न्युमेरिकने 3 फ़ेज युपीएसमध्ये आपला विकासदर वाढविण्याकरिता उत्पादन पोर्टफ़ोलियोमध्ये वृद्धी, वाढत्या आयटी इन्फ़्रास्ट्रकचरचा विचार करता केओर एमओडी सारख्या, पारितोषिक विजेत्या युपीएसचे सादरीकरण

 न्युमेरिकने 3 फ़ेज युपीएसमध्ये आपला विकासदर वाढविण्याकरिता उत्पादन पोर्टफ़ोलियोमध्ये वृद्धी, वाढत्या आयटी इन्फ़्रास्ट्रकचरचा विचार करता केओर एमओडी सारख्या, 

पारितोषिक विजेत्या युपीएसचे सादरीकरण



मुंबई | जानेवारी 20, 2021: भारताला पावर सोल्युशन (वीजेसंबंधीत उपाययोजना) देणाऱ्या आणि सर्वोत्तम अशा युपीएसची उत्पादनकर्ता असलेली न्युमेरिक, यांनी आज 3 फ़ेज मोड्युलर युपीएस, केओर एमओडीची घोषणा केली. या उत्पादनाची निर्मीती ही आयटी, आयटीइएस, डेटा सेंटर, इन्फ़्रास्ट्रकचर आणि आरोग्य क्षेत्रांसारख्या असंख्य क्षेत्रांकरिता करण्यात आलेली आहे. केओर एमओडीच्या घोषणेमुळे, न्युमेरिकने 3 फ़ेज बाजारेमाध्यमांमध्ये आपल्या विकास योजनांची मांडणी केली आहे.

 

केओर एमओडीच्या सादरीकरणाचे अवचित्य साधून बोलताना, न्युमेरिकचे सीईओ, पलाश नन्दी,म्हणाले “ केओर एमओडीचे दोन आधार स्तंभ म्हणजे कल्पकता आणि स्मार्ट सोल्युशन. आम्ही यापुर्वीच थ्री फ़ेज विभागामध्ये आमचा ठसा उमटविला आहे आणि केओरच्या श्रेणीमधील नव्या उत्पादनांमुळे आम्ही मोड्युलर विभागामध्ये अधिक चांगली उत्पादने उपलब्ध करून देणार आहोत.” यापुढे बोलताना ते म्हणाले, “ डेटा स्थानिकपद्धतीने उपलब्ध करून देणे आणि नव्या व्यवसायांचे बदलते स्वरूप बघता आयटी इन्फ़्रास्ट्रक्चर झपाट्याने वाढणार असल्याचे लक्षात आलेले आहे. डेटाच्या वापराच्या सवयी बदलत असताना डिजिटल इकनॉमी ज्यागतीने वाढते आहे, त्यानुसार 5जी रोल पुढे विकसित होऊन आमच्या श्रेणीतील उत्पादनांकरिता असंख्य संधी निर्माण होतील अशी आमची आशा आहे.”

 

केओर एमडी , युपीएस पेक्षा अधिक असलेल्या युपीएसबद्दल थोडेसे:

 

केओर एमओडीसह, न्युमेरिक युपीएस प्रणालीची पुनर्व्याख्या करण्याचा प्रयत्न करणार आहे; असे केल्याने काळ्या आणि ढोबळ अशा युपीएसची रचना ही स्टायलिश आणि रंगीत अशा प्रगतीशील युपीएस ने बदलली जाणार आहे.केओर एमओडी ने 2019 चा आयएफ़ अवार्ड, डिझाइन अवार्ड मिळविलेला आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर आगळ्या वेगळ्या रचनांना दिला जातो. न्युमेरिकने फ़्रन्ट ॲक्सेस कन्सेप्ट तसाच ठवला आहे, आणि केओरची श्रेणी आणली आहे. कल्पक अशी उत्पादने बाजारात आणण्याच्या आमच्या इच्छा शक्तीमुळे, केओर एमओडीने 10 इंच डिस्प्ले स्क्रीन दिलेली आहे, जी 180 अंशामध्ये फ़िरू शकते. अशी रचना असलेले उद्योग क्षेत्रातील पहिले असे उत्पादन, यामुळे सहज ॲक्सेस  आणि व्यवस्थापन मिळते. डिस्प्ले स्क्रीनमुळे युज इन्टरॅक्टिव आयकॉन सह सहज नेविगेशन करता येते.

 

केओर एमओडी मोड्युल हे बाजारात उपलब्ध असलेले सर्वात लहान 25 केडबल्यू थ्री फ़ेज मोड्युल आहे. केओर एमओडीमध्ये प्रत्येक मोड्युल हे स्वतंत्र प्लग असणार आहे आणि पावर मोड्युल हे थ्री फ़ेज युपीएस  म्हणून काम करत 25 केडबल्यूच्या पावर सह फ़क्त 2 रॅक युनिटची जागा घेणार आहे. केल्या गेलेल्या संशोधनामुळे आणि आधुनिक अशा घटकांमुळे हे थ्री फ़ेज पावर मोड्युल विकसित झाले आहे आणि याच्या खऱ्या प्रगतीचा स्तर वजन आणि जुन्या गोष्टी कमी करण्याचा आहे.

 

केओर एमओडीची प्रगती ही उच्चांक गाठणारी आणि पैशाची बचत करणारी आहे. उच्च विश्वसनीयतेसह बेताच्या आकारामुळे तर उत्पादनांच्या तुलनेत 75% रियल इस्टेटची जागा कमी व्यापली जाते. यामुळे केओर एमओडीकरिता लो कॉस्ट ऑफ़ ओनरशिप (टीसीओ) मिळते. केओर एमओडीद्वारे लवचिकतेसह स्केलेबिलिटी दोन्ही मिळतात, सुमारे 20 पावरची मोड्युल्स समांतर, उभ्या आणि आडव्यामध्ये कमाल 4 फ़्रेम पद्धतीने वपरता येऊ शकतात व 500 किलो वॅटपर्यंत डिलिवरी मिळविता येते. याचा कॅपिटल इन्वेस्टमेंटमध्ये थेट लाभ होतो आणि ग्राहकांना व्यवसयाच्या विकास आणि मागणीनुसार पावर मोड्युल्स जोडता येऊ शकतात.

 

केओर एमओडीची रचना ही पर्यावरणाच्या जबाबदाऱ्या विचारात घेत केली गेली आहे. केओर एमओडी हे पीईपी प्रमाणपत्रासह उपलब्ध असेल. पीईपीच्यामाध्यमाने विश्वसनीय आणि पारदर्शक अशी माहिती उत्पादनांच्या घटकांप्रती मिळते. यामुळे उत्पादनकर्त्याची आणि उत्पादनाची माहिती मिळते, तसेच रिसायकल करण्याची क्षमता, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि प्रत्येक फ़ेजमधील उत्पादनाचे आयुष्य देखील समजून घेता येऊ शकते‘. पीईपीमुळे, ग्राहकाला आयटी इन्फ़्रा इन्स्टॉलेशमुळे उत्पादनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम नेमका काय असेल ते समजून घेता येऊ शकेल.पीईपी मुळे लीड ग्रीन बिल्डिंग सर्टिफ़िकेशन मिळण्यास देखील मदत मिळू शकेल. या सगळ्या घटकांमुळे केओर युपीएस एका युपीएसपेक्षा ही अधिक चांगले ठरते.

लहान आणि मध्यम अशा डेटा सेंटर्स आणि क्लिष्ट स्वरूपाच्या संगणकीय काम असलेल्या ठिकाणी केओर एमओडी हा एक सर्वोत्तम असा उपाय असणार आहे.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy