारतभर एल-सीएनजी स्टेशन्स विकसित करण्याची एच-एनर्जीची योजना आहे. या माध्यमातून भारताच्या पर्यायवरण धोरणाशी सुसंगत असे योगदान देता येईल.

 जयगड प्रकल्पाबाबतचा करार आणि आरंभ याची घोषणा करताना एच एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दर्शन हिरानंदानी म्हणाले, “होगसारख्या अनुभवी कंपनीशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यामुळे जयगड प्रकल्पातून पहिला गॅस मार्च २०२१ मध्ये पुरविण्यात येईल. भारत सरकार आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने अनेक सकारात्मक पावले उचलली आहे. यात एकीकृत दर आणि शहर गॅस वितरण ओपन अॅक्सेस यांचा समावेश आहे, ज्यामुळे भारतातील नैसर्गिक वायूच्या वापरामध्ये  अनेक पटींनी वाढ झाली आहे. सक्षम, किफायतशीर आणि ग्राहककेंद्री एलएनजी व्हॅल्यू चेन असलेली भारतीय कंपनी म्हणून एच-अनर्जी आपले अस्तित्व प्रस्थापित करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App