द्वारा केजीएफएसने आपल्या ग्राहकांसाठी ई-सिग्नेचर सेवा सुरू केली

 द्वारा केजीएफएसने आपल्या ग्राहकांसाठी ई-सिग्नेचर सेवा सुरू केली

कर्ज खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा नवीन उपक्रम सादर केलामुंबई, १९ जानेवारी २०२१ : ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक उद्योगाची आर्थिक उन्नती करण्याचे उद्दीष्ट असलेल्या एनबीएफसी समर्थित भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान द्वारा केजीएफएसने अलीकडेच ई-स्वाक्षरी हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य सुरू केले आहे. ई-स्वाक्षरीमुळे या साथीच्या रोगामध्ये सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला संबंधित सुरक्षा प्रोटोकॉल सुनिश्चित करून कर्ज मिळविण्यासाठी त्रास-मुक्त दस्तऐवजीकरण सक्षम होईल.

 

ग्राहक कर्जासाठी ज्या पद्धतीने अर्ज करतात त्यामध्ये थोडा बदल केला आहे, केजीएफएस असिस्ट (केजीएफएस च्या इन-हाऊस टेक्नोलॉजी टीम ने विकसित केलेले फ्रंट एन्ड ॲप) ने ई-सिग्नेचर सादर केले आहे ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरातूनच त्यांच्या हॅन्ड हेल्ड डिव्हाईसचा उपयोग करून कर्जासाठी अर्ज करता येईल आणि पुढील प्रक्रिया करणे सहज होईल. तसेच स्वाक्षऱ्या निश्चित करणे, इआरपीवर कागदपत्रे अपलोड करणे यांसारखी मानवी हस्तक्षेप असलेली जटिल प्रक्रिया दूर होईल.

 

जेएलजी आणि एमईएल टर्न अराउंड टाईम (टीएटी) विषयी बोलताना द्वारा केजीएफएसचे डेप्युटी सीइओ श्री मुर्ती एलव्हीएलएन म्हणाले कि, “बाजाराच्या सखोल माहितीमुळे आम्ही टीएटी अनुक्रमे ४ दिवस आणि २ दिवस कमी करू शकलो. यामुळे कर्ज वितरण व नावनोंदणी प्रक्रिया सुलभ झाली आहे आणि परिणामी अधिकाधिक लोकांना फायदा होत आहे, तसेच आमच्या अंतर्गत प्रक्रियेत नवीन बेंचमार्क निश्चित केले आहेत.”

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.