के जे सोमैया कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग व गोदावरी बायोरिफायनरीज लि.चा स्थिर वातावरणाप्रती पुढाकार

 के जे सोमैया कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग व गोदावरी बायोरिफायनरीज लि.चा स्थिर वातावरणाप्रती पुढाकार

मुंबई, डिसेंबर २०२०: भात पेंढा जाळल्‍यामुळे बाहेर पडणारा धूर हा देशातील, विशेषत: उत्तरेकडील प्रांतांमध्‍ये प्रदूषणासाठी मुख्‍य कारणीभूत घटक आहे. वर्षानुवर्षे वाढत असलेले प्रदूषण मानवांसोबत वनस्‍पती व प्राण्‍यांसाठी गंभीर आरोग्‍यविषयक समस्‍या बनत आहे. सरकार पेंढ्याच्‍या जळण्‍यामुळे होणा-या प्रदूषणावर आळा घालण्‍याकरिता उपायांचा शोध घेत असताना के जे सोमैया कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग व गोदावरी बायोरिफायनरीज लि. यांनी सहयोगाने भात पेंढ्याच्‍या ज्‍वलनाच्‍या घातक परिणामांचे निर्मूलन करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी उपाय सादर केला आहे. संस्‍थेमधील फॅकल्‍टी मेकॅनिकल डिपार्टमेंटच्‍या प्रा. शिवांगी विरल ठक्‍कर यांनी लगदा व टेबलवेअर सारखी उपयुक्‍त उत्‍पादने बनवण्‍यासाठी भात पेंढ्याचा वापर करण्‍याचा प्रस्‍ताव मांडला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने तीन वर्षे चालणा-या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यासोबत अर्थसाह्य देखील केले आहे.

पेंढा कच-याचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या प्रमुख उद्देशासह प्रकल्‍पाचा प्‍लास्टिक बंदी या देशाच्‍या आणखी एका समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी प्‍लास्टिकच्‍या जागी कृषी उत्‍पादनांचा वापर करण्‍याचा देखील संकल्‍प आहे. प्रकल्‍पाने पर्यावरणास अनुकूल टेबलवेअर निर्माण करण्‍यासाठी भात पेंढ्याचा लगदा तयार करणा-या सानुकूल प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले. यामध्‍ये भात पेंढ्याचा लगदा तयार करत सिलिका व लगदा वेगळे करण्‍याच्‍या प्रक्रियेचा समावेश आहे. तयार झालेला लगदा नंतर १०० टक्‍के बायोडिग्रेडेबल टेबलवेअर बनवण्‍यासाठी वापरण्‍यात येईल.

या प्रकल्‍पाबाबत बोलताना के जे सोमैया कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्‍या फॅकल्‍टी मेकॅनिकल डिपाईमेण्‍टच्‍या प्राध्‍यापिका आणि प्रकल्‍पाच्‍या प्रमुख अन्‍वेषक शिवांगी विरल ठक्‍कर म्‍हणाल्‍या, ''पेंढा कचरा व्‍यवस्‍थापन हा संशोधनाचा प्रमुख उद्देश असला तरी प्‍लास्टिक व समकालीन पेपर्सच्‍या जागी कृषी उत्‍पादनांचा वापर केल्‍याने प्‍लास्टिक व थर्मोकोल बंदी या देशाच्‍या आणखी एका समस्‍येचे देखील निराकरण होण्‍याची खात्री मिळेल. समकालीन टेबलवेअर व पेपर्सच्‍या जागी या उत्‍पादनांचा वापर करण्‍यापूर्वी त्‍यांची चाचणी करण्‍यात येईल.''  

