एसव्हीपी ग्लोबल वेंचर्सच्या ऑर्डर बुकने गाठला Rs 5000 कोटींचा टप्पा

 एसव्हीपी ग्लोबल वेंचर्सच्या ऑर्डर बुकने गाठला Rs 5000 कोटींचा टप्पा

मुंबई21 डिसेंबर, 2020: एसव्हीपी ग्लोबल वेंचर लिमिटेड आपल्या अभिनव शक्तीच्यासर्वात अत्याधुनिक आणि किफायतशीर निर्मिती सुविधा केंद्रासाठी ओळखली जाते. भारत आणि ओमान दरम्यानच्या ग्लोबल टेक्सटाईल ट्रेड रूटवर धोरणात्मकरितीने वसवलेली आहे. कापड उद्योग व्यापारात या कंपनीला 100 हून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. कंपनीची कच्चा माल पुरवठा यंत्रणा बळकट आणि कार्यक्षम असून आपल्या उत्पादनांकरिता भारत तसेच भारताबाहेर विस्तृत विक्री पुरवठा जाळे कंपनीने निर्माण केले. कोविड 19 महामारीमुळे धाग्याची भारतीय स्थानिक मागणी घसरली, शीपमेंटमध्ये स्थगिती आली तसेच ऑर्डरना विलंब होऊ लागला, व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने कंपनीने विस्तृत पुरवठा नेटवर्कला गती दिली असून असून अधिकाधिक नफा असलेल्या परदेशी बाजारांवर लक्ष वळवले आहे.

Q2FY21 दरम्यान कंपनीचा महसूल Rs. 364 कोटींपर्यंत पोहोचला असून मागील तिमाहीत कोविड काळातील टाळेबंदीच्या कालावधीत तो Rs. 91.82 कोटी एवढा राहिला. Q2FY21 दरम्यानचा नफा Rs. 10.75 कोटी असून कोविडमुळे मागील तिमाहीत झालेले नुकसान Rs.57.44 कोटी एवढे होते. सध्या आगामी 2-3 वर्षांसाठी जागतिक कापड बाजारातून मिळालेल्या ऑर्डरसाठी निर्मितीच्या दिशेने कंपनीची विक्री भागीदारी आणि धाग्यासंबंधीच्या व्यवहार तरतुदी यांचे मूल्यांकन  INR 5000 कोटींच्या घरात आहे.

मागील काही वर्षांपासून कंपनी अल्प मार्जिन आणि अति-महत्त्वाच्या नसलेल्या व्यवसायातून बाहेर पडली असून आटोपशीर धागा क्षमता विस्तारीकरण उच्च-मार्जिनकडे कंपनीने आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे FY2019-20 दरम्यान एकंदर EBITDA मार्जिन सुधारणेत 16.51%  पर्यंतची वाढ झालीतर FY 2018-19 दरम्यान हे मार्जिन 14.87% राहिलेसाल-दरसाल वाढ 12.4%  इतकी होती. याच कालावधीत PAT आणि EPS ची अनुक्रमे वृद्धी 10.6% आणि 11.9% याप्रमाणे नोंदवली गेली. आता हळूहळू कामकाज कोविड-पूर्व काळाप्रमाणे पूर्ववत होते आहेभारतात हे कामकाज 95% हून अधिक तर ओमानमध्ये सुमारे 50% च्या आसपास सुरळीत झाले. ओमानमधील निर्मिती सुविधा केंद्रांत स्थापन करण्यात आलेल्या 150,000 स्पिंडल (सूत गुंडाळण्याची चकती)चा वापर होतो आहे. आगामी तिमाही कालावधीत 95% पेक्षा जास्त कार्यक्षम होण्याचा अंदाज आहे. 

जागतिक सुती धागा बाजारपेठेत भारताचे वर्चस्व असून देशात 50 दशलक्ष स्पिंडल्स आणि 0.75 मिलियन ओपन-एंड रोटोर्स आहेत. सध्या एकंदर 4700 दशलक्ष किलोहून अधिक धाग्याची निर्मिती होत असून त्यातील 3,400 दशलक्ष किलोपेक्षा अधिक सुती धागा आहे. एकंदर धागा निर्मितीमधील सुमारे 73% धागा सुती असतो.

व्यवसायाच्या क्षमता आणि बळकटीकरणाविषयी आपले मत व्यक्त करताना श्री वल्लभ पित्ती ग्रुपचे अध्यक्ष श्री. विनोद पित्ती म्हणाले,

 “जागतिक बाजारामध्ये स्पर्धा करण्यासाठी एसव्हीपीने दिलेला जलद प्रतिसाद हा व्यवसायाच्या कामकाजात आणि क्षमता वृद्धीत अत्याधुनिक निर्मिती तंत्रज्ञानाच्या एकीकरणाचा सुयोग्य परिणाम आहे. कंपनीने 2016 मध्ये राजस्थानातील झालावारमध्ये अत्याधुनिक आणि स्वयंचलित स्टेट ऑफ आर्ट 1,50,000  स्पिंडल्स आणि 2,400 रोटर्स असणाऱ्या कापूस सूत निर्मिती केंद्राची स्थापना करून त्यांच्या निर्मितीकरणात वाढ केली.  सातत्याने नवीन उपक्रम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे दोन महत्त्वाचे घटक जागतिक बाजारात स्पर्धात्मक फायदा मिळवून देतात आणि एसव्हीपीने तंत्रज्ञानग्राहक वर्तणूक आणि अपेक्षांचा वापर करून बाजारातील मागण्यांना लवचिक आणि जलद प्रतिसाद दिला. याखेरीजडिजिटल परिवर्तनामुळे निर्मिती तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाली आणि आताच्या क्षमतेत विस्तार झाल्याने कंपनी श्रमप्रधानतेकडून भांडवल प्रधान उत्पादनाकडे जाण्यासाठी सक्षम झाली.”

ते पुढे म्हणाले, “2018-19 दरम्यान आम्ही ओमान येथे 3500 रोटर्स आणि 1,50,000 स्पिंडल्स असणाऱ्या निर्मिती केंद्राची स्थापना आणि त्याचे कामकाज सुरू केले.  आजच्या घडीला भारत आणि ओमान या दोन्ही ठिकाणी मिळून कंपनीची एकूण उत्पादन क्षमता 4,00,000 स्पिंडल्स आणि 5,900 रोटर्स इतकी आहे.  श्रेणीचा अभावकमी मनुष्यबळ आणि संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर फार लक्ष न देणे या भारतातील उत्पादकांसमोरील महत्त्वाच्या समस्या आहेत. 

कापड उद्योग आणि निर्यातीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 2017-18 साली जागतिक बाजारात भारताचा वाटा 5% नोंदवण्यात आला होता जो US$ 39.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सची इतका होता. त्यात 3% वाढ होऊन 2018-19 साली तो 40.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका झाला. 2018-19 साली कापड आणि कपडे उद्योगातील भारताची एकूण निर्यात 12% होती. युरोपियन देश आणि अमेरिका ही भारतासाठी महत्त्वाची निर्यात ठिकाणे असून एकूण 48% कापड आणि कपडे निर्यात चालते. अमेरिका-चीनमधील व्यापार संघर्ष आणि चीन-भारतातील दुरावा यामुळे शेजारील देशांमधून 0.5 दशलक्ष टन सूत आणि 8-10 दशलक्ष कापूस गाठीसाठी मागणी येऊ शकते.  

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth