सुषमा समुहातर्फे सुषमा एलिमेंटा हा पहिला हाॅलिडे होम प्रकल्प सादर

सुषमा समुहातर्फे सुषमा एलिमेंटा हा पहिला हाॅलिडे होम प्रकल्प सादर

 


मुंबई, १३ जानेवारी २०२१  : पंजाब-स्थित आघाडीचे रिअल इस्टेट डेव्हलपर सुषमा ग्रुप आता हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाले असून सुषमा एलिमेंटा हा पहिला मनमोहक निवासी प्रकल्प त्यांनी सादर केला आहे. समुहातर्फे आतापर्यंत १३ भव्य प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील प्रकल्प हा कसौलीतील हाॅलिडे होमच्या दृष्टीने आदर्शवत असा प्रकल्प आहे. सोलन जिल्ह्यातील या निसर्गरम्य ठिकाणी सुमारे सहा एकर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी समुहातर्फे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

 प्रकल्पाच्या बांधकामामध्ये ३,३८,०७९ चौरस फुटाचा बिल्ट-अप एरिया असून एकूण ३८२ युनिट्स (घरे) बांधण्यात येणार आहेत. एक, दोन व तीन बीएचके अपार्टमेंट्सच्या या घरांचे क्षेत्रफळ ६३० चौरस फूट ते १३३५ चौरस फूट असणार आहे. एकूण आठ इमारती या प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येणार आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे सहा हजार फूट उंचीवर असलेल्या या प्रकल्पातील सर्व घरांची बांधणी अशा पद्धतीने केली गेली आहे की सर्वांनाच डोंगर-दऱ्यातील निसर्गाच्या मनमोहक सौंदर्याचा अनुभव घेता येईल.

 प्रकल्पामध्ये मनोरंजनासह व्यायामशाळा , ग्रंथालय, लहान मुलांसाठी कक्ष, एक्स्पिरियन्स सेंटर, मीडिया रूम, स्पा, गेम्स रूम, निसर्ग न्हाळण्यासाठीची जागा, भव्य प्रवेशद्वार आणि डोंगरांमध्ये होणारा सूर्यास्ताचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी सनसेट प्लाझा अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. चंदीगड विमानतळ आणि महामार्गापासून अखंडित कनेक्टिव्हिटी (जोडणी) प्रकल्पाला लाभली आहे. 

 प्रकल्पाविषयी बोलताना सुषमा समुहाचे कार्यकारी संचालक प्रतीक मित्तल म्हणाले, हिमाचल प्रदेश येथील पहिला प्रकल्प सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विरंगुळ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या प्रकारात हा प्रकल्प मोडतो आणि त्यातील हाॅलिडे होम संकल्पनेवर आधारित एलिमेंटा हा आमचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे. दैनंदिन जीवनात वाढलेल्या ताणतणावापासून सुटका करणारा आणि शहरातील धावपळ आणि रहदारीपासून दूर असलेला हा प्रकल्प निसर्गरम्य डोंगररांगेमध्ये स्थित आहे.त्यामुळे ताणतणाव-मुक्त आणि प्रदुषण-मुक्त परिसरातील प्रकल्प लोकांना खूप उपयुक्त वाटेल आणि पसंतील पडेल.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.