सोमैया विद्याविहार युनिव्‍हर्सिटीचे उपकुलगुरू प्रा. व्‍ही. एन. राजशेखरन पिल्‍लई म्‍हणाले, ''जागतिक स्‍तरावरील प्रत्‍येक देश विकासाच्‍या संदर्भात शाश्‍वतपूर्ण दृष्टिकोनाचा अवलंब करण्‍यासाठी काम करत आला आहे. सोमैया विद्याविहार युनिव्‍हर्सिटीमधील आम्‍ही आमच्‍या कॅम्‍पसमध्‍ये स्थिर वातावरणासह स्‍वत:ला जुळवून घेतले आहे. तसेच, आम्‍ही हीच बाब राष्‍ट्रीय पातळीवर देखील रुजवण्‍याचा प्रयत्‍न करत आलो आहोत. अशाप्रकारचा प्रकल्‍प निश्चितच प्रदूषणाच्‍या समस्‍येचे निराकरण करेल आणि लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्‍यासाठी शाश्‍वत विकासाला चालना देईल. अशा प्रकारच्‍या प्रकल्‍पामुळे सर्वांना भविष्‍यात राहण्‍यासाठी उत्तम ठिकाण मिळण्‍याची खात्री मिळेल.''

डॉ. रमेश शेट्टर (गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड) म्‍हणाले, ''भात पेंढ्याचे व्‍यवस्‍थापन आजच्‍या काळात अत्‍यंत आव्‍हानात्‍मक काम बनले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून बंदी घालण्‍यात आलेली असताना देखील पेंढा जाळणे सुरूच आहे. भात पेंढा सतत जाळल्‍यामुळे जमिनीमध्‍ये उष्‍णता निर्माण होत जमिनीची धूप होते. परिणामत: जमिनीतील ओलावा निघून जातो आणि उपयुक्‍त जीवाणू, मातीचा गळ व चिकणमातीचे कण नष्‍ट होतात. मातीची सुपीकता नष्‍ट झाल्‍यामुळे मातीच्‍या रचनेचे देखील नुकसान होते.''  

ते पुढे म्‍हणाले, ''उत्तर भारतातील बहुतांश शेतक-यांना पेंढ्याचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या उत्तम पर्यायी उपायांबाबत माहित नाही. ज्‍यामुळे ते पेंढा जाळण्‍याला सर्वोत्तम पर्याय मानतात. यामधून शेतक-यांमध्‍ये आर्थिकदृष्‍ट्या व्‍यवहार्य पर्याय व पेंढा जाळण्‍याच्‍या संमिश्र परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणा-या उपक्रमांची तीव्र गरज दिसून येते.'' 

पेंढा व्‍यवस्‍थापनासाठी एकीकृत व्‍यवस्‍थापन दृष्टिकोन, विविध संयुक्‍त धोरणांची गरज आहे. गोदावरी बायोरिफायनरीय लि. प्‍लास्टिकचा वापर टाळण्‍यासाठी भात पेंढ्यासह सर्व कृषी अपशिष्टाला बायो-कम्‍पोझिट व फूड ग्रेड टेबलवेअर सारख्‍या उपयुक्‍त उत्‍पादनांमध्‍ये बदलण्‍याकरिता बरेच प्रयत्‍न करत आहे.

भारत हा जगातील तांदळाच्‍या सर्वाधिक उत्‍पादन करणा-या देशांपैकी एक देश आहे. जगभरातील तांदूळ उत्‍पादनामध्‍ये भारताचा हिस्‍सा २० टक्‍के आहे. दरवर्षाला जवळपास १५० ते २२५ एमएमटी भात पेंढा अपशिष्ट तयार होते. शेतकरी जवळपास ७० ते ८० एमएमटी भात पेंढा जाळून त्‍याची विल्‍हेवाट लावतात. एकट्या पंजाब राज्‍यामध्‍ये दरवर्षाला २० एमएमटी भात पेंढा निर्माण होतो. एक टन भात पेंढा जाळल्‍याने निर्माण होणा-या धूरामधून ३ किग्रॅ कण घटक, ६० किग्रॅ कार्बन मोनोऑक्‍साईड, १४६० किग्रॅ कार्बन डायऑक्‍साईड, १९९ किग्रॅ राख आणि २ किग्रॅ सल्फर डायऑक्‍साईड उत्‍सर्जित होतात. ज्‍यामुळे फुफ्फुसाचे व श्‍वसनविषयक आजार होण्‍यासोबत सार्वजनिक आरोग्‍यावर दुष्‍परिणाम होतो. सतत भात पेंढा जाळत राहिल्‍याने जमिनीची धूप देखील होते.    

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202