आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते नवी मुंबईतील ‘झोन 360° फिटनेस सेंटर’ या सर्वात मोठ्या व्यायामशाळेचे उद्घाटन

 आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते नवी मुंबईतील ‘झोन 360° फिटनेस सेंटर’ 

या सर्वात मोठ्या व्यायामशाळेचे उद्घाटन



नवी मुंबई : २७ जानेवारी २०२१,  ही वर्षाची सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच लोकांनी आपल्या आरोग्यपूर्ण जीवनाचा निग्रह केला आहे. त्यासाठी अगदी नव्या कोऱ्या अशा ‘नीट्रो’च्या ‘झोन 360° फिटनेस सेंटर’चे उद्घाटन झाले आहे. नवी मुंबईतील ही सर्वात मोठी व्यायामशाळा नवी मुंबईचे लोकप्रिय नेते आमदार संदीप नाईक आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते झुल्फी सय्यद, अनूपसिंह राजपूत आणि प्रबोध डावखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी निरंजन डावखरे, मंदार केणी, सोनिया डावखरे आणि निखिल म्हात्रे हे इतर मान्यरसुद्धा उपस्थित होते.


यावेळी बोलताना श्री संदीप नाईक म्हणाले, “कोविड साथरोगाने आपण सर्वांनाच निरोगी आरोग्याचे आयुष्याचे महत्व पटवून दिले आहे. अशावेळी सर्व सुविधांनी आणि अत्याधुनिक अशा वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही व्यायामशाळा सर्वच वयोगटांतील लोकांसाठी एक वरदान ठरणार आहे.”


“‘झोन 360° फिटनेस सेंटर’ मध्ये अमेरिकन फिटनेस सामुग्री उपलब्ध असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. त्याद्वारे व्यायामाची आवड असलेल्या ग्राहकांना परिपूर्ण आणि परिणामकारक असा अनुभव मिळणार आहे. या व्यायामशाळेत योग, झुम्बा, मार्शल आर्ट्स, किक बॉक्सिंग, बॉलीवूड डान्स अशा इतर सुविधासुद्धा उपलब्ध असणार आहेत. हे एक अत्याधुनिक असे फिटनेस सेंटर असून ते सर्वसामन्यांसाठी अगदी किफायतशीर दरांमध्ये उपलब्ध असेल. "आम्ही लवकरच आम्ही फ्रँँचायजी पुणे आणि दिल्ली येथे सुरु करणार आहे," असे उद्गार 'झोन  360° फिटनेस सेंटर'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री प्रबोध डावखरे यांनी काढले. 


श्री झुल्फी सय्यद म्हणाले, “आज शारिरीक तंदुरुस्ती अधिक महत्वाची ठरत आहे. अशावेळी ‘झोन 360° फिटनेस सेंटर’ सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचवेळी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची काळजी येथे घेतली जाणार आहे. त्याद्वारे लोकांना त्यांच्या व्यायाम गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे, कारण येथे व्यावसायिक प्रशिक्षक आणि उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी साधन सामुग्रीसुद्धा उपलब्ध आहे.”


कोविड-१९ च्या अनुषंगाने सुरक्षेची जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली गेली आहेत, त्यांना अनुसरून येथे सर्वसमावेशक आणि सामाजिक अंतर पाळत व्यायाम जागा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या फिटनेस सेंटरमध्ये ओपन एअर स्टुडीओसुद्धा असून त्यामुळे खुली हवा उपलब्ध होणार आहे. दर तासाला केली जाणारी स्वच्छता, आरोग्यपूर्ण वातावरण आणि मास्कचा अनिवार्य वापर या गोष्टीसुद्धा या फिटनेस केंद्रामध्ये अनिवार्य केल्या गेल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